PMSBY: गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी पंतप्रधान स्नेह बंधन योजना

Reading Time: 2 minutes पंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY: Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana) भारत सरकारच्या वतीने १ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. या योजनेनुमध्ये बँकेमध्येच भेटवस्तू खरेदी करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. या भेटवस्तू कोणत्या? त्यांची किंमत काय? त्याचा फायदा काय? यासंदर्भात सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत. 

PMS – काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट योजना (Portfolio Management)

Reading Time: 4 minutes दलालांमधील स्पर्धा, त्यामुळे कमी कमी होत गेलेली दलाली, डिस्काउंट ब्रोकर्सचे आगमन आणि त्यांनी आकर्षित करून घेतलेले गुंतवणूकदार यामुळे नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या दलालांचे उत्पन्न घटले असून बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या त्यांना योजाव्या लागत आहेत. मग याला पूरक व्यवसाय म्हणून म्युच्युअल फंड एजन्सी, विमा एजंट, यूलीप योजना विक्री, पेन्शन योजना विक्री असा पूरक व्यवसाय त्यांनी चालू केला आहे. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित आहे. याहून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी प्रोट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम यांचा आधार घेतला जात आहे. यातून मिळू शकणारा फायदा हा अधिक असल्याने अनेकांना त्याचा आधार आहे.