‘मल्टीबॅगर स्टॉक्स (Multi-bagger Stocks)’ म्हणजे काय?
‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ हे असे इक्विटी स्टॉक्स आहेत ज्यावर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो. हे उत्तम आर्थिक स्थिरता आणि ठराविक कालावधीत वाढ असलेल्या कंपन्यांचे स्टॉक असतात. अशा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त नफा मिळू शकतो. असे स्टॉक फार कमी संख्येत आहेत आणि ते ओळखणेही काहीसे अवघड आहे.
‘मल्टीबॅगर्स स्टॉक्स’ प्रत्येकाच्या सहज लक्षात येत नाहीत कारण ते शोधण्यासाठी संपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. तसेच, मल्टी-बॅगर स्टॉक्सबाबत अवास्तव गृहितके बांधली जातात, जसे की ते गुंतवणुकीवर प्रचंड मोठा परतावा देतात किंवा कमी कालावधीत आपल्याला श्रीमंत करून देतात वगैरे.
मल्टीबॅगर होण्यासाठी कंपनीला कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात?
मल्टी-बॅगर स्टॉक (Multi-bagger Stocks) तयार करणाऱ्या कंपनीची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
१. मक्तेदारी:
- ठराविक उत्पादनाच्या बाबतीत ही कंपनी बाजारात ‘मोनोपॉली’ म्हणजेच मक्तेदारी राखून असते. बाजाराच्या उतार-चढावात मोठ्या कालावधीसाठी ती तग धरून राहिलेली असते.
- या कंपनीची उत्पादने अतिशय व्यापकपणे ग्राहकांनी स्वीकारलेली असतात.
- आपल्या उत्पादनात सातत्याने बदल आणि गरजेनुसार सुधारणा करत ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी या कंपन्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
२. कर्जाचे कमीतकमी ओझे:
- कमी कर्ज असलेल्या कंपन्या त्यांच्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत मोठी संपत्ती निर्माण करण्यास सक्षम असतात.
- कंपनीचा एक विशिष्ट विभाग कंपनीच्या एकूणच खर्चावर चांगले नियंत्रण ठेऊन असतो.
३. ठराविक कालावधीत वाढ:
- हे कंपनीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे जे मल्टी-बॅगर स्टॉक तयार करते. उत्तम आर्थिक कामगिरी आणि व्यवस्थापनाला कार्यक्षमतेने मार्गदर्शन करणार्या तज्ज्ञांच्या पाठिंब्याने ते सतत सातत्याने आपल्या वृद्धीचा आलेख चढता ठेवत असतात.
४. संसाधनांचा योग्य वापर:
- गुंतवणुकीवर सर्वोत्तम परतावा मिळविण्यासाठी, मल्टी-बॅगर स्टॉक तयार करणाऱ्या कंपन्या, प्रत्येक जोखमीचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांच्या संसाधनांचा हुशारीने वापर करतात.
- यामध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींमध्ये खुली चर्चा होत असते.
हे नक्की वाचा: Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार
५. वृद्धीची स्थिरता आणि समृद्ध योजनांमधील चढता आलेख:
- या कंपन्या शाश्वत वाढीवर विश्वास ठेवतात आणि भविष्यातील चांगल्या योजनांमध्ये त्या व्यवसायाच्या दृष्टीने वारंवार वृद्धी दर्शवतात.
- स्थिर वाढ हे ‘मल्टीबॅगर स्टॉक’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
Multi-bagger Stocks: मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी की नाही?
तुम्ही मल्टी बॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. ते केवळ तुमच्या गुंतवणुकीवर अल्पावधीतच स्थिर आणि चांगला परतावा देतात असे नाही, तर इतर समभागांच्या तुलनेत पैसे गमावण्याचा धोकाही कमी असतो.
महत्वाचा लेख: १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये जर १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता!
एकुणात काय?
गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे गुंतवण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक हे उत्तम पर्याय आहेत. परंतु, तुम्ही योग्य मल्टीबॅगर स्टॉक ओळखण्यासाठी पुरेसे सक्षम असला पाहिजे. तसेच, मल्टीबॅगर स्टॉक्स अल्पावधीतच आपल्याला प्रचंड मोठा परतावा देईल या अपेक्षेने गुंतवणूक करू नका. कारण गौतम बुद्धांनी सांगितलेय ‘अपेक्षा हे दुःखाचे मूळ कारण आहे’. किमान परताव्याची अपेक्षा ठेवा, कमाल परतावा मिळाल्यास कमालीचा आनंद उपभोगाल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies