Reading Time: 3 minutes

मूल्य आणि किंमत (Value and Price)

मूल्य हा शब्द खूप व्यापक आहे. मूल्य म्हटल्यावर आपल्याला जीवनमूल्य, नितीमूल्य आठवत असतील तर धाबरून जाऊ नका मी त्या अर्थाने हा शब्द वापरून आपल्याला अधिक चिंतेत टाकत नाही. हा शब्द शेअरचे मूल्य आणि किमतीच्या संदर्भात वापरत आहे. या संदर्भात गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचे वाक्य प्रसिद्ध आहे “Price is what you pay and Value is what you get.” एखाद्या शेअरचा बाजारातील भाव ही झाली त्याची किंमत आणि त्याची याहून वेगळी खरीखुरी किंमत गुंतवणूकदारास आधीच ओळखता येणं हे झालं त्या शेअर्सचे मूल्य. भविष्यातील ब्लू चिप कंपनी ही जितकी आधी ओळखून कमीत कमी भाव असताना त्यात सर्वाधिक गुंतवणूक करता आली तर प्रचंड फायदा होऊ शकतो. बाजारभाव आपल्याला सहज समजू शकतो तो मागणी आणि पुरवठा या तत्वावर आधारित आहे. मागणी अधिक पुरवठा कमी तर बाजारभाव जास्त, याउलट मागणी कमी पुरवठा भरपूर तर बाजारभाव कमी. अनेक कारणांनी मागणी पुरवठा कमी होऊ शकतो त्याचप्रमाणे वाढूही  शकतो. असे  होण्याची अनेक कारणे आहेत. बाजारात सर्वांचे अंतिम उद्दीष्ट फायदा मिळवणे असे असले तरी कार्यरत व्यक्ती वित्तसंस्था याच्या प्रत्येकाच्या गुंतवणूक कल्पना वेगवेगळ्या असतात. यातील ज्या मानसिकतेचा प्रभाव अधिक असतो त्याप्रमाणे बाजारभावाची दिशा ठरते. बाजारात सेकंदाहून वेळेत कमी व्यवहार होत असतात आणि त्याच्या नोंदी उपलब्ध असतात. त्यामुळे बाजारभाव सहज शोधता येतो परंतू मूल्य शोधण्याची कोणतीही साचेबद्ध पद्धत नाही.
बाजारात कार्यरत व्यक्ती व्यक्तीनुसार मूल्य शोधण्याची आवश्यकता बदलू शकते.  उदा.
  • गुंतवणूक या हेतूने एखाद्या उद्योगाची खरेदी करण्यासाठी,
  • गुंतवणूक या हेतूने एखाद्या उद्योगाची विक्री करण्यासाठी,
  • एखादा उद्योग विलीन करणे अथवा त्यावर ताबा मिळवणे यासाठी,
  • मालकास व्यवसायाचा सर्वसाधारण अंदाज येण्यासाठी.
  • मालमत्तेच्या अडलाबदलीत त्याच्या शेअरच्या आदलाबदलीचे प्रमाण ठरवण्यासाठी.
  • याशिवाय विविध कारणांनी मालमत्तेची मोजणी करून त्यावरील कर कायदेशीरबाबीची पूर्तता करण्यासाठीही मूल्य आवश्यक असते.
             मूल्य दोन मार्गानी शोधता येईल व्यवसायातून होणारी कमाई आणि व्यवसायाची मालमत्ता.
शेअर्स बॉण्ड किंवा खरीखुरी मालमत्ता याचे मूल्य शोधताना शेअर्सच्या बाबतीत वेळोवेळी यातून होणारी कमाई आणि जर तिची भविष्यात विक्री केली तर मिळू शकणारी किंमत याचा विचार केला जातो.
बॉण्डच्या बाबतीत मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळेस मिळणारी रक्कम याचा विचार होईल.
रियल इस्टेटच्या बाबतीत त्यापासून वेळोवेळी मिळू शकणारे भाडे यानंतर काही काळाने मालमत्तेच्या किमतीत वाढ होऊन मिळू शकणारी रक्कम याचा विचार केला जाईल.
उद्योगधंद्याची निर्मिती याच हेतूने केली जाते यातून  वेळोवेळी सातत्याने काहीतरी मिळत राहील आणि नंतरही चांगली किंमत मिळू शकेल. असे झाले नाही तर व्यवसाय करणे परवडणार नाही दिवाळे वाजेल.
आश्चर्यकारक गोष्ट अशी की व्यावसायिक जसा विचार करतात तसाच विचार त्यासाठी पैसा पुरवणारे सावकारही करत असतात. उद्योगातून येणाऱ्या उत्पन्नातून आपल्याला नियमित पैसे मिळत राहतील किंवा न मिळाल्यास तारण मालमत्ता विक्री केल्यास आपला तोटा होणार नाही याची काळजी घेऊन वित्तपुरवठा करण्यात येतो.
व्यवसायाची मालमत्ता अशी हवी जी त्यात सहभागी असलेल्या ची सर्व आर्थिक अपेक्षा पूर्ण करील.यात दाखवलेल्या मालमत्तेच्या सुदृढते विषयी कायम संशय व्यक्त करण्यात येतो परंतू त्यातून सर्व तारीत आणि विनातारित देणी पूर्ण होऊ शकत असतील तर त्याचे मूल्य निश्चितच अधिक असते.
मूल्य शोधण्याच्या सर्वमान्य पद्धती-
  • भविष्यातील विशिष्ठ किमतीची सध्याची किंमत: ही पद्धत पूर्वी उपलब्ध असलेल्या डीप डिस्काउंट बॉण्ड सारखी आहे ज्यात आपल्याला 25 वर्षांनंतर 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिलेले असते ज्याची आताची किंमत 2500 रू होती. यांची मोजणी करणे थोडे किचकट आहे याशिवाय उद्योग म्हणून विचार करताना यात रुपयाचे घटते मूल्य आणि करपरिणाम याचाही विचार केला जातो.
  • गुंतवणूक व परतावा पद्धत: आपण किती गुंतवणूक करतो आणि त्यातून काय प्राप्ती होते यावरून एखादा व्यवसाय योग्य किमतीचा, अधिक किंमत द्यावी लागणारा की कमी किंमत द्यावी लागणारा याची तुलना करून यासंबंधीची खरेदी , विक्री किंवा  गुंतवणूक चालू ठेवण्याचा निर्णय घेतला जातो.
  • वरील दोन्ही पद्धतीत आकडेमोड करावी लागत असली तरी त्यात मूल्य शोधण्यास तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेण्यात येतो.
  • तुलनात्मक मूल्यशोधन: यात एकाच प्रकारच्या कंपन्यांच्या मुलभूत विश्लेषणाची तुलना याच गटातील प्रमुख कंपनीशी केला जातो. यावरून कंपनीचे मूल्य शोधता येईल. ते कसे शोधावे याचीही निश्चित अशी पद्धत नाही. यातील तज्ञ सारासार विचार करून याबद्दल निर्णय घेतात. या पद्धतीने मूल्य शोधताना-
  • कंपनीच्या प्रतिशेअर कमाईवर आधारित दरांची तुलना केली जाते. लाभांश आणि बाजारभाव, बाजारभाव आणि प्रतिशेअरकमाई, बाजारमूल्य आणि कर्ज यातून रोख रक्कम वगळून आलेली किंमत, अशा किमतीचा विक्रीशी असलेला संबंध
  • मालमत्तेचे मूल्यांकन करणारे दर म्हणजेच प्रत्येक भागावर मिळवलेला (ROE), कर्जासह पूर्ण भांडवलावर मिळवलेला फायदा (ROCE), गुंतवणूक मूल्य दर(ROI), निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) यांसारख्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.
  • ज्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत त्याचे विभागवार मूल्यांकन काढून एकत्रित मूल्य काढण्यात येते.
  • नव्याने उदयास आलेल्या क्षेत्रातील व्यवसायांचे मूल्यांकन करताना त्याला मिळणारा प्रतिसाद आणि भविष्याबाबत अंदाज बांधून मूल्य काढले जाते.
याप्रकारे मूल्यांकन करताना काही गोष्टी गृहीत धरून चालावे लागते त्या अशा-
* कमाई अधिक असलेल्या व्यवसायाचे पुस्तकी मूल्य (BV) विचारात घेतले जात नाही पण कमाई कमी असल्यास पुस्तकी मूल्य पाहिले जाते.
* जर समभाग एखाद्या उद्योग समूहाचा भाग असेल तर विचार करताना पूर्ण उद्योगाचा विचार करावा लागतो.
*खाजगी कंपनीच्या भांडवलाचे केलेले मूल्यांकन त्याचे बाजारमूल्य दाखवेलच असे नाही.
*सर्वच आकडेवारीचा एकत्रितपणे विचार करावा लागतो.
*कोणतीही एकच पद्धत विश्वासार्ह नसल्याने वेगवेगळ्या पद्धतीने काढलेल्या मूल्यांची तुलना करावी लागते.
*कर्जाची रक्कम नेहमीच काळजीपूर्वक पाहिली जाते.
          अशा प्रकारे अनेक शेअर्सचे मूल्य जर खूप आधी शोधण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने किचकट काम सोपे झाले असले तरी अनुभवानेच यातील बारकावे लक्षात येऊ शकतात.
उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.