रिअल ईस्टेट वि. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड
Reading Time: 3 minutesभारतीय रिझर्व बँकेच्या २०१७ सालातील एका अहवालानुसार आपल्या देशातील सर्व व्यक्तींकडील वैयक्तिक संपत्तीचा ७६.९% भाग – म्हणजे तीन चतुर्थांशपेक्षा अधिक – हा रिअल इस्टेटमधे गुंतवलेला आहे. त्या खालोखाल ११% सोन्यातील गुंतवणूक आहे आणि अवघी ५% संपत्ती बँकेत किंवा निवृत्तीनिर्वाह निधीत आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चाकोरीबद्ध गुंतवणुकीच्या सवयींचा हा परिपोष आहे.इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की स्वतःच्या राहण्यासाठी घेतलेले घर हे वापरण्याच्या (Consumption) दृष्टीने घेतलेले असल्यामुळे तिला आपण ‘शुद्ध आर्थिक गुंतवणूक’ मानत नाही. राहण्यासाठी स्वतःचे घर असावे ही बहुतेकांची भावनिक गरज असते, तसेच कौटुंबिक स्वास्थ्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते. त्यामुळे असे आपण राहते घर आणि इतर आर्थिक गुंतवणुकी यांची तुलना करू शकत नाही. या लेखांमधील विचार आर्थिक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या रिअल इस्टेट किंवा घरांसाठी आहेत.