Nifty
https://bit.ly/35UPbs0
Reading Time: 2 minutes

Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना…

‘निफ्टी’ (Nifty) एक इंडेक्स असून यात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील टॉप ५० सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश असतो, तर दुसरीकडे ‘सेन्सेक्स’ हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील ३० स्टॉकचा बॅरोमीटर आहे. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे हे ब्लू-चिप स्टॉक्स असतात. यात गुंतवणूक करताना काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडानंतर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्टॉकी मार्केटमधील गुंतवणूक वेगळी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

महत्वाचा लेख: BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

गुंतवणूक उद्दिष्ट तयार करा: 

 • आपली आर्थिक उद्दिष्ट्ये कशी साधायची हे जाणून घेणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 
 • यासाठी तुम्ही तज्ज्ञ असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काही मूलभूत गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. सुनियोजित योजना आखून, त्यानुसार वागण्याची शिस्त स्वतःला लावून घेणं आवश्यक आहे.  
 • यासाठी आपल्याला काय हवे आहे, या प्रश्नापासून  सुरुवात करा आणि सर्वात महत्त्वाच्या आर्थिक ध्येयांची यादी करा. 
 • तुम्ही लग्नासाठी, मुलांच्या उच्च- शिक्षणासाठी, निवृत्ती किंवा नक्की कुठल्या कारणासाठी गुंतवणूक करताय, हे आधी निश्चित करा. त्यानंतर प्रत्येक विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती वर्ष लागतील, हे ठरवावे लागेल. कारण तुुम्ही गुंतवणूक सुरु केल्यावर ‘एंट्री आणि एक्झिट’ निश्चित करताना, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 

डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडा: 

 • गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग खाते लागेल. 
 • सर्व प्रथम डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांची सुविधा देणाऱ्या स्टॉक ब्रोकरची निवड करा. केवायसीचे नियम पूर्णपणे पाळा. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. 

तुमच्या स्टॉक गुंतवणुकीसाठी बजेट निश्चित करा: 

 • बजेट निश्चित करणे हा गुंतवणुकीचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या सुरुवातीला तुम्ही किती पैसा गुंतवू शकता, हे निश्चित करावे लागेल. 
 • एकदाच एकरकमी वार्षिक गुंतवणूक करायची की, मासिक आधारावर गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, हे पहावे लागेल. 
 • हे बजेट एकंदरीतच तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टावर व ती कशी साध्य करायची यावर अवलंबून असावे. 
 • याठिकाणी तुम्ही अवास्तव अपेक्षा टाळल्या पाहिजे. उदा. २०% किंवा त्यापेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा करणे.

विशेष लेख: परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल?

Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक-

एकदा तुम्ही सर्वकाही निश्चित केले की, तुम्ही निफ्टीमध्ये गुंतवणूक करण्यास सज्ज व्हाल. हे करण्याचे असंख्य मार्ग आहेत.

१. स्पॉट ट्रेडिंग: 

 • निफ्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे निफ्टी स्क्रिप्ट खरेदी करणे. 
 • एकदा आपण हे केल्यास, किंमत वाढते तेव्हा भांडवलाच्या नफ्यातून आपण लाभ मिळवू शकतो.

२. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग: 

 • डेरिव्हेटिव्ह्ज हे आर्थिक करार असतात, जे मूलभूत मालमत्तेपासून मूल्य कमावतात. 
 • हे स्टॉक्स कमोडिटीज, चलन, इत्यादी असू शकतात. 
 • या पद्धतीत, पक्ष भविष्यातील तारखेला कराराची पूर्तता करण्यास आणि अंतर्निहित मालमत्तेच्या भावी मूल्यावर पैज लावून नफा कमावला जाऊ शकतो. 
 • निफ्टी इंडेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे दोन डेरिव्हेटिव्हची साधने असतात.
  • निफ्टी फ्युचर्स: साध्या भाषेत, भविष्यातील करार हे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या दरम्यान भविष्यातील निफ्टी लॉट खरेदी करण्याबाबतचे करार असतात. या कराराच्या कालावधीत, किंमत उंचावल्यास, तुम्ही स्टॉक विकू शकतात आणि लाभ कमवू शकता. मूल्य कमी झाल्यास, तुम्ही सेटलमेंटच्या तारखेपर्यंत थांबू शकता.
  • निफ्टी ऑप्शन: ठराविक किंमतीत भविष्यातील निफ्टी लॉटच्या ट्रेडिंगसाठी खरेदीदार आणि विक्रेते यांच्या दरम्यान झालेला करार हा ऑप्शन करार असतो. प्रीमियम वसूल करून ऑप्शन करारातील खरेदीदार कायदेशीर अधिकार मिळवतो. तथापि, किंमत त्यांच्या फायद्याची असेल तेव्हा खरेदी किंवा विक्री करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही.

३. इंडेक्स फंड्स: 

 • हा पोर्टफोलिओ (स्टॉक्स, बाँड्स, इंडायसेस, करन्सीज, इत्यादी) असलेल्या म्युच्युअल फंड्सचा प्रकार आहे. 
 • मार्केट इंडेक्सच्या घटकांचा (स्टॉक्स व त्यांच्या किंमतीतील चढ-उतार) मागोवा घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी तयार केला आहे. 
 • याद्वारे मार्केट एक्सपोजर मिळते. हे फंड्स निफ्टीसह विविध निर्देशांकात गुंतवणूक करतात.

हे नक्की वाचा: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे? 

निफ्टी निर्देशांक आणि स्टॉक मार्केटमधील वृद्धीने सध्या अनेक रिटेल गुंतवणूकदार, संस्थात्मक तसेच विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ते त्यांचा पैसा थेट किंवा त्यांच्या इंडेक्स फंड्सद्वारे गुंतवत आहेत. गुंतवणूक करताना उपरोक्त मुद्दे लक्षात ठेवावेत, मग पुढे जाण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल.

– श्री प्रांजल कामरा

मुख्य कार्यकारी अधिकारी, 

फिनॉलॉजी

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…