debt mutual fund
debt mutual fund in marathi
Reading Time: 3 minutes

Debt Mutual Fund : ‘डेब्ट म्युच्युअल फंड’ म्हणजे काय ?

गुंतवणूकदारांना जेव्हा एका ठराविक रकमेचा परतावा हा अपेक्षित असतो, तेव्हा ‘डेब्ट म्युच्युअल फंड’ debt mutual fund हा सर्वात सोयीचा पर्याय ठरतो. डेब्ट फंड हे ते म्युच्युअल फंड असतात जे सरकारी आणि कॉर्पोरेट बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीवर ठराविक व्याजाच्या परताव्याची हमी देत असतात. शेअरमार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या इक्विटी फंडपेक्षा डेब्ट फंड मध्ये आपल्या पैशाचा धोका हा सर्वात कमी असतो. डेब्ट फंड कसा निवडावा ? हा सुद्धा कित्येक गुंतवणूकदारांसाठी एक प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी डेब्ट फंड चे कोणते विविध प्रकार असतात ? आणि त्यांच्यात काय फरक असतो ? हे काही उपलब्ध माहितीच्या आधारे जाणून घेऊयात. 

प्रत्येक गुंतवणूकदाराला स्वतःची धोका पत्करण्याची क्षमता ही माहीत असली पाहिजे. त्यासोबतच, हे माहीत असावं की, भविष्यात आपल्याला कधी आणि अंदाजे किती पैशांची गरज भासू शकते. जितकी या माहितीत सुस्पष्टता असेल तितकं कोणत्या बॉण्ड मध्ये गुंतवणूक करावी आणि किती वर्षांसाठी ? हे ठरवता येतं आणि त्यानुसार गुंतवणूक करता येते. डेब्ट फंड हे विविध प्रकारच्या वेळ आणि व्याज परतावा दराने उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार हे जेव्हा नवीन असतात तेव्हा त्यांनी डेब्ट फंडच्या गुणधर्माबद्दल माहिती करून घेणं हे आवश्यक असतं. 

 

१. सतत बदलणारे व्याजदर : 

डेब्ट फंड हे ठराविक रकमेचा परतावा करण्याची शाश्वती देत असले तरीही त्यांच्या व्यजदरात तफावत होण्याची शक्यता नेहमीच असते. मार्केटचा नियम ‘जिथे कमी धोका तिथे कमी परतावा’ हा डेब्ट फंड साठी सुद्धा लागू असतो. डेब्ट फंड मध्ये व्याज परताव्यात असलेला धोका हा त्यामधील गुंतवणूक थांबवण्याची मुभा ही देऊन लोकांना फायदा मिळवून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

हेही वाचा – Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?…

 

२. क्रेडिट स्कोर नुसार डेब्ट फंड निवडण्याची सोय: 

डेब्ट फंड मध्ये तीन प्रकारच्या क्रेडिट रेटिंग्ज देण्यात आल्या आहेत. AAA, AA+, A1+  याप्रकारच्या रेटिंग नुसार अनुक्रमे कमी ते सर्वाधिक धोका हा या रेटिंग्जचा अर्थ असतो. डेब्ट फंड मधील अशा प्रकारच्या बॉण्डची निवड गुंतवणूकदारांनी करावी ज्यांची गुंतवणूक ही अधिक परतावा देणाऱ्या बॉण्ड मध्ये पुढे केली जाते. A1+ क्रेडिट रेटिंग असलेली बॉण्ड ही खात्री गुंतवणूकदारांना देत असते. 

३. कर सवलत मिळते: 

एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी डेब्ट फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही २०% पर्यंत कर सवलत मिळवून देत असते. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जरी डेब्ट फंड मध्ये गुंतवणूक केली तरी कर सवलत ही कमी टक्के का होईना, पण मिळत असते. 

 

४. खर्चाचा अंदाज घेणे: 

डेब्ट फंड मध्ये गुंतवणूकदारांनी आपल्याला येणारा परतावा हा १०% इतका असेल अशी अपेक्षा ठेवावी. पण, त्यासोबतच आपण ज्या ‘असेट मॅनेजमेंट कंपनी’ मध्ये गुंतवणूक करत आहोत त्यांची ‘ऑपरेटिंग फिस’ किती आहे ? इतर काही फिस आहे का ? या खर्चाची माहिती सुरुवातीला घेणं अपेक्षित असतं. ज्या डेब्ट फंड मध्ये हा खर्च कमी असेल त्या फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला सर्वच आर्थिक सल्लागार देत असतात.

 

५. व्हेंचर डेब्ट फंड: 

प्रत्येक गुंतवणूकदाराने वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतवणूक केल्यास त्याचे पैसे खेळते रहातात. पण, ज्यांना विविध फंड मध्ये पैसे गुंतवणं शक्य होत नाही, त्यांनी व्हेंचर डेब्ट फंडची निवड करावी आणि त्यामध्ये पैसे गुंतवावेत. 

व्हेंचर डेब्ट फंडचं वैशिष्ठ्य आहे की, ते शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना ‘स्टार्टअप’ कंपनीमध्ये सुद्धा गुंतवणूक करत असतात ज्याद्वारे आपल्या पैशांचा परतावा हा कमी वेळेत मिळणं सहज शक्य होतं. व्हेंचर डेब्ट फंड हे तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शाश्वती तर देतातच. शिवाय, पैसे वाढण्याची शक्यता सुद्धा व्हेंचर डेब्ट फंड मध्ये सर्वाधिक असते. व्हेंचर डेब्ट फंडची किंमत ही शेअर्स किंवा इतर फंडच्या तुलनेत कमी असते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतांना असलेल्या संभाव्य धोक्याची माहिती ही आपल्याला प्रत्येक जाहिरातीतून नेहमीच मिळत असते. डेब्ट फंड मधील संभाव्य धोका हा म्युचल फंडपेक्षा कमी असल्याने त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला हा नेहमीच देत असतात. आपल्या पैशाचा अधिकाधिक परतावा कमवायचा असल्यास डेब्ट फंडचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि मगच आपले मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवावेत. 

हेही वाचा – Mutual Fund SIP : कधी करावी ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक ?…

 

डेब्ट फंडच्या विविध प्रकारांपैकी ‘ओव्हरनाईट फंड’, ‘अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड’ हे प्रकार सर्वात कमी धोका असल्याचे मानले जातात. कारण, गुंतवणुकीचा कालावधी हा कमी असतो. डेब्ट फंड निवडतांना जास्त कालावधी निवडल्यास धोका हा अधिक असतो, पण परताव्याची टक्केवारी सुद्धा या प्रकारात जास्त असते. क्रेडिट रेटिंग तपासून डेब्ट फंड निवडावेत आणि ‘फिक्स्ड इन्कम’ सोबत मिळणाऱ्या व्याजाचा गुंतवणूकदाराने लाभ घ्यावा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…