निवडणूक रोखे (Electoral Bonds) म्हणजे काय ?

Reading Time: 3 minutes विविध राजकीय पक्ष पैसा जमा करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून देणग्या मिळवत असतात. या देणग्या सर्वसामान्य लोक, व्यापारी , कंपन्या, मोठे उद्योगपती यांच्याकडून रोखीने घेतल्या जात असल्याने आणि त्याचा तपशील ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने काळ्या पैशांची निर्मिती होत होती. हे व्यवहार पारदर्शी व्हावेत या हेतूने २०१७/१८ च्या अर्थसंकल्पात राजकिय पक्षांना मदत करण्याचा हेतूने निवडणूक रोख्यांची निर्मिती केली आहे.