अर्थसाक्षर कथा – संकट दुर्धर आजारांचे

Reading Time: 4 minutesआरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात. 

निवडणूक रोखे (Electoral Bonds) म्हणजे काय ?

Reading Time: 3 minutesविविध राजकीय पक्ष पैसा जमा करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून देणग्या मिळवत असतात. या देणग्या सर्वसामान्य लोक, व्यापारी , कंपन्या, मोठे उद्योगपती यांच्याकडून रोखीने घेतल्या जात असल्याने आणि त्याचा तपशील ठेवण्याचे कायदेशीर बंधन नसल्याने काळ्या पैशांची निर्मिती होत होती. हे व्यवहार पारदर्शी व्हावेत या हेतूने २०१७/१८ च्या अर्थसंकल्पात राजकिय पक्षांना मदत करण्याचा हेतूने निवडणूक रोख्यांची निर्मिती केली आहे.