कंपनीने आपला पीएफ जमा केला आहे की नाही ते जाणून घ्या एका “एसएमएस” द्वारे
Reading Time: 2 minutesसामान्यतः मूळ वेतनाच्या १२% कर्मचारी व १२% नियोक्त्याचे योगदान कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी निश्चित केलेले असते. कर्मचारी त्यांचे ईपीएफ योगदान नाकारू शकत नाहीत किंवा टाळू शकत नाहीत कारण ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून अगोदरच कपात केली जाते. परंतु, नियोक्त्यामार्फत रक्कम जमा केली जाते की नाही, हे कर्मचाऱ्यांना कसं समजणार?