श्रीकृष्ण जयंती विशेष: कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

Reading Time: 3 minutesकृष्ण कोण होता? कृष्ण गोकुळातला ‘माखनचोर’ होता. कृष्ण राधेचा प्रियकर होता. तो द्वारकाधीश होता आणि अर्जुनाचा सारथीही होता. असुरांचा नाश करणारा नरहरी होता तर गोवर्धनाचे छत्र बोटावर पेलणारा उत्तम बासरीवादकही होता. कृष्ण त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडत होता. आपण काही कृष्ण नाही. पण आपल्याला जर  आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेत यशस्वी व्हायचं असेल तर कृष्णाने शिकवलेला मार्ग आचरणात आणावा लागेल. कृष्ण एक चांगला व्यवस्थापक होता त्याने सांगितलेली व्यवस्थापन कौशल्य आचरणात आणल्यास तुम्हीही उत्तम व्यवस्थापक बानू शकाल.