Reading Time: 3 minutes

41. बाजार सुविधा पायाभूत संस्था (MIIs): भांडवल बाजारातील व्यवहार सुरळीतपणे पार पडावेत म्हणून ज्या संस्था मोलाची भूमिका बजावतात त्यांना बाजार सुविधा पायाभूत संस्था असे म्हणतात. यात शेअरबाजार, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कॉर्पोरेशन यासारख्या संस्थाचा समावेश होतो. यामुळेच खात्रीशीर आणि पारदर्शक पद्धतीने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा भांडवल बाजारावरील विश्वास धृढ होतो. गुंतवणूकदारांच्या हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून सेबी सारखे नियामक या संस्थांचे नियमन करतात. त्यामुळेच या संस्था व्यवहार खात्रीपूर्वक पारदर्शक पद्धतीने होतील त्यातून गुंतवणूकदारांचे हीत जपलं जाईल याची काळजी घेतात. बाजारातील कार्य सुरळीत पार पाडली जातील, जोखीम तीव्रता कमी होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल याची काळजी घेतात.
●शेअरबाजार: शेअरबाजार हा एक असा मंच आहे जेथे गुंतवणूकदार विविध चल आर्थिक मालमत्तेचे म्हणजे शेअर्स, कर्जरोखे, डिरिव्हेटिव या सारख्या साधनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा भांडवल बाजारावरील विश्वास वाढतो. ज्या मंचावर गुंतवणूकदारांना आर्थिक साधनांची खरेदीविक्री करता येते त्यास ट्रेडिंग प्लँटफॉर्म असे म्हणतात. यामुळे गुंतवणूकदारांना पैसे देऊन खरेदी करणे किंवा त्यांच्याकडे असलेल्या गुंतवणूक साधनांची विक्री करता येते. बाजारात उपलब्ध मागणी आणि पुरवठा यानुसार मालमत्ताचे बाजारभाव आपोआपच ठरवले जातात. बाजारातील व्यवहारांवर बाजार व्यवस्थापनाचे लक्ष असते तसेच हे सर्व व्यवहार सेबी या नियमकांच्या देखरेखीखाली केले जातात. त्यामुळे त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता नसते, जर तसे काही संकेत मिळाले तर त्यानुसार उपाय योजले जातात. असे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यावर कंपन्या भांडवल बाजारातून शेअर्स, रोखे यांच्या माध्यमातून भांडवल गोळा करतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासास हातभार लागतो.

भारतातील विविध भांडवल बाजार-
●राष्ट्रीय शेअरबाजार (NSE):
★सन 1992 साली स्थापन झालेला, सर्वाधिक उलाढाल असलेला भारतातील सर्वात मोठा भांडवल बाजार,
★निफ्टी फिफ्टी हा विविध 50 आघाडीच्या कंपन्यांचा, विविध उद्योग प्रकारांचा बाजार दिशादर्शक निर्देशांक,
★सुरुवातीपासूनच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण व्यवहार करणारा बाजार, यामुळे व्यवहारात पारदर्शकता, गती आणि तत्परता,
★सर्वाधिक डिरिव्हेटिव व्यवहार करणारा मंच.
●मुंबई शेअरबाजार (BSE):
★सन 1875 साली स्थापना झालेला आशियातील सर्वात जुना भांडवल बाजार,
★विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 30 कंपन्यांचा सेन्सेक्स हा सुप्रसिद्ध निर्देशांक,
★विविध मालमत्ता व्यवहारांसाठी वेगळे व्यवहारमंच उपलब्ध.
●मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX):
★सोने, कच्चे तेल, खनिजे या मधील व्यवहार करण्यासाठी निर्मिलेला खास मंच,
★यावर आधारित उद्योग आणि गुंतवणूकदार यांना त्या मालमत्तांच्या भावातील फरकाने होऊ शकणारे नुकसान टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या हेजिंगसाठी उपयुक्त.
●नॅशनल कमोडिटी अँड डिरिव्हेटिव एक्सचेंज (NCDEX):
★गहू, बार्ली, चना, सोयाबीन या सारख्या प्रामुख्याने कृषी आधारित कमोडिटीमधील व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेला मंच,
★यामुळे किंमत स्थिर राहून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते आणि अस्थिर परिस्थितीस तोंड देता येते.
●मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (MSEI):
●तुलनेने अलिकडे चालू झालेल्या या बाजारात शेअर्स, बॉण्ड आणि चलन यातील व्यवहार तेथे होत आहेत.
भांडवल बाजारांमुळे गुंतवणूकदारांना होणारे फायदे-
●पारदर्शकता: होणारे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात, खरेदी आणि विक्रीच्या भावात पारदर्शकता असते.
●सुरक्षितता: बाजार यंत्रणेवर सेबी लक्ष ठेवून असल्याने गुंतवणूकदारांचे हित जपले जाऊन बाजारात मोठी गडबड होणार नाही यांची काळजी घेतली जाते.
●विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक संधी: यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स, बॉण्ड, वस्तू , चलन अशा विविध प्रकारात आणि त्याच्या डिरिव्हेटिव उत्पादनात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
●आंतरराष्ट्रीय ओळख: हे बाजार जगप्रसिद्ध असल्याने गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त होते.
डिपॉझिटरी: डिपॉझिटरीमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या मालमत्तांचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे कागदी स्वरूपात कोणत्याही मालमत्ता बाळगण्याची आता जरुर राहिली नाही. त्यांची चोरी होणे, हरवणे, फसवणूक होणे यावर आळा बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित स्वरूपात राहील असे ठिकाण प्राप्त होते यामुळे ती हरवणे, फसवणूक होणे हे धोके दूर होतात. खरेदी विक्री करणे सुलभ आणि कमी वेळात होते. कंपनीकडून भागधारकांना मिळणारे लाभ
जसे डिव्हिडंड, बोनस, दर्शनी मूल्य विभागणी यासारखे फायदे त्वरित मिळतात. जरूर असल्यास ही मालमत्ता गहाण ठेवता येते. यातील मालकी आणि व्यवहार यांची नोंद ठेवल्याने सर्व व्यवहारात पारदर्शकता येते आणि व्यवहारातील जबाबदारी निश्चित होते.
भारतातील दोन डिपॉझिटरीज:
●नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL): सन 1996 साली स्थापना झाली आणि मालमत्ता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवण्याची सोय प्रथमच उपलब्ध झाली. गुंतवणूकदार आणि भांडवलबाजार यामध्ये मालमत्तेचत होणारी देवाणघेवाण सुलभ झाली. याचबरोबर इ वोटिंग, इ व्हेरिफिकेशन सुविधा उपलब्ध झाल्या.
●सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) : सन 1999 साली स्थापना, यामुळे मालमत्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून तिचे समायोजन करणे सुलभ होईल असा अधिकचा पर्याय उपलब्ध झाला. डिव्हिडंड बोनस, राईट्स मिळणे सुलभ झाले. गुंतवणूकदारांना डी मॅट खाते सहज उघडता येणे शक्य झाले.
डिपॉझिटरीचे गुंतवणूकदारांना होणारे फायदे:
●सुरक्षिततता
●सुलभता
●व्यवस्थापन खर्चात कपात
●पारदर्शकता
भांडवल बाजारातील व्यवहाराची सर्वसाधारण पद्धत:
●गुंतवणूकदार दलालामार्फत त्याची खरेदी अथवा विक्रीची ऑर्डर बाजारास देतात,
●किंमत आणि उलाढाल यानुसार ऑर्डर जुळल्या जातात.
●झालेले व्यवहार बाजारात नोंदले जातात.
●डिपॉझिटरीमार्फत शेअर्स किंवा अन्य मालमत्ता विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे पाठवल्या जातात.
●व्यवहारपूर्ण होऊन त्याची यथायोग्य नोंद केली जाते.
रजिस्टार अँड ट्रान्सफर एजंट: भांडवल बाजारात शेअरबाजाराच्या माध्यमातून थेट किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष गुंतवणूक करताना काही प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्या लागतात, व्यवहार नोंद ठेवावी लागते. रजिस्टार ऍण्ड ट्रान्सफर एजंट कंपनी आणि म्युच्युअल फंडाच्यावतीने ते कार्य करतात थोडक्यात ते आर्थिक सेवा पुरवणारे सेवेकरी आहेत. कंपन्या म्युच्युअल फंड आणि गुंतवणूकदार यातील दुवा आहेत. ते,
●गुंतवणूकदारांची नोंद ठेवतात
●शेअर्स विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे पाठवल्याची युनिट मोडून त्यांचे पैसे घेतले आशा व्यवहारांची नोंद ठेवतात.
●डिव्हिडंड व्याज गुंतवणूकदारांना पाठवतात.
●गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवतात.
●सेबीच्या सूचनेनुसार नियमकाना आवश्यक त्या सर्व गोष्टी करतात.
अशा प्रकारे गुंतवणूकदार आणि कंपनी किंवा म्युच्युअल फंड यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. विविध कायद्यानुसार आवश्यक अशा सर्व गोष्टी ते करत असतात. ते,
●KYC करतात त्यातील बदलांची नोंद घेतात.
●हरवलेल्या प्रमाणपत्राच्या बदल्यात दुसरी प्रमाणपत्र जारी करतात.
●बदललेल्या मालकीची नोंद ठेवतात.
●ठरवलेल्या तारखेस असलेल्या धारकाची माहिती कंपनीस देऊन त्या तारखेस देय कार्पोरेट बेनिफिट गुंतवणूकदारास पोहोचवतात.
●तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करतात.
●गुंतवणूकदारांना सेवेसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देतात. (समाप्त)

सारथी या सेबीच्या अँपवर उपलब्ध असलेल्या माहितीचा भावानुवाद!

©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…