NSC RFSC – आंतराष्ट्रीय शेअरबाजाराकडून गुंतवणूकीची संधी

Reading Time: 2 minutes मुंबई शेअरबाजार पुरस्कृत इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व राष्ट्रीय शेअरबाजार पुरस्कृत एनसीसी आरएफएससी (NSC RFSC) हे भारतातील दोन आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहेत. गांधीनगरजवळ नव्यानेच वसवण्यात आलेल्या गिफ्टसिटी या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या स्मार्ट शहरात दिवसभरातील 22 तास कामकाज चालू असणारा इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व 15 तास सुरू असणारा एनसीसी आरएफएससी यामुळे जगभरातील लोकांना भारतातील आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सोय झाली आहे. येथे करविषयक अनेक सवलती असल्याने  गुंतवणूकदारांना कमीतकमी खर्चात स्पर्धात्मकदराने येथे व्यवहार करता येतात.