आयकर म्हणजे आपल्या वेतनावर लागणारा कर असला तरी वेतनाची संपूर्ण रक्कम कारच्या छायेत येत नाही. आणि त्यांचे वितरण समान ही नाही. आपल्या वेतन घटकांपैकी काहीच घटक संपूर्णपणे करपात्र आहेत, तर काही घटक अंशतः(काही अटींवर पूर्तता केल्यानंतर करसवलत मिळू शकते, अन्यथा करपात्र.) जर तुम्हाला मिळणाऱ्या सवलतींचा पुरेपूर वापर करायचा असेल आणि पगारातून कारच्या रुपात विनाकारण बाहेर पडणारा हक्काचा पैसा वाचवायचा असेल तर वेतनातील कोण कोणते घटक करपात्र आहेत? अंशतः की पूर्णतः? कोणत्या अटींनवर करसूट मिळू शकते? अशा माहितीचा आधार आवश्यक आहे.
सर्वप्रथम आपल्या वेतनाचा कोणता घटक अंशतः करपात्र आहे आणि कोणता घटक पूर्णतः करपात्र आहे याची विभागणी समजून घेणे आवश्यक आहे.
पूर्णतः करपात्र :
पगाराचा काही भागावर संपूर्ण कर भरणे अनिवार्य आहे. आपल्या पगारातील हा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग असल्याने हे घटक संपूर्णपणे करपात्र(fully taxable) आहेत. पुढील वेतन घटक यामध्ये येतात.
- मूळ कमाई – जो पगारातील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर इतर घटक अवलंबून
- महागाई भत्ता हा ही महत्वाचा घटक.
- बक्षीसरूपी वाढीव रक्कम/ कामगिरी भत्ता
- आरोग्य भत्ता
- याशिवाय कर्मचाऱ्याला त्याच्या उच्च पदामुळे मिळणाऱ्या ज्या काही विशेष सोई जसे की, विनामूल्य निवासस्थान, मोटारगाडी, सेवानिवृत्तीनिधी, इत्यादीवर त्यांच्या किमतीवर लागणारा कर.
अंशतः करपात्र :
काही अटींची पूर्तता करता पुढील वेतन घटकांवर करसवलत मिळू शकते. कर्मचारी योग्यत्या अटींची पूर्तता न करू शकल्यास वेतन घटकावर पूर्ण कर भरावा लागतो. म्हणून कोणत्या भत्त्यांवरील करांवर किती घट होऊ शकते आणि कोणत्या अटींच्या आधारावर हे समजून घेऊया.
१. घरभाडे भत्ता – कर्मचारी जर भाड्याच्या घरात राहत असेल, तर त्याला घरभाडे भत्ता मिळतो. परंतु, घरभाडे भत्त्याची रक्कम अंशतः करपात्र आहे. तुमच्या घरभाडे भत्त्यावर सूट हवी असेल तर पुढील पैकी जी रक्कम सर्वात कमी असेल त्यावर सूट मिळू शकते.
- अ)कंपनीने दिलेला एकूण घरभाडे भत्ता.
- ब)कर्मचाऱ्याला भरावे लागणारे एकूण घरभाडे वजा मूळ कमाईतील १०% रक्कम
- क)महानगरांमध्ये मूळ कमाईच्या ५०% तर इतर शहरांमध्ये ४०% रक्कम.
२. प्रवासभाडे भत्ता – नोकरीच्या कार्यकाळात रजेवर असताना कर्मचारी किंवा त्याच्या नातेवाईकांचा प्रवास खर्च कंपनी देते त्यावर लागणाऱ्या करावर पुढील निकाशाच्या आधारे सूट मिळू शकते.
- कर्मचाऱ्याचाप्रवास खर्च कंपनीने दिलेल्या भत्त्याच्या मर्यादेत असेल तर.
- चार वर्षांच्या कालावधीत दोनच वेळा प्रवास केला गेला असेल तर.
- हे प्रवास भारताच्या सिमानांतर्गत केला गेला असेल तर.
३. वाहतूक भत्ता – कर्मचाऱ्याचा त्याचं घर ते कामाचे ठिकाण या दरम्यान होणारा प्रवास खर्च कंपनीकडून वाहतूक भत्त्याच्या रुपात मिळतो. हा खर्च जर १६०० प्रतिमहिना किंवा १९,२०० प्रतिवर्ष या मर्यादेत असेल तर करसूट मिळू शकते. परंतु हे नियम आर्थिक वर्ष 2017-18 पर्यंतच लागू होते.
आर्थिक वर्ष 2018-19 पासूनचे नविन नियम खालीलप्रमाणे-
वजावटीचा पुन:परिचय (Reintroduction of Standard deduction): २०१८ च्या बजेटमध्ये रु. ४०,०००/- पर्यंतच स्टॅंडर्ड डिडक्शनची तरतूद केली आहे. याचवेळी मात्र सध्याची प्रवासभत्ता व आरोग्य खर्चाची तरतूद (34,200/-) रद्द करण्यात येइल. त्यामुळे आधीच्या वजावटीपेक्षा फक्त रू.५,८००० ची जास्त वजावट मिळू शकते.
अशा प्रकारे कोणते वेतन घटक कोणत्या प्रकारे करपात्र आहेत जे समजल्यानंतरच तुम्ही योग्य कर तथा आर्थिक नियोजन करू शकता.