Reading Time: 2 minutes

लहानपणापासून पैशाचं आकर्षण तर सर्वांनाच राहिलेलं  आहे. पण जसं जसं वय वाढायला लागलं तसं तसं रुपयांमधली मोठी नोट आणि डॉलर्सच आकर्षण सर्वाधिक राहिलं असणार.  रुपयांमध्ये पैसे कमवण्यापेक्षा डॉलर मध्ये पैसे कमवावेत हेही प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि या मागचं कारण अगदी साहजिकच आहे कारण एका डॉलरच्या बदल्यात 80 85 रुपये मिळतात.आता खूप साऱ्या जणांना हेही आठवत असेल की दहा वर्षांपूर्वी एका डॉलरच्या बदल्यामध्ये 50 ते 55 रुपये मिळायचे

याचाच अर्थ हा की रुपया युरो डॉलर यांचा भाव सतत बदलत असतो. याचा माझ्याशी काय संबंध असंही काही जणांना वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होत असतो.

सुरुवात करूया रुपयाचं मूल्य कसं ठरतं आणि ते नेहमी अमेरिकन डॉलरच्या तुलनेतच का पाहिलं जातं इथपासून.

अमेरिकन डॉलर आणि युरोपीयन युनियनमधील देशांचं युरो ही दोन चलनं आंतरराष्ट्रीय बाजारात लोकप्रिय आहेत. एक तर ही चलनं सगळ्यात स्थिर मानली जातात. अनेक देशांमध्ये या चलनात व्यवहार होतात. म्हणूनच डॉलर आणि युरो ही दोन चलनी नाणी आहेत. त्यातही डॉलर थोडा उजवा. कारण, आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये असलेल्या एकूण ठेवींपैकी 64% ठेवी अमेरिकन डॉलरमध्ये आहेत. आणि जवळ जवळ 20% ठेवी युरो चलनात आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापारात 85% व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. जगातली 40% कर्ज अमेरिकन डॉलरमध्ये दिली जातात.

आपण लहानपणी क्रिकेट खेळताना  जसं ‘माझी बॅट माझी बॅटिंग’ असा नियम असायचा, तसंच या चलन बाजाराचं आहे. अमेरिकन डॉलरचं वर्चस्व इतर जवळ जवळ 180 देशांनी मान्य केलेलं आहे. यात आता थोडा बदल करण्याचा प्रयत्न होतोय पण तो आपला विषय नाही.

रुपयाचा दर कसा ठरतो? तो कोण ठरवतो? मुक्त अर्थव्यवस्था आहे म्हणल्यावर  या दरावर कुणा व्यक्ती, संस्था किंवा देशाचं नियंत्रण नसायला पाहिजे.पण तसं  नाही, दर ठरवताना मागणी आणि पुरवठ्याचाच नियम लावला जातो. म्हणजे एखाद्या वस्तूला जास्त मागणी असेल तर तिचा भाव कसा वधारतो, तसंच चलनाचं आहे. आपल्या देशात किती अमेरिकन डॉलर आले आणि देशातून किती डॉलर बाहेर गेले यावरून हा विनिमय दर ठरत असतो.

रुपया घसरतोय याचा थेट अर्थ आपली अमेरिकेतून होणारी आयात वाढलीय. त्या तुलनेत निर्यात कमी होतेय असाच आहे.

एक उदाहरण बघू या,

A  B  C या तीन कंपन्या आहेत ज्यांना भारतात गुंतवणूक करायची आहे. या कंपनी खूप सारे डॉलर्स सोबत घेऊ येतील पण भारतात व्यवहार करताना त्यांना डॉलर मध्ये नाही करता येणार त्यासाठी याना रुपयेच लागणार आहेत. म्हणजेच काय अशावेळेस मागणी आहे ती भारतीय रुपयाची. म्हणून मग मार्केट मध्ये रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढते. मग तुम्ही म्हणाल कि १ रुपया = ८० डॉलर अशी का नाही होत? तर हि रुपयाची मागणी फक्त आपल्या देशात वाढत आहे, जगभर नाही हे लक्षात घ्या. म्हणून डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला इतकच आपण म्हणू शकतो. 

पण जगभर डॉलरची मागणी सातत्याने चढी असते कारण  Doller is safe asset अशी सर्व देशांची धारणा आहे.

LOCKDOWN मधून सावरत असताना रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि सावरू पाहणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला परत दोलायमान केलं. या युद्धामुळे कच्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घाट झाली आणि आर्थिक संकट गडद होत गेलं. डॉलरवर विश्वास वाढत गेला आणि बाकी सर्व चलन वेगाने घसरली. 

यासोबतच अमेरिकन बाजारात ठेवींवरचे व्याजदर वाढतायत. त्यामुळे तिथल्या बाँड मार्केटमध्ये भारताच्या तुलनेत गुंतवणूक जास्त होतेय. आणि

भारतीय गुंतवणूकदार संस्थाही आपले पैसे अमेरिकेत गुंतवण्याच्या मागे आहेत. तुलनेनं अमेरिकेहून भारतात होणारी गुंतवणूक नगण्य आहे. त्यामुळे रुपयाचं मूल्य कमी होतंय.

एक लक्षात घ्या अमेरिकन  बाजार हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानला जातो. आणि अमेरिकन डॉलर सर्वात स्थिर. त्यामुळे मूळातच गुंतवणूकदारांचा ओढा या बाजारात असतो. तसेच बहुतेक देशांची गुंतवणूक अमेरिकेत एकवटलीय. 

थोडक्यात ज्याची मागणी जास्त त्याची किंमत जास्त. अगदी तसच या चलनाच आहे म्ह्णून रुपया, युरो , डॉलर यांचा भाव सतत बदलत असतो.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.