सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
Reading Time: 4 minutesआजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. “सोय तितकी गैरसोय” म्हणतात ते काही उगाच नाही. अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला भुलून आपल्या बँक खात्याची व वैयक्तिक माहितीही देतात आणि लाखो रुपये गमावतात.