अर्थसाक्षर श्रीकृष्ण जयंती
Reading Time: 3 minutes

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्य

आज श्रीकृष्ण जयंती! महाभारत आणि गीतेचा अभ्यास केल्यास कृष्णाकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य होतं, हे सहज लक्षात येईल.  यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण जयंती उत्सव देखील दरवर्षी प्रमाणे साजरा करता येणार नाही. परंतु, आजपासून श्रीकृष्णाने केलेला उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरु केल्यास, खऱ्या अर्थाने आजचा दिवस साजरा केला जाईल. 

“आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे  काय असते रे भाऊ ?

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे” ॥४-८॥

भगवद्‌गीतेतील हा श्लोक वाचल्यावर अनेकांना कोणे एके काळी लागणारी ‘महाभारत’ ही सीरिअल नक्कीच आठवत असेल. महाभारतामध्ये युद्धभूमीवर आपल्याच माणसांशी लढायच्या कल्पनेने निराश झालेल्या अर्जुनाला कृष्णाने केलेला उपदेश म्हणजे भगवद्‌गीता! हा उपदेश केवळ युद्धभूमीवरच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अगदी लहान थोरांपासून सर्वाना उपयुक्त ठरणार आहे. 

कृष्ण कोण होता? कृष्ण गोकुळातला ‘माखनचोर’ होता. कृष्ण राधेचा प्रियकर होता. 

तो द्वारकाधीश होता आणि अर्जुनाचा सारथीही होता.  

असुरांचा नाश करणारा नरहरी होता, तर गोवर्धनाचे छत्र करंगळीवर पेलणारा उत्तम बासरीवादकही होता. 

कृष्ण त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडत होता. आपण काही कृष्ण नाही. पण आपल्याला जर  आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेत यशस्वी व्हायचं असेल तर कृष्णाने शिकवलेला मार्ग आचरणात आणावा लागेल. 

कृष्णाने सांगितलेली व्यवस्थापन कौशल्य आचरणात आणल्यास तुम्हीही उत्तम व्यवस्थापक बनू शकाल. 

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

कृष्णाने शिकविलेल्या व्यवस्थापन कौशल्याचा ५ महत्वाच्या गोष्टी

१. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा: 

  • जसं कृष्णाने प्रसंगाची गरज ओळखून राजा असूनही अर्जुनाचं सारथ्य करण्याचं काम स्वीकारलं व ते उत्तम निभावलं. युद्धभूमीवर शस्त्र खाली ठेवण्याच्या विचारात असणाऱ्या अर्जुनाला त्याच्या ध्येयाची जाणीव करून दिली. त्याला नीती अनीती शिकवली.  
  • तसंच, काम करत असताना यश अपयश लपाछपी खेळत असतं, चढउतार अनुभवावे लागतात. पण चांगल्या व्यवस्थापकाने काम पूर्ण करताना येणाऱ्या समस्या यशस्वीपणे सोडवून आपल्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यांना त्यांच्या ध्येयाची जाणीव करून दिली पाहिजे. 

२. संघटन व उत्तम कार्यपद्धती आचरणात आणा:

  • कृष्णाने त्याच्या आयुष्यात संकटांचा सामना केला. आपल्यापेक्षा बलवान शत्रूलाही नमवले. याचं कारण म्हणजे त्याची ध्येयाशी सुसंगत कार्यपद्धती. स्पष्ट उद्दीष्टे ठेवल्यास लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तसंच योग्य कार्यपद्धतीमुळे ध्येयपूर्ती सहज शक्य होते.   
  • याचप्रमाणे, प्रत्येक डिपार्टमेंट एकमेकांच्या कामाशी कुठेना कुठे जोडलेले असते. चांगला व्यवस्थापक “एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ” ही विचारसरणी आचरणात आणतो. याचबरोबर कामासाठी योग्य कार्यपद्धती ठरवतो आणि हे करताना तो आपल्या सहकाऱ्यांचे मतही विचारात घेतो.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

३. उत्तम ‘बॉस’ व सहकारी बना:

  • कृष्णाने राजा असूनही अर्जुनाचे सारस्थ्य केले. त्यामध्ये त्याने कमीपणा मानला नाही. तसेच त्याने अर्जुनालाही या गोष्टीमुळे कधी अवघडलेपनण जाणवू दिलं नाही. त्याचप्रमाणे उत्तम व्यवस्थापकाला त्याच्या सहकाऱ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यात कमीपणा वाटू नये. सहकाऱ्यांनाही त्याच्याजवळ आपल्या समस्या मांडण्यात कोणतीही भीती वाटू नये. 
  • चांगला बॉस तोच असतो जो वैयक्तिक हेवेदावे विसरून कामाला प्राधान्य देतो. जो आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना समान वागणूक देतो. त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना कामासाठी प्रोत्साहित करतो.

४. काम करण्याची संस्कृती (Work Culture) रुजवा: 

‘परीत्रयणा साधुनाम’ – याचा अर्थ चांगल्यासाठी कल्याण;

‘विनाश्या दुश्कृतम’ – याचा अर्थ वाईटाचा नाश (विचार व कृती) नष्ट करणे

‘धर्म संस्थान’ – ही चांगली तत्त्वे स्थापन करणे आणि मजबूत करणे होय.

  • चांगला व्यवस्थापक आपल्या कामाच्या ठिकाणी “वर्क लाईफ बॅलन्स” करणारी, कर्मचाऱ्यांना व सहकाऱ्यांना काम करण्यास उत्साह वाटेल अशी कामाची संस्कृती रुजवण्यात यशस्वी होतो.
  • याचबरोबर तो वैयक्तिक नाती दूर ठेवतो. शत्रू- मित्र असा भेद करत नाही आणि कामाचा दर्जा व प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याला प्रोत्सहन देतो.
  • एक चांगला व्यवस्थापक भ्रष्टाचार, वशिलेबाजी, फसवणूक अशा विचारसरणीला आळा बसवून सहकाऱ्यांच्या हिताच्या योजना राबवण्यास नेहमीच प्रोत्साहन देतो. 

५. आपल्या सहकाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा:

  • कृष्णाने पावसापासून रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. याद्वारे त्याने दोन गोष्टी शिकवल्या. पहिली म्हणजे एक पुढारी म्हणून ग्रामस्थांचे रक्षण करण्याचे कर्तव्य पूर्ण केले तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पर्वताचं महत्वही पटवून दिले. 
  • याचप्रमाणे चांगला व्यवस्थापक आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणींमधून बाहेर काढण्यास मदत करतो. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव तर करून देतोच पण सर्वांसमक्ष त्याची बाजू सावरूनही घेतो.  

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग  २

कृष्णाची भगवद्गीता म्हणजे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, नीतिमत्ता, शास्त्र, तत्वज्ञान, इत्यादी अनेक शाखांच्या  ज्ञानाचे भांडार आहे. यातील ज्ञानकणांना वेचून सामान्यातल्या सामान्य माणसांचेही “प्रोफेशनल” व “पर्सनल” आयुष्य समृद्ध होईल. 

टीम अर्थसाक्षरकडून श्रीकृष्ण जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!!

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Shrikrishna Jayanti information Marathi Mahiti, Shrikrishna Jayanti Special in Marathi, Shrikrishna & Management lesson Marathi Mahiti, Krisha & Management skill in Marathi 

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.