शेअर बाजाराची संथ वाटचाल…

Reading Time: 2 minutesबाजार हा ठराविक टप्पे पार करतच पुढे-मागे होत असतो. या शास्त्राचा शोध साधारण ११९ वर्षापुर्वी म्हणजे १९०० साली लागला. अमेरिकेतील चार्ल्स डॉव यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. आज ११९ वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बाजाराचे विश्लेषण करावे लागते. तसे केल्यास बऱ्यापैकी अचूक पद्धतीने बाजाराची किंवा शेअरची पुढील दिशा ठरविणे शक्य होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज काल गोष्टी खूपच सोप्या झाल आहेत. पूर्वी तांत्रिक विश्लेषणासाठी लागणारे आलेख (charts) हाताने काढावे लागत होते.