Reading Time: 3 minutes

मागील वर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर लोकांमधून विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. यावेळी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करत असताना जनतेला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

महागाई आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे सर्वसामान्य माणसाला कराच्या रूपात काही सवलती देण्यात येतील अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराच्या किंमतीत पडझड झाल्याचे आपल्याला दिसून येतं. मागील 10 वर्षांमध्ये अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दहा वर्षात निफ्टी कमी झाल्याचे दिसून येत. 

आपण 10 वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पाची माहिती घेत असताना अर्थसंकल्प सादर होणाऱ्या दिवशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त झाली नसल्याचं दिसून येत. 10 वर्षांपैकी 8 वर्षांमध्ये नफा आणि तोटा हा 2% पेक्षा जास्त नाही. आपण मागील 10 वर्षांमधील अर्थसंकल्पाच्या दिवशी आलेल्या प्रतिक्रियेबद्दल जाणून घेऊयात. 

  1. अर्थसंकल्प 2013 – 
  • 2013 मध्ये युपीए सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते. त्यांनी 28 फेब्रुवारी 2013 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. 
  • तो अर्थसंकल्प शेअर बाजारात प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला. 2009 नंतरच्या अर्थसंकल्पीय दिवसाची सर्वात वाईट कामगिरी या दिवशी नोंदवण्यात आली होती. 2% तोट्यासह निफ्टी या अर्थसंकल्पाच्या दिवशी खाली आला होता.
  1. अर्थसंकल्प 2014 – 
  •  2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार निवडण्यात आले होते. यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 10 जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 
  • या अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टीची किरकोळ विक्री झाली होती आणि 0.2% च्या तोट्याने तो बंद झाला होता. 

नक्की वाचा : Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

  1. अर्थसंकल्प 2015 – 
  • वर्ष 2015 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला होता. शेअर बाजाराने काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 
  • या दिवशी शेअर बाजारात 0.7% वाढ झाली होती. त्यानंतर निफ्टीमध्ये विक्री झाली आणि एकाच महिन्यात परत 4.6% ने घट झाली. 
  1. अर्थसंकल्प २०१६ – 
  • अर्थसंकल्प 2016 हे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच सादर केला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टी 0.6% च्या तोट्यात बंद झाला. 
  • अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होत. त्यावेळी निफ्टीने 10% पेक्षा जास्त नफा नोंदवला. 2011 नंतरचा सर्वात जास्त नफा झाला होता. 
  1. अर्थसंकल्प 2017 – 
  • अर्थसंकल्प 2017 मांडताना एक नवीन पद्धतीचे पालन करण्यात आलं होते. यावर्षी स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा पूर्णपणे बंद करण्यात आली. 
  • सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या शेवटी सादर केला जातो पण यावर्षीपासून तो 1 फेब्रुवारीला सादर करण्यात यायला लागला. शेअर बाजाराने या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तो दिवस चांगल्या वाढीसह संपला. या दिवशी शेअर बाजारात 1.8% वाढ नोंदवण्यात आली होती. 

नक्की वाचा : Technical Analysis: शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्व

  1. अर्थसंकल्प 2018 – 
  • वर्ष 2018 मधील अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतरच हा देशातील पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. 
  • हा अर्थसंकल्प शेअर बाजारात तेजी आणण्यात अयशस्वी झाला आणि शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 0.2% चे किरकोळ नुकसान सहन करावे लागले. या अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले. एका महिन्यात निफ्टीमध्ये 6% ची घसरण झाली होती. 
  1. अर्थसंकल्प 2019 – 
  • 2019 चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री असताना सादर केला होता. हा केंद्रीय अर्थसंकल्प शेअर बाजारावर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला होता. 
  • या दिवशी निफ्टी 1.1% तोट्यासह बंद झाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एका महिन्यातच निफ्टी हा 8% घसरला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण तयार झालं. 

नक्की वाचा : Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी

  1. अर्थसंकल्प 2020 – 
  • अर्थसंकल्प 2020 हा निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून दुसरा अर्थसंकल्प सादर केला होता. 
  • अर्थसंकल्पाच्या दिवशीच निफ्टी 2.5% घसरला. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी हा दिवस नकारात्मक होता. 
  1. अर्थसंकल्प 2021 – 
  • अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून आधीचे दोन अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक पार पडले. पण 2021 चा अर्थसंकल्प सादर करताना शेअर बाजारात अतिशय सकारात्मक वातावरण होते. 
  • शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असल्यामुळे निफ्टी हा 4.7% ने वाढून शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले होते. 
  1. अर्थसंकल्प 2022 – 
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टी दुसऱ्यांदा वाढला आणि या अर्थसंकल्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 
  • अर्थसंकल्पीय दिवसात निफ्टी मध्ये 1.4% ने वाढ झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.

    निष्कर्ष : 
  • अर्थसंकल्प दरवर्षी केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांकडून सादर केला जात असतो. त्यामध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा परिणाम शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. 
  • या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य माणसांपासून ते उद्योजक सर्वांबाबतच्या दररोजच् घडणाऱ्या घडामोडींवर परिणाम होतो. त्यामुळे आपणही शेअर बाजाराची माहिती समजून घ्यायला हवी. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutes पहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 महत्वपूर्ण तरतुदी

Reading Time: 4 minutes अर्थसंकल्प म्हणजे नवीन वर्षाच्या काळात सरकारच्या तिजोरीत प्रामुख्याने कररूपाने पडणारी भर आणि…

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

Income Tax – जुनं ते सोनं , मग नवीन ते काय ?

Reading Time: 2 minutes अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. नवीन करप्रणाली मध्ये अनेक…