आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!

Reading Time: 6 minutesजीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे. पण मंदीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा हा बदल समजून घेण्यात आणि त्यानुसार आपल्यात बदल करण्यातच शहाणपणा आहे. कारण जगात होऊ घातलेला बदल कोणीच रोखू शकलेले नाही!