₹ २००० च्या नोटांची छपाई बंद; ₹ २०० ची नोट पुढील महिन्यात चलनात

Reading Time: < 1 minute

गेल्या पाच महिन्यांपासून या नोटांची छपाई केली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच २०० रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ती चलनात येईल, असे सांगितले जाते. या नोटांची छपाई वेगाने सुरू आहे.

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पाच महिन्यांपूर्वीच या नोटांची छपाई बंद केली आहे, अशी माहिती सूत्रांकड़ून देण्यात आली आहे. तर २०० रुपयांची नवी नोट पुढील महिन्यात चलनात आणली जाणार आहे. नोटांची छपाई वेगाने सुरू आहे, अशी माहितीही आरबीआयच्या सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर आरबीआयने ७.४ लाख कोटी रुपये मूल्याच्या ३.७ अब्ज २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर १००० रुपयांच्या ६.३ अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या, अशी माहिती आरबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. चलनपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आरबीआयने जूनमध्येच २०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.२०० रुपयांच्या नवीन नोटा पुढील महिन्यात चलनात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नोटा बाजारात आल्यास चलन मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यास मदतगार ठरणार आहे, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडून कमी मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याने रिझर्व्ह बँकेकडून बँकांना कमी प्रमाणात नोटांचा पुरवठा होत आहे. आता २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर देवाण-घेवाणीच्या व्यवहारांमध्ये सुसूत्रता येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *