हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …

Reading Time: 3 minutes एक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर!