FAANG
Reading Time: 4 minutes

FAANG

‘एक चुटकी सिंदूर की किमत ….’कडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपणास ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर अवघड आहे बघा. आपण गुंतवणूकदार किंवा अर्थशास्त्राची थोडीबहुत जाण असणारे असाल आणि ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर ते जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. हे ‘FAANG’ नेमकं  काय आहे  की ज्याची किंमत रमेशबाबूच नव्हे तर आपल्या सर्वाना वेळीच लक्षात यायला हवी ?

‘FAANG’ नेमकं काय आहे?

अमेरिकन स्टॉक मार्केटच्या ३१ ट्रिलीयन डॉलर एवढ्या भांडवलापैकी तब्बल १० टक्के म्हणजे जवळपास ३ ट्रिलीयन डॉलर एवढं भांडवल केवळ ‘FAANG’ चं आहे. या ‘FAANG’ मध्ये जरा वरखाली झालं तर सगळ्या स्टॉक मार्केटच्या पोटात गोळा येतो. एवढी ताकद असणारं हे प्रकरण आहे तरी काय? असा प्रश्न आपणास नक्कीच पडला असणार. तर ‘FAANG’ म्हणजे कुठल्या एका कंपनीचं नाव नाही; ही एक अशी ताकद आहे जी ५ बलाढ्य कंपन्यांची मिळून बनली आहे.

F : Facebook

A :  Amazon

A : Apple

N : Netflix

G : Google

संबंधित लेख: Netflix -नेटफ्लिक्स कंपनीच्या यशाची ७ रहस्ये

या कंपन्या एवढ्या बलाढ्य का?

या सर्व कंपन्या आपल्याला माहित आहेत. जवळपास सर्वांच्याच सर्विसेस कळत-नकळत आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतही असू. परंतु या नेमकं करतायेत काय?

फेसबुक : 

  • फेसबुक ही एक ऑनलाईन सोशल मिडिया आणि सोशल नेटवर्किंग साईट आहे. हिची स्थापना २००४ साली झाली. 
  • या कंपनीचे मुख्य उत्पन्न सोशल मीडियात प्रकाशित होत असलेल्या जाहिरातींच्या मिळकतीतून होते. तसेच फेसबुकने इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप आणि ऑक्यूलस व्हीआर यांवरही मालकी हक्क प्रस्थापित केला आहे.
  • तब्बल १११ भाषांमध्ये १३ वर्षे वयाच्या वर असणाऱ्या कुणालाही वापरण्याची परवानगी असणारं हे माध्यम आहे. 
  • फेसबुकचे आज घडीला तब्बल अडीचशे कोटी वापरकर्ते आहेत. २०१० साली सर्वात जास्त डाऊनलोड झालेले हे जगभरातले पहिले ऍप होते.

मेझॉन :

  • मेझॉन ही एक ई-कॉमर्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि क्लाऊड कंप्यूटिंग उद्योगात कार्यरत असणारी एक कंपनी आहे. जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये ऑनलाइन बुक स्टोअरच्या स्वरूपात कंपनी स्थापन केली होती. 
  • अ‍ॅमेझॉन आता बाजारातील भांडवलावर आधारित जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. 
  • कंपनीकडे फूड मार्केट, सुपर मार्केट चेन असणाऱ्या तसेच ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या अनेक सहाय्यक कंपन्या आहेत.
  • जगातल्या विविध देशांत कार्यरत असणाऱ्या या कंपनीने २०१८ साली केवळ २ दिवसात वस्तूंची डिलिव्हरी देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि तब्बल 10 कोटी ग्राहक जोडून घेतले होते. डिसेंबर २०२० मध्ये मेझॉनची मार्केट गुंतवणूक तब्बल १.६२ ट्रिलीयन एवढी होती.

हे नक्की वाचा: ॲमेझॉनचे बिजनेस मॉडेल नक्की काय आहे? 

पल :

  • पल ही कॅलिफोर्नियामधील बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी फोनटॅब्लेट आणि संगणक अशा वस्तूंच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. 
  • स्टीव्ह जॉब्स आणि इतर दोन जणांनी 1976 मध्ये त्याची स्थापना केली होती. डिसेंबर १९८० मध्ये ही कंपनी १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक करून घेण्यासाठी एका शेअर मागे २२ डॉलर एवढी किंमत घेऊन आयपीओच्या माध्यमातून सार्वजनिक झाली.
  • आज घडीला पल ही सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. 
  • २ ऑगस्ट २०१८ रोजी पल ही सर्वात पहिली कंपनी होती जीचे बाजार भांडवल १ ट्रिलीयन डॉलर इतके पोहचले होते. तेच भांडवल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल २.२ ट्रिलीयन डॉलर एवढे झाले होते. याच काळात कंपनीने २७५ बिलियन डॉलर एवढा नफा कमावला होता.

नेटफ्लिक्स :

  • नेटफ्लिक्स ही एक मीडिया पुरवठादार कंपनी आहे. ग्राहकांना चित्रपट, टीव्ही शोज आणि वेबसिरीज सारखा कंटेंट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम ही करते.
  • अलीकडेच, कंपनीने स्वतःचे चित्रपट आणि टीव्ही शोज प्रोड्यूस करायला सुरुवात केली आहे. म्हणजे केवळ प्रोडक्शन कंपनीकडून कंटेंट घेऊन सदस्यता देऊन ग्राहकांना दाखवण्यापुरती मध्यस्थाच्या भूमिकेत न राहता नेटफ्लिक्सने स्वतः तो कंटेंट बनवण्यास सुरुवात केलीय.
  • जवळपास १९० देशांत कार्यरत असणारी ही नेटफ्लिक्स, मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून गणली जातेय. जगभरात तब्बल २०० मिलियन एवढे नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर आहेत. डिसेंबर २०२० मध्ये नेटफ्लिक्सचे बाजार भांडवल २३५ बिलियन डॉलर एवढे होते.

गुगल :

  • कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली गुगल ही अमेरिकन कंपनी  इंटरनेट-आधारित सेवा आणि उत्पादने प्रदान करण्यात माहिर आहे. 
  • कंपनीची स्थापना १९८८ मध्ये लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी केली होती. गुगल ही आपल्या ‘वेब सर्च इंजिन’साठी परिचित आहे. ऑगस्ट २००४ मध्ये कंपनीने ८५ डॉलर्स प्रति शेअर दराने सुमारे २० मिलियन शेअर्स सार्वजनिक केले.
  • गूगल सर्च हे अमेरिकेचे सर्वात मोठे वेब सर्च इंजिन आहे. त्याच्या यशाने कार्य आणि उत्पादकतासर्च इंजिनच्या मोठ्या यशानंतर गुगलने गुगल डॉक्स, शीट्स, जीमेल, युट्युब यांसारख्या विविध सेवा सुविधा देणाऱ्या बाबी बाजारात आणल्या. यातून असंख्य उत्पादने तयार करण्यास चालना दिली.
  • तसेच, गुगलने अँड्रॉइड नावाची मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. ही ऑपरेटिंग सिस्टीम आजचे बहुतांश स्मार्टफोन चालवते. अखेरीस, कंपनी क्रोमबुक लॅपटॉप, पिक्सेल स्मार्टफोन तसेच गृहोपयोगी विविध स्मार्ट उपकरणे देखील तयार केली.
  • डिसेंबर २०२० मध्ये गुगलचे बाजार भांडवल जवळपास १.१८ ट्रिलीयन डॉलर एवढे होते. गुगल तिच्या ‘अल्फाबेट’ या पितृकंपनीच्या नावे ट्रेड करते.

या ‘FAANG’ ला गुंतवणूकदारांनी दुर्लक्षित का करू नये? 

आपणास माहित आहे का? या सर्व कंपन्यांची साधने, सुविधा आपण वापरत जरी असला तरीही कदाचित आपण यांनी दिलेल्या मोठ्या परताव्याविषयी आपण अनभिज्ञ असाल. खालील तक्ता पहा २०११ सालच्या सुरुवातीपासून ते २०२० च्या शेवटापर्यंत या पाच कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने परतावा दिला आहे.

कंपनीचे नाव १० वर्षातील संपूर्ण परतावा (टक्केवारीमध्ये) सरासरी वार्षिक परतावा

(टक्केवारीमध्ये)

फेसबुक ६११ २५.५
ॲपल ,२४५ २९.७
ॲमेझॉन १.७२५ ३३.७
नेटफ्लिक्स ,९९० ३५.५
गुगल/अल्फाबेट ४८८ १९.४

साध्या व्यवहारी हिशोबात सांगायचं झाल्यास, आपण जर २०१० सालच्या शेवटी नेटफ्लिक्समध्ये १०.००० डॉलर्सची गुंतवणूक केली असती तर २०२० च्या शेवटी आपणास साधारण २० पट जास्त म्हणजेच जवळपास २ लाख डॉलर्स एवढा परतावा मिळाला असता.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: FAANG in Marathi, FAANG in Marathi, FAANG Marathi, FAANG mhnaje kay?, FAANG mhanje kay?, What is FAANG?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…