Reading Time: 4 minutes

शेअर बाजाराशी मैत्री,— करावी कशी

 

मित्रहो, ’शेअर बाजार’ या नुसत्या शब्दानेच बहुतेकांच्य मनांत कुतुहल, आकर्षण, भीती अशा अनेक भावना येतात. कोणाला ती जादुची छडी वाटते, कोणासाठी ती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असते, तर एखाद्याने अर्धवट माहितीमुळॆ स्वत:चे हात पाय तोंड पोळुनही घेतलेले असते.  ह्या अशा प्रत्येकाबरोबर हे हितगुज करताना मला आनंद होत आहे.

असाच एकदा माझ्या सौ. आत्याने खुप आग्रह केल्याने तिच्या कार्यालयातल्या भिशी ग्रुपबरोबर बोलायची वेळ आली.. ———समजा पुढच्या वेळी ही भिशी तुमच्या घरी आहे आणि मेनु आहे ईडली-सांबार, —आता ईडली करण्याचे तुमच्या समोर 03 पर्याय आहेत (1) तांदुळ/डाळ भिजत घालुन ती वाटुन तीचे पीठ करुन (2) शेजारच्या दुकानातुन ओले तयार पीठ आणुन किंवा (3) डायरेक्ट ईडल्याच आयत्या आणुन — “आत्या, आता मला सांग, खर्चाच्या दृष्टीने सर्वात स्वस्त पर्याय कोणता आणि सर्वात महाग पर्याय कोणता ??”  मी सुरवात केली — विषेष वेळ न लावता उत्तर आले आणि ते ही एकमताने. “अरे, घरी केलेली कोणतीही वस्तु स्वस्तच पडणार विकत आणलेल्यापेक्षा, आता यात नविन ते काय सांगितलेस?”

 

घरचे की विकतचे या प्रश्नावर माझी उच्चाधिकारावर असलेली सौ. आत्याच नव्हे तर आमची बागकाम करणारी सौ. जनाबाई आणि नाही कशाला, अगदी तुम्हीसुद्धा हाच वर व्यक्त केलेला स्वर लावणार हे नक्की. या परिस्थितींत माझा प्रश्न असा आहे की मग आपण हाच, (पैसे वाचविण्यासाठी वस्तु घरी बनविण्याचा) तर्क पोळी-भाजी, लोणची,पापड अशा खाद्य पदार्थांपुरताच मर्यादित का ठेवतो ? आपण आपल्याला दररोज लागणारे वीज, पेट्रोल, साबण, चहा पावडर, कोस्मेटीक्स आणि ओढत असल्यास सिगारेट ई. घरी का नाही बनवत? — गोंधळळात ना?? थांबा, सांगतो, स्पष्ट करतो, मला काय म्हणायचे ते.   

वस्तु घरी बनविणे म्हणजे तरी काय हो?? त्या वस्तुचे उत्पादन स्वत: मालक या नात्याने करणे. नाही का? मग जर आपण वीज, पेट्रोल, साबण, — अशा विविध कंपन्यांचे मालक असु तर ? बहार येइल की नाही ?? ह्या सगळ्याच गोष्टी अगदी फुकट नव्हे पण नक्कीच भरपुर स्वस्त पडतील .–गोंधळुन जाण्यसारखे काय आहे ?? एवीतेवी आपल्यातल्या प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या पतपेढीचे  शेअर्स असतातच, तसेच फक्त वीज, पेट्रोल, साबण ई. बनविणाया कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे. झाले, आपण अशा  कंपन्यांचे मालक झालो की नाही ??. नाही कळाले ? आणखीन स्पष्ट करतो ?? चला—

आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा पेट्रोल चा विचार करु. आजचा भाव रु.80/लिटर आहे असे घटकाभर गृहित धरा. उद्या तो रु. 100/लिटर झाला —काय होईल ?? टी.व्ही., पेपर्स सगळीकडॆ त्याच ठराविक शब्दांतल्या (कंबरडॆ मोडले, आगीत तेल वगैरे) बातम्या येतील, फ़ेसबूकवर नवीन कार्टुन्स लोड होतील, राजकारणी लोक सोयिस्कर भुमिका घेतील. मुख्य म्हणजे तुमच्या खिशाला भोक पडेल, ते या कशानेही शिवले जाणार नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपुर्वक वाचा, त्यावर एकदा नव्हे तर दहादा विचार करा, तर मी काय म्हणत होत्तो — हां, तुमचा तोटा झाला हे तर निश्चित आहे  तसेच कोणाचा तरी फायदा झालाच असणार हे ही पक्के आहे, कारण ’पंत गेले म्हणजेच राव चढले’ नाही का ? मग मग फायदा कुणाचा झाला ?? — या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर आहे ’पॆट्रोल उत्पादक अशा तेलकंपन्यांचा !!!”— ह्या दरवाढीमुळे सहाजिकच त्यांना अधिक पैसा मिळ्णार आहे जो त्यांचा एकुण नफा वाढ्वेल. आता ह्या उदाहरणा्शी संबंधीत ONGC किंवा केर्न अशा तेल कंपन्यांना झालेला फायदा परत आपल्या खिशात कसा येणार ? अर्थातच त्यांचे शेअरहोल्डर बनुनच, ह्या कंपन्या डिव्हीडंड, बोनस शेअर्स, यासारख्या माध्यमातुन असा झालेला फायदा शेअरहोल्डर्स पर्यंत पोचवतीलच पण त्या्च्याही आधीच बाजार या सकारात्मक गोष्टींची नोंद घेउन शेअरअमध्ये घसघशीत वाढही नोंदवेल.

समजा श्री. विनित ह्या व्यवसायिकाला व्यवसायानिमित्ताने  प्रतिवर्षी 1000 लिटर पेट्रोल लागते. (म्हणजेच आजच्या बाजारभावाने रु. 75,000 चे).  श्री. विनित ह्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर बाजारातुन  ONGC या कंपनीचे जवळपास तेवढ्याच म्हणजेच रु. 75,000 चे शेअर्स विकत घेतले. आता पुढे जाउन बरोब्बर 01 वर्षाने पेट्रोलचे भाव जर रु.92/लिटर असतील तर सामान्यपणे त्यांना त्याच कामासाठी पेट्रोलवर रु. 92,000 मोजावे लागतील. पण वरील तर्काप्रमाणे मी ग्वाही देतो की त्यांच्याकडील शेअर्सची किंमतही त्याच प्रमाणांत किंवा खरे म्हणजे थोडी अधिकच वाढ्ल्याने या दरवाढीचा फटका श्री. विनित यांना अजिबात बसणार नाही,

आपण आपले 1000 रु. बेकेत व्याजाने ठेवतो तेंव्हा आपल्याला किती रु. व्याज मिळते हे मी सांगायला नकोच, त्या पेक्षा मी मगापासुन सतत ज्या कंपन्यांविषयी लिहितो आहे त्यांतल्या काहींची फायद्याची ताजी आणि अधिकृत आकडेवारी देतो. आपली स्टेट बॆक तिच्या प्रत्येक 10 रु. च्या शेअरमागे रु.184 एवढा नफा (उपार्जन) मिळविते, रिलायन्स च्या बाबत हाच आकडा रु.61 एवढा आहे. टीसीएस प्रतिशेअर (01 रु.चा,रु.10 चा नव्हे) नफा 53 रुपये आणि हिंदुस्थान  लीव्हरचा (पुन्हा शेअर रु. 01 चा) रु.12.46 एवढा प्रचंड आहे. येथे मी केवळ काही निवडक उदाहरणे केवळ नमुना म्हणुन घेतली आहेत. ह्या कंपन्यांची आपापसात तुलना करणे अजिबातच चुकीचे ठरेल मात्र आपल्याला मिळ्णाया व्याजाच्या दराची तुलना यांच्या मिळकतीची जरुर करता येइल आणि आपण ती करावीच. लक्षांत घेण्याची गोष्ट ही की ह्या सर्व कंपन्या हा असा ’दाबुन’ नफा काल ,परवा नव्हे तर वर्षानुवर्षे पेक्षा दशकानुदशके अव्याहतपणे मिळवत आहेत.

तुम्ही आपल्याकडील सुपिक जमीन स्वत: काहीही न करता दुसयास कसावयास देणाया शेतकयाची संभावना कशी कराल?? आता राग मानु नका, पण खरे म्हणजे बेंकेत एफ.डी ठेवणारे आपणही याच शेतकयाच्या जातकुळीतले नाही काय? दोघेही त्यांच्याकडील   एकमेव उपलब्ध ऐवज, ज्यातुन अक्षरश: विश्व निर्माण करता येते, त्याचा वापर फक्त दुसयाला देण्यासाठी करतात. एक आपली जमीन दुसयाला वापरावयाला देतो आणि दुसरा आपले पैसे.!!!

आपले दिलेले असे आपलेच पैसे वापरुन समाजातील उद्यमशील वर्ग म्हणजेच टाटा, बिर्ला अणि अंबानी ई. मंड्ळी कारखाने उभारतात, उत्पादनक्षमता वाढवितात आणि बाजार त्यांच्या वस्तुंनी भरुन टाकतात. त्यातुन होणाया नफ्यांतुनच आपल्याला किती व्याज दर द्यावयाला परवडेल हे ही तेच ठरवितात आणि आपण अशा त्यांनी ’दिलेल्या’ व्याजातुन आपल्याला मिळालेले उत्पन्न त्यांच्याच घेतलेल्या उत्पादनांच्या किंमतीतुन त्यांना इमानईतबारे साभार घरपोच करतो हे कधी आपल्या लक्षांत आले आहे का ??

सर्वसामान्य माणसे या कंपन्यांच्या नवनविन आणि गुणवत्तापुर्ण उत्पादनांची भुरळ पडुन ती विश्वासाने नेहमीच विकत घेतात. मात्र या कंपन्याची अशी उत्पादने सातत्याने बाजारांत आणण्याची, ती खपविण्याची आणि त्यापासुन अपरंपार फायदा मिळविण्याची त्या वर्षानुवर्षे बाळगुन असलेली अजोड क्षमता असा सर्वसामान्य माणुस विकत घेताना अपवादानेच दिसतो. अशी क्षमता विकत घेणे म्हणजेच दुसरे तिसरे काही नसुन ह्या कंपन्याचे शेअर्स विकत घेणे होय.

विचारसरणीच्या ह्याच फरकामुळॆ काही लोक त्यांच्या उद्दीष्टांकडॆ ’लिफ्ट’ मधुन जाताना दिसतात आणि आपण मात्र महागाईच्या नावाने धापा टाकत जिन्याने चढ्त असतो.

विचार बदला — नशिब बदलेल’ हे सत्पुरुष वचन आपण ऐकलेच आहे, ते अंमलांत कधी आणावयाचे ते ही आपल्याच हाती आहे नाही का ?

98 50 503 503.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…