प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती

Reading Time: 3 minutesआर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना बँकांशी आणि डेबिट कार्ड व तत्सम बँकिंग संस्थेशी जोडणे हे जन-धन योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. तसेच, कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पाया आणि डिजिटल इंडिया योजनेला पूरक प्रोत्साहन देण्याचे काम ही योजना करते .प्रत्येक घरात दोन बँक खाते या हिशोबाने देशात एकूण, १५ कोटीहून अधिक बँक खाती उघडणे, तसेच बँक क्षेत्रापासून वंचित असलेल्या ७.५ कोटी कुटुंबांना भारताच्या बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवून ही योजना तयार करण्यात आली.