आयपीओ
ipo in marathi
Reading Time: 2 minutes

Investing In IPO : आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष

भारतात २०२१ मध्ये आयपीओने शेअर बाजारात खळबळ उडवली आहे. मार्केटमध्ये अनेक कंपन्या पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी उत्सुक आहेत. हे वर्ष खूप जास्त खास होते, कारण यंदा नवीन युगाचे तंत्रज्ञान स्टार्टअप्स जसे झोमॅटो, पेटीएम, नायका इत्यादींनी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. काही कंपन्या यशस्वी झाल्या तर काहींना वाढ होऊनही मार्केटमध्ये चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. यावर्षात ५३ आयपीओंनी (१ रेट आणि १ इन्विट यांच्यासह) ११४,६५३ कोटी रूपये कमावले आहेत. नवीन युगाच्या स्टार्टअपपासून ते उत्तमरित्या प्रस्थापित ब्रँड्स आगामी भविष्यात आयपीओ मार्केटमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्याला अदानी विल्मर, केवेंटर एग्रो, एलआयसी, फार्मईझी आणि गो एअरलाइन्स अशा कंपन्या सार्वजनिक होताना दिसतील. एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य किंवा अयोग्य ठरण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. याबद्दल माहिती देताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य. 

बिझनेस मॉडेल : तुम्ही एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या संशोधनाचा भाग म्हणून बिझनेस मॉडेल विचारात घेणे गरजेचे आहे. गुंतवणूकदाराने कंपनी महसूल कशा प्रकारे उभा करते हे आणि तिची खर्च रचना पाहणे गरजेचे आहे. कंपनी व्यवसायात नफा कमावते आहे की नाही हे पाहण्यासाठी कंपनीच्या मुलभूत धोरणाचा आणि तिचा बाजारपेठेतील स्पर्धात्मक फायद्याचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही तिची उत्पादने आणि सेवाही समजून घ्यायला हवीत. इतर बाबी म्हणजे किंमत आणि खर्च. कंपनी बिझनेस मॉडेलनुसार चांगली दिसत असल्यास तुम्ही तिला अधिक जाणून घेण्यासाठी तुमचे संशोधन कायम ठेवले पाहिजे.

हेही वाचा – Five upcoming IPO : ‘या’ पाच लक्षवेधी आयपीओ मध्ये करा गुंतवणूक… 

ऐतिहासिक वित्तीय ट्रॅक रेकॉर्ड: एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ऐतिहासिक आर्थिक कामगिरी होय. कंपनी मागील पाच सहा वर्षांत नफा कमावते आहे की नाही, ती विक्रीत वाढ करते आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. नफा आणि वाढीतून हे दिसते की, कंपनी स्थिर आहे. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीचा आयपीओ खरेदी करत आहात याचा अर्थ तुम्हाला नफा मिळू शकेल. परंतु समजा मागील पाच वर्षांत कंपनी आपल्या नफा आणि वाढीबाबत सातत्यपूर्ण नाही. या प्रकरणी त्यात गुंतवणूक करण्यात फारसा अर्थ नाही कारण आकडेवारीतून सातत्यपूर्णता दिसत नाही आणि तुम्ही नफ्यासाठी असातत्यपूर्ण आकडेवारीवर विसंबून राहू शकत नाही.

व्यवस्थापन: बिझनेस मॉडेल आणि ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हाला तिचे व्यवस्थापनही पाहणे गरजेचे आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि कंपनीच्या व्यवस्थापक टीमसह कंपनी चालवणाऱ्या लोकांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. या लोकांकडे व्यवसाय चालवण्याचा पुरेसा अनुभव आहे की नाही हे तुम्हाला कळेल. कंपनी विश्वासार्ह आहे आणि घोटाळा किंवा खटल्याच्या प्रकरणांचा इतिहास नसल्याचे पाहणेही महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – Manyavar IPO : ‘मान्यवर’ आयपीओ बाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी …

मूल्यमापन : कंपनीचे बिझनेस मॉडेल, इतिहास आणि व्यवस्थापन तपासल्यानंतर तुम्हाला तिचे मूल्यमापन पाहणे गरजेचे आहे. प्राइस टू अर्निंग (पीई), एंटरप्राइज व्हॅल्यू टू सेल्स (ईव्ही/ सेल्स), प्राइस टू व्हॅल्यू इत्यादी अनेक मूल्यमापनाच्या पद्धती आहेत. त्यामुळे कंपनीच्या मूल्याची तुलना तिच्या स्पर्धेतील कंपन्यांसह करणे शक्य होते. उदाहरणार्थ, एफएमसीजी कंपनीचा पीई सरासरीच्या ४५ पट आहे आणि सार्वजनिक होणारी कंपनी ५० पीईची मागणी करत असल्यास गुंतवणूकदाराला त्यात फायदा नाही. पीई ४० असल्यास गुंतवणूकदारासाठी वाढ आणि नफ्याची शक्यता आहे. मात्र, मूल्यमापनासोबतच आपल्याला वाढीकडेही पाहावे लागते. वाढीचा घटकही मूल्यमापन निश्चित करतो.

निष्कर्ष : आयपीओमध्ये गुंतवणूक हा गोंधळात पाडणारा विषय आहे आणि गुंतवणूकदार विचारपूर्वक काम करत नसल्यास ट्रेंडच्या मागे जाणे नुकसानदायक ठरू शकते. भारताचे रिटेल गुंतवणूकदार तरूण आणि भांडवली बाजारात नवीन आहेत हे लक्षात घेता आयपीओमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे काय हे त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. थोडेसे संशोधन केल्यास गुंतवणूकदाराला बाजारात नफा मिळवणे शक्य होईल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…