बचत खाते म्हणजे आर्थिक नियोजनाच्या इमारतीची पायाभरणी आहे. म्युचअल फंड, RD, फिक्स्ड डेपोसिट यात पैसे गुंतवायचे असेल तर बचत खाते गरजेचे आहे, तसेच नवीन नवीन येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत खाते असायला पाहिजे. (Unused saving account information in Marathi)
असे हे बहुगुणी बचत खाते कार्यरत ठेवणे गरजेचे आहे कसे ते पाहूया.
- अनेक बँकांमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त बचत खाते बऱ्याच जणांचे असते मात्र एकापेक्षा जास्त बचत खाते असल्यास ते सांभाळण्यास कठीण जाते, आज आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत.
- अनेक बँकांमध्ये बचत खाते असल्यास किमान रक्कम खात्यात नसल्यास खातेधारकाला दंड स्वरूपात शुल्क भरावे लागते.
- तुमच्या खिशातून विनाकारण होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
बचत खात्याचे फायदे: (benefits on saving account)
- बँक त्यांच्या खातेधारकाना काही सुविधा निशुल्क देत असतात,याची माहिती करून घेणे आवश्यक असते.
उदाहरणार्थ: डिमांड ड्राफ्ट,फंड ट्रान्सफर,बिल पे सर्व्हिस इत्यादी
- काही बँक बचत खात्यामधून बिल भरण्यासाठी ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट देतात.
- वेळेवर बिल भरले जावे आणि अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये यासाठी बँकेला आगाऊ सूचना देण्याची सोय आहे, ज्याला आपण स्टँडींग इंस्ट्रक्शन म्हणतो.
इन्कम टॅक्स : (income tax)
- बचत खात्यातील रकमेवर व्याज मिळते यावर खातेधारकाला टॅक्स भरावा लागतो.
- इन्कम टॅक्स सेक्शन 80 TTA नुसार बचत खात्यातील व्याजातून जे उत्पन्न मिळते त्यातून
Rs. 10,000 पर्यंत वजावट मिळते.
- यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना व्याजाच्या उत्पनाची माहिती द्यावी लागते.
महत्वाचे : Kids Saving Account: मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे ‘किड्स सेव्हिंग अकाउंट’
निष्क्रिय बचत खाते आणि त्याचे तोटे : (Inoperative saving account)
- RBI च्या नियमाप्रमाणे एखाद्या अकाउंट मध्ये 24 महिने काहीच व्यवहार झाले नाहीत तर ते खाते निष्क्रिय खाते समजले जाते.
- अशावेळी तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.
- बँकेमध्ये जाऊन जोपर्यंत तुम्ही फॉर्म भारत नाही, KYC संबंधित कागदपत्रे जमा करत नाही तो पर्यंत खाते सुरु केले जात नाही.
- बचत खाते 10 वर्षांपर्यंत निष्क्रिय असेल तर त्यातील रक्कम आणि व्याजाचे पैसे बँकेच्या नियमाप्रमाणे आरबीआय च्या एज्युकेशन आणि अवेअरनेस फंड यामध्ये वळते केले जातात.
- अशा वेळी सुद्धा सर्व पैसे पुन्हा मिळवण्यासाठी खातेदाराला वेळ खाऊ प्रक्रियेमधून जावे लागू शकते.
दंडात्मक शुल्क : (penalty)
- बचत खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे, असे न केल्यास बँक दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावते.
हे ही वाचा : बँकेतील जुनी खाती बंद करण्याची 5 कारणे
बचत खात्यावरील व्याज: (Interest on saving account)
- बचत खात्यातील बचतीवर व्याज मिळत राहावे या हेतूने अनेक जण पैसे साठवत असतात मात्र हेच पैसे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाकल्यास व्याज जास्त मिळू शकते.
खाते निष्क्रिय होऊ नये म्हणून काय केले पाहिजे? :
- सर्वप्रथम गरज नसल्यास अनेक ठिकाणी बँकांमध्ये बचत खाते असल्यास आणि ते वापरात नसल्यास बंद करावे.
- बऱ्याच वेळा नोकरी निमित्ताने पगारासाठी बँकांमध्ये बचत खाते सुरू केले जाते आणि नवीन नोकरीत रुजू झाल्यास मागील बँकेतील बचत खाते तसेच सोडून दिले जाते. त्यामुळे तुमचे बचत खाते निष्क्रिय होऊ शकते.
- खाते निष्क्रिय होऊ नये यासाठी पैसे भरणे किंवा काढणे असे व्यवहार खात्यामध्ये झाले पाहिजे.
निष्कर्ष:
- बँकेतील बचत खाते कार्यरत ठेवून खात्यावर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ प्रत्येक खातेदाराने घेतला पाहिजे.
- बचत खाते निष्क्रिय होऊ नये यासाठी खात्यामध्ये व्यवहार करत राहणे गरजेचे आहे.
- बचत खाते निष्क्रिय झाल्यास होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि मानसिक त्रासाचा विचार करून लेखांमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा नक्कीच विचार करावा.