वाहतूक नियम मोडणे आता महागात पडणार

Reading Time: 2 minutes देशातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०१७ मध्ये रस्त्यावर एकूण ४,६४,९१० अपघात झाले होते त्यामध्ये एकूण १,४७,९१३ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमधील जवळपास ४५% अपघात हे हायवे सोडून इतरत्र झालेले आहेत. अपघातांना रोखण्यासाठी गेली काही वर्षे अनेक प्रकारची उपाययोजना चालू आहे. पण त्याला मिळणारं यश अत्यल्प आहे. सध्या अपघातांचे प्रमाण ३% नी कमी झालं आहे. अर्थात हे पुरेसं नाही. म्हणूनच शक्य तितके प्रयत्न सरकारकडून होत आहेत. या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे, रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी लोकसभेत सादर केलेले “मोटर वाहन दुरुस्ती विधेयक”