Family Budget
https://bit.ly/2NQiUMo
Reading Time: 3 minutes

Family Budget

कुटुंबाचा अर्थसंकल्प (Family Budget) तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळलं जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

हे नक्की वाचा:  पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

Family Budget: कौटुंबिक अर्थसंकल्पाची तयारी:

१. अर्थसंकल्प कागदावर लिहिणे:-

 • मन हे उनाड, उधळलेल्या घोड्याप्रमाणे असते. मनात सतत ‘संकल्प’ सुरू असतात, पण ते प्रत्यक्षात उतरत नाहीत कारण ते मनातल्या मनात विरून जातात. त्यातून व्यक्तीला प्रत्यक्षात प्रेरणा, चालना मिळत नाही. म्हणून आपला अर्थसंकल्प कागदावर, डायरीत किंवा मोबाईलमध्ये नोट्स ऍपवर वा कम्प्युटर, लॅपटॉपमध्ये लिहावा.
 • जेव्हा कुठली गोष्ट व्यक्ती बसून लिहिते, आखणी करते तेव्हा मनाला एक संदेश मिळतो की ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची आहे. त्यानंतर मन त्याप्रमाणे वागू लागतं. व्यक्ती तो अर्थसंकल्प पाळू लागते. म्हणून प्रत्यक्ष आपला अर्थसंकल्प लिहून काढणे अत्यंत महत्त्वाचं असतं. मनातल्या मनात ठेवू नये. कारण त्याचा फायदा होणार नाही.

२. अर्थसंकल्पाला योग्य नाव देणे:-

 • शेक्सपिअरने म्हटलं आहे नावात काय आहे? पण खरं तर नावातच सर्वकाही आहे म्हणूनच आपलं ‘नाव व्हावं’ म्हणून जो तो झटत असतो. त्यामुळे आपण आपल्या घरासाठी तयार केलेल्या अर्थसंकल्पाला नाव देणं आवश्यक आहे.
 • जसं माझा मासिक अर्थसंकल्प, घराचं मासिक  बजेट, इत्यादी.  नाव दिलं की तुमच्या अर्थसंकल्पाला आपोआपच तुम्ही गांभीर्याने घ्यायला सुरुवात कराल.

हे नक्की वाचा: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन 

३. अर्थसंकल्पाचा उद्देश:-

 • आपल्याला अर्थसंकल्प कश्यासाठी तयार करायचंय हे कारण, उद्देश लिहिणं गरजेचं असतं. यामुळे मनात स्पष्टता निर्माण होईल.
 • उदा. स्वतःचं उत्पन्न योग्यप्रकारे खर्च करायचंय किंवा मासिक हप्ते वेळेत भरण्यासाठी बजेट करायचंय, बचत वाढविण्यासाठी बजेट करायचंय, इमर्जन्सी फ़ंड जवळ असावा म्हणून बजेट करायचंय, व्यर्थ खर्च कुठे होतो? त्याला कुठे कसा आळा घालता येईल? हे बघण्यासाठी अर्थसंकल्प करायचाय अशा अनेक प्रकारचे असू शकतात .
 • तुमच्या मूळ उद्देशाचा मसुदा तयार असणं आवश्यक आहे. अन्यथा मूळ उद्देश बाजूलाच पडेल व अर्थसंकल्प फक्त कागदावरच राहील.

४. मानसिक तयारी:

 • स्वतःचे वैयक्तिक बजेट तयार करताना मानसिक तयारी महत्वाची असते. यात व्यक्तीने स्वतःच्या, घरच्या मूलभूत गरजा, स्वतःच्या इच्छा आकांक्षा आणि उधळपट्टी करणाऱ्या गोष्टी यावर मनन करणं गरजेचं असतं.

५. मूलभूत गरजा:-

 • यामध्ये स्वतःच्या किंवा घरच्या मूलभूत गरजा लिहायच्या. जसं मासिक भाडं, धान्य, अन्न, भाज्या यांवरील खर्च, मूलांचा शाळेतील खर्च आणि इतर मूलभूत गरजा.
 • आपल्या मूलभूत गरजांसाठी खर्च करणं आपल्यासाठी अपरिहार्य असतं. त्यामुळे एकदा का मूलभूत गरजांचा आराखडा तयार झाला तर बचत कुठे आणि कशी करता येईल? याचा कच्चा आराखडा मनात आपोआपच तयार होतो.

महत्वाचा लेख: कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

६. इच्छा :-  

 • मनुष्याच्या मूलभूत गरजा फार कमी असतात पण इच्छा मात्र न संपणाऱ्या असतात. इच्छांमुळे व्यक्ती असमाधानी राहते, परिणामी दु:खी होते, असे अनेक महापुरुषांनी सांगितलं आहेच. जे प्रत्यक्ष आयुष्यात अगदी सत्य आहे.  
 • कितीही पैसे कमावले तरीही व्यक्तीच्या सर्व इच्छा या जन्मात कधीच पूर्ण होत नाहीत. हे सत्य जितकं लवकर समजले तर व्यर्थ शक्ती न वाया घालवता जवळील पैशात समाधानी राहता येईल.
 • उर फुटेपर्यंत पैशाच्या मागे धावणार नाही. त्यामुळे अगदीच योग्य किंवा गरजेच्या इच्छा जसं की स्वतःचं घर व्हावं, अशाच  इच्छांचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये करावा आणि त्यासाठी योग्य प्रयत्न आणि बचत सुरू करावी.

७. उधळपट्टी:-

 • एक स्मार्टफोन विकत घेतला की आठ महिन्यात त्याचं नवं व्हर्जन येतं आणि जवळील फोन जुना वाटू लागतो. मग नवा फोन घेतला जातो.
 • सततच्या जाहिरातींना बळी पडून नवनवे गॅजेट्स घेणं, सततचे हॉटेलिंग करणं आणि अनेक गोष्टीवर पैशांची उधळपट्टी सुरू असेल, तर जागरूकपणे ते सर्व स्वतःच्या बजेटमध्ये मांडावे. यामुळे आपण किती निरर्थक खर्च करत असतो, हे लक्षात येईल.

८. बजेट विश्लेषण:-

 • यामध्ये कागदावर दोन भाग करावे किंवा एक्सेल शिट तयार करावी. ज्यात उत्पन्न आणि खर्च असे दोन ठळक भाग करावेत.
 • उजव्या बाजूला खर्च लिहावे, डाव्या बाजूला उत्पन्न.
 • खर्चाच्या विभागात दररोजचा,  मासिक खर्च लिहावा. यात किरकोळ घरगुती खर्च, स्वतःचा वैयक्तिक खर्च, विजेचे बिल, मोबाईल रिचार्जेस, इतर मूलभूत तसेच, निरर्थक खर्चही प्रामाणिकपणे लिहावेत.
 • वैद्यकीय खर्च असतील तर तेही मांडावे.
 • विविध गुंतवणूकीअंतर्गत भरावे लागणारे हप्ते आणि इतर तत्संबंधी गोष्टी तटस्थपणे मांडाव्यात.
 • यानंतर डावीकडे उत्पन्नाच्या विभागात उत्पन्न लिहावे. एकाहून जास्त उत्पन्न स्रोत असतील तर तेही लिहावेत.
 • यानंतर दोन्ही विभागांची स्वतंत्र बेरीज करावी. खर्चाची बेरीज उत्पन्नाहुन जास्त येत असेल अथवा तितकीच किंवा जवळपास जरी असेल तर ती धोक्याची घंटा आहे. ताबडतोब स्वतःच्या आयुष्यावर, दिनचर्येवर , निरर्थक खर्चांवर काम करण्यास सुरू करावं.
 • जर फरक फार जास्त नसेल तर खर्च कमी करण्याचा आणि उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा.
 • उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असल्यास अभिनंदन !! तुमचं बजेट योग्य आहे.

अशाप्रकारे दर महिन्याला मासिक बजेट तयार करून त्याचं प्रामाणिकपणे विश्लेषण करावं. घरघुती अर्थसंकल्प तयार करताना रोजच्या आयुष्यात होत असलेला व्यर्थ खर्च लक्षात येतो. त्यामुळे त्यावर आळा घालता येते. शिवाय योग्य सवयी लावता येतात. वरचेवर छोट्या मोठ्या त्रासांवरून वैद्यकीय खर्च होत असल्यास दररोज योगासने, प्राणायाम आदी योग्य सवयी करून घेतल्यास साध्या घरघुती अर्थसंकल्पामुळे शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त होऊ शकते. वैद्यकीय खर्च कमी होतो. आपण केलेला अर्थसंकल्प आपणच प्रामाणिकपणे पाळावा आणि समाधानी आयुष्य जगावे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.