Amazon Business Model: ॲमेझॉनचे बिजनेस मॉडेल नक्की काय आहे? 

Reading Time: 4 minutes

Amazon Business Model 

ऑनलाईन शॉपिंगच्या दुनियेत आघाडीवर असणाऱ्या आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांच्या ॲमेझॉन कंपनीचे बिझनेस मॉडेल (Amazon Business Model) नक्की काय आहे? खरेदीवर भरघोस ऑफर देणारी ॲमेझॉन कंपनी एवढा नफा कसा कमावते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात मिळतील. 

हे नक्की वाचा: सॅमसंग कंपनीचा यशाचा प्रवास

Amazon Business Model: ॲमेझॉनचा प्रवास 

 • ॲमेझॉनची सुरुवात 1994 सालामध्ये एका छोट्याश्या गॅरेज मध्ये झाली. तेव्हा ॲमेझॉनने पुस्तकांचे दुकान चालू केले होते. सुरूवातीला फक्त पुस्तकांची ऑनलाइन विक्री केली जायची. त्यात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत गेला. हळूहळू त्यांनी उत्पादने वाढवली, सेवांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले आणि आज ॲमेझॉन सर्व काही मिळणारे एक जागतिक दर्जाचे ऑनलाइन स्टोअर बनले.
 • ॲमेझॉनचा एक पुस्तकांचे दुकान ते ऑनलाइन स्टोअर हा प्रवास काही दिवसांत घडून आलेला नाही. जेफ बेझोसने ॲमेझॉनची स्थापना करताना त्याच्या पालकांकडील पैसे वापरले होते.
 • व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात यशाची कितीही खात्री असली तरी शाश्वती नसते. त्यात नवीन काहीतरी करायचे म्हणजे मोठी जोखीम असते. तीच जोखीम जेफ यांनी घेतली आणि ऑनलाइन विक्री ही संकल्पना वापरुन त्याद्वारे सर्वप्रथम पुस्तकं विक्री सुरू केली.
 • त्यावेळी त्यांचा हा व्यवसाय जास्त दिवस टिकणार नाही, ॲमेझॉनची भरभराट हळूहळू होईल असे बरेच काही बोलले गेले. मात्र ॲमेझॉन टिकला आणि वाढला सुद्धा.
 • ॲमेझॉन सर्व काही मिळणारे लोकप्रिय ऑनलाइन स्टोअर बनून उत्तम नफा कमवायला ॲमेझॉनला जवळपास सहा ते सात वर्ष लागली. 2001 साली ॲमेझॉन ला उत्तम फायदा मिळवता आला.
 • आज जगातील एक अग्रेसर ऑनलाइन स्टोअर मानल्या जाणार्‍या ॲमेझॉनला सुद्धा सुरुवातीच्या काळात झगडावे लागले होते. हा सुरुवातीचा काळ प्रत्येक व्यवसायात असतो तो कमी-जास्त असतो. मात्र आपण योग्य दिशेने उत्तम मेहनत  घेतली की यश आपलेच असते.   
 • एखाद्या यशस्वी व्यवसायामधून त्यांच्या चांगल्या गोष्टी जाणून घेणे आणि आपल्या व्यवसायात आणि कामात त्यांचे अनुसरण करणे यामुळे आपला व्यवसाय आणखी नावारूपाला यायला मदत होते.

Amazon Business Model: ॲमेझॉन बिजनेस मॉडेल –

समाधानी ग्राहक, उत्तम ग्राहक सेवा  –

 • कोणताही व्यवसाय हा ग्राहक केंद्रीत असला की यशस्वी ठरतोच. हेच तत्व ॲमेझॉन वापरते.
 • ॲमेझॉनने ग्राहकांची आवड काय आहे आणि नेमके काय त्यांना आवडत नाही हे समजून घेतले.
 • किफायतशीर किंमत, वेळेत वितरण, प्रॉडक्ट ट्रॅकिंगची सुविधा आणि उत्तम सूट या गोष्टीमूळे ॲमेझॉन ग्राहकांच्या पसंतीस उतरले. 
 • याचप्रमाणे ॲमेझॉन ग्राहकांना उशिरा होणारे वितरण, खराब किंवा सदोष वस्तु हे टाळण्यासाठी देखील काळजी घेते. 
 • प्रत्येक वस्तूमध्ये खूप सार्‍या व्हरायटी उपलब्ध करून देणे ही ॲमेझॉनची खासियत आहे.
 • ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या वस्तूबद्दल तक्रार असल्यास अथवा ती उत्तम असली तरीही त्यासाठी रिव्यू देता येतो आणि त्या उत्पादनाला स्टार देखील देता येतात. ज्यामुळे अन्य ग्राहकांना सुद्धा वस्तु निवडण्यास मदत होते. 
 • यामुळेच कितीतरी लोक ॲमेझॉनचे नियमित ग्राहक आहेत.

विशेष लेख: भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा

ॲमेझॉनचे बाजारातील वाढते प्राधान्य – 

 • स्पर्धात्मक किंमत, वस्तूंची निवड, उत्तम सुविधा आणि वेगवान डिलिव्हरी यामुळेच ॲमेझॉनला लोकं प्राधान्य देतात. 
 • ॲमेझॉनने एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि विविधता असलेल्या वस्तूंची उपलब्धता केल्यामुळेच ग्राहकांचा ओढा ॲमेझॉनकडे जास्त आहे.

नाविन्यपूर्ण उत्पादने –

 • सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास असणे हे प्रगतिचे लक्षण मानले जाते. 
 • बाजारामध्ये नावीन्यपूर्ण वस्तूंना नेहमीच मागणी असते. 
 • ॲमेझॉनने अ‍ॅमेझॉन प्राइम, अलेक्सा, फायर स्टिक्स सारखी नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली आणि बाजारात ते लवकरच लोकप्रिय झाले.

ॲमेझॉनची प्रमुख कार्ये –

 • डिजिटल आणि भौतिक वस्तूंची विक्री
 • डिजिटल प्लॅटफॉर्मचा सातत्याने विकास आणि सोयिस्कर डिझाइन
 • उत्तम सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था
 • विक्रेते आणि व्यावसायिक यांच्यासोबत असलेली उत्तम भागीदारी
 • प्राईम विडिओ द्वारे चित्रपट आणि सिरिज प्रदर्शित करणे

ॲमेझॉन ची प्रमुख संसाधने आणि मुख्य भागीदार –

 • ॲमेझॉनची प्रमुख संसाधने म्हणजे त्यांचे वेअरहाऊसेस, सप्लाय चेन ऑटोमेशन आणि त्यांचे सॉफ्टवेअर इंजीनियर्स हे आहेत.
 • ॲमेझॉन च्या मुख्य भागीदारांमध्ये सर्व प्रथम विक्रेते येतात, त्यानंतर लेखक, प्रकाशक, लॉजिस्टिक पार्टनर. आपल्या सर्व भागीदारांची आणि संसाधंनाची कदर करणे ही ॲमेझॉनची खासियत आहे.

ॲमेझॉनची पैसे कामावण्याची पद्धत –

ॲमेझॉनचे डिजिटल मार्केट –

 • ॲमेझॉनला सर्वात जास्त महसूल हा त्यांच्या डिजिटल मार्केट प्लेस मूळे मिळतो. 
 • ॲमेझॉनची मार्केट प्लेस हा जागतिक दर्जाचा ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक विक्रेते आपली वेगवेगळी उत्पादने विकतात आणि लाखो खरेदीदार खरेदी करतात. शिवाय विक्रेत्यांच्या उत्पादनांची जाहिरात करून देखील ॲमेझॉन उत्तम पैसे मिळवते.  

महत्वाचा लेख: भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)

ॲमेझॉन प्राईम –

 • ॲमेझॉन प्राईमची सदस्यता हा पण ॲमेझॉनसाठी एक महत्वाचा महसूल प्राप्ती करून देणारा घटक आहे. 
 • शक्यतो ॲमेझॉनचा नियमित ग्राहक असणारा प्राईम सदस्यता घेतोच. 
 • प्राईम सदस्यता घेतलेल्या ग्राहकांना काही खास सुविधा ॲमेझॉन देते. 
 • प्राईम असलेले ग्राहक जास्त खरेदी करतात त्यासाठीच ते सदस्यता घेतात. जास्त खरेदी म्हणजे जास्त उत्पन्न!
 • ग्राहकांसाठी ॲमेझॉन प्राइम द्वारे ग्राहकांना प्राईम सुविधा मिळवून दिल्या जसे की, जलद / त्याच दिवशी वितरण ( फास्टर डिलीवरी), मोफत शिपिंग, मोफत चित्रपट/ गाणे/ वेब सिरिज, मोफत वितरण( नो डिलीवरी चार्जेस) इ. सुविधा उपलब्ध आहेत.  

ॲमेझॉन वेब सर्विसेस (AWS) –

 • आयटी इनफ्रास्ट्रक्चर साठीच्या सुविधा ॲमेझॉन वेब सर्विसेस (AWS) द्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. 
 • कमी किमतीत मिळणार्‍या सुविधा ही एडब्ल्यूएस ची खासियत आहे. 
 • एडब्ल्यूएस अमेझॉनचा क्लाउड बिझिनेस म्हणून कार्यरत आहे तसेच प्रत्येकासाठी(कोणत्याही व्यवसायासाठी) कम्प्यूटिंग सुविधा प्रदान करतो.

ॲमेझॉन किंडल –

 • ॲमेझॉन किंडल हे एक उत्तम उदाहरण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ॲमेझॉन किंडल कडून फारसा नफा मिळवत नाही. हे तो एक प्रसिद्धी चे साधन म्हणून वापरतो. 
 • किंडल द्वारे आपणास वर्तमानपत्रे, ई-बुक, मासिक वाचता येतात, खरेदी करता येतात आणि डाऊनलोड सुद्धा करून ठेवता येतात.
 • काही वेळा किंडल सोबत ॲमेझॉन प्राईम चे 30 दिवसाचे सदस्यत्व मोफत मिळते. अर्थातच ग्राहक खरेदीकडे वळतो. याद्वारे आपोआपच प्राईम सदस्यता वाढतात आणि याचा उत्तम परिणाम वाढत्या विक्रीवर होतो.

ॲमेझॉन मीडिया –

 • ॲमेझॉन आधीच विडियो आणि म्यूजिक च्या मार्केटिंग मध्ये पदार्पण केलेले आहे. यात त्यांना उत्तम यश मिळाले आहे. आणि याद्वारे त्यांना चांगला आर्थिक फायदा देखील झाला.
 • ॲमेझॉनने 1998 साली इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDB) जो की टीव्ही, सेलिब्रिटी आणि चित्रपट सामग्रीचा स्त्रोत मानला जातो तो आपल्याकडे घेतला. याच्या जाहिराती आणि वर्गणी शुल्क याद्वारे कमाई होते.
 • ॲमेझॉन म्यूजिक स्टोअर देखील तेवढेच लोकप्रिय आहे. आपल्या आवडते संगीत ऐकण्यासाठी ठराविक मासिक रक्कम देऊन अनेकजण याचे सदस्य आहेत.

अशाप्रकारे ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन ठेऊन ॲमेझॉन बिजनेस मॉडेल काम करते. तर ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उत्तम पद्धतींबरोबरच उत्तम सुविधा देऊन ॲमेझॉन पैसे कमवते. व्यवसाय सुरू करायचा असला की प्रत्येक व्यवसायमधले असे छोटे मोठे बारकावे यांचे आपण निरीक्षण करायलाच हवे. आजचा हा महितीपूर्ण लेख इ-कॉमर्सच नाही तर कोणत्याही व्यवसायासाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल हे नक्की.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Amazon Business Model Marathi Mahiti, Amazon Business Model in Marathi, Amazon Business Model Marathi, Business model of Amazon Marathi

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.