Intestate: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

Reading Time: 3 minutes मृत्यू अटळ असतो, बहुतांश वेळा अनपेक्षितही असतो. मृत्यूपत्र हा कायद्याने दिलेला असा मार्ग आहे ज्यामार्गे आपण आपल्या संपत्तीची मृत्यूपश्चात विभागणी करु शकतो. पण काही कारणांमुळे मृत्यूपत्र करायच्या आधीच जर एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचं काय होत असेल? त्याची विभागणी कशा प्रकारे होत असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कायद्यानुसार ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं नाही, त्या व्यक्तीला ‘इनटेस्टेट’ (Intestate) असं म्हणतात. अशावेळी संबंधित देशाच्या कायद्यानुसार त्या व्यक्तीच्या मालमत्तेची विभागणी करण्यात येते. यामध्ये इनटेस्टेट व्यक्तीचे बॅंक खाते, सिक्युरिटीज, स्थावर मालमत्ता व इतर मालमत्ता इत्यादी मालमत्तांचा सामावेश होतो.