SIP
SIP
Reading Time: 3 minutes

सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करण्याची योजना विचारल्यावर ‘म्युच्युअल फंड’, ‘एसआयपी’ हे पर्याय सर्वात आधी समोर येतात. मार्केट कितीही कोसळलं तरी म्युचल फंड मध्ये आपण केलेली गुंतवणूक ही कमी होत नाही, आपला फायदा जरी झाला नसला तरी नुकसान हे नक्कीच होत नाही हे आपण सर्वांनाच माहीत आहे. दूरदृष्टी ठेवून जे गुंतवणूकदार ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक करतात त्यांचे पैसे वाढतात, दर महिन्याला एक ठराविक आणि तुलनेत लहान रक्कम मार्केट मध्ये गुंतवली जाते. असं असलं तरीसुद्धा, प्रत्येक जण हा एसआयपी मध्येच आपले पैसे गुंतवतो असं होत नाही. प्रत्येकाने फक्त एसआयपी मध्येच गुंतवावेत असा सल्ला अर्थतज्ज्ञ देत नाहीत यामागे काही कारण असणार हे नक्की. ‘एसआयपी’ला काही मर्यादा आहेत ज्या की गुंतवणूकदारांना माहीत असल्या पाहिजेत. ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक करणं हे कधी टाळलं पाहिजे ? जाणून घेऊयात. 

Mutual Fund SIP

१. आर्थिक नियोजन पूर्ण होत असतांना : 

एक वेळ येत असते जेव्हा आपण दूरदृष्टी लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक ही संपत असते. ज्या हेतूने आपण ही गुंतवणूक केलेली असते तो हेतू जेव्हा सफल होणार असतो त्यावेळी पुन्हा एसआयपी सुरू करणं हे चुकीचं ठरू शकते. मार्केट जरी त्यावेळेस चांगलं असलं तरीही त्यावेळी तुम्ही कमावलेला नफा, आधी गुंतवलेली पूर्ण  रक्कम ही कमी धोका असलेल्या एसआयपी मध्ये पुन्हा गुंतवणे हे चुकीचं ठरू शकतं. आपल्या आर्थिक ध्येयाच्या जवळ असतांना पुन्हा गुंतवणूक करण्याचा मोह टाळावा. ज्या कारणासाठी एसआयपी सुरू केली होती, ते कारण अशा वेळी आठवावं आणि मिळालेला परतावा हा त्या कामासाठीच वापरावा. 

हेही वाचा – Investing In IPO : आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…

 

२. मोठी रक्कम हाताशी असल्यावर : 

‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ मध्ये गुंतवणूक करणं हे तेव्हा योग्य समजलं जातं जेव्हा तुम्हाला कमी रक्कम गुंतवायची असते. पण, जेव्हा तुमच्याकडे १० लाख रुपये सारखी मोठी रक्कम असते, तेव्हा ५००० रुपये महिन्याची एसआयपी सुरू करून त्याच्यातून फायदा होण्याची वाट बघणं हे काही योग्य नसेल. त्यापेक्षा, जर ५०,००० रुपये हे २० महिन्यांसाठी एखाद्या इक्विटी फंड मध्ये गुंतवले तर तुमच्याकडे असलेल्या पूर्ण रकमेवर तुम्हाला अधिकाधिक नफा कमावता येऊ शकतो.

३. तुम्ही निवडलेला म्युच्युअल फंड फायद्यात नसेल तेव्हा :

ज्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहात तेव्हा तो म्युच्युअल फंड मार्केटमध्ये कसा परतावा देतोय हे प्रत्येक गुंतवणूकदाराने बघणं आवश्यक आहे. तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडला  जर नुकसान होत असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करत रहाणं हे योग्य ठरत नसतं. ठराविक अंतराने म्युच्युअल फंडचा परतावा योग्य मिळत आहे हे की प्रत्येक गुंतवणूकदाराने बघावं आणि फायदा होत नसेल तर ‘एसआयपी’ बंद करणे हा निर्णय योग्य ठरू शकतो. 

४. तुलना करणे : 

एक ‘एसआयपी’ बंद करत असतांना त्याचवेळी दुसऱ्या, सध्या चांगला परतावा देत असलेल्या ‘एसआयपी’ची माहिती काढून त्यामध्ये पैसे गुंतवणे हे फायद्याचं ठरू शकतं. ‘एसआयपी’ बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ३ ते ६ महिन्यांचा वेळ घ्यावा, माहिती घ्यावी, त्यांची तुलना करावी आणि मगच आपला निर्णय घ्यावा. मार्केट अस्थिर असल्यावर ही सर्व माहिती असणं जास्त आवश्यक ठरतं. 

हेही वाचा – Buy Now Pay Later : बाय नाऊ पे लेटर करताना ‘हे’ अवश्य वाचा …

 

५. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे : 

भारताची अर्थव्यवस्था जर अडखळत असेल, रुपया सतत पडत असेल तर किंवा भारतीयांचं दरडोई उत्पन्न हे सतत कमी होत असल्याची माहिती समोर येत असेल तर तुम्ही पैसे गुंतवत असलेल्या ‘एसआयपी’चा  फेरविचार करणे हे आवश्यक ठरतं.  

६. कंपनीचा अभ्यास करणे : 

तुम्ही ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली आहे ती कंपनी जर सतत चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असेल तर आपल्या गुंतवणुकीचा फेरविचार केला पाहिजे. जर ती कंपनी सतत ईडीची चौकशी, सेवा गुणवत्ता तक्रारी अशा फेऱ्यांमधून जात असेल तर काही तरी तथ्य असेल असा विचार करावा आणि आपली गुंतवणूक ही इतर म्युचल फंड मध्ये करावी. 

७. शेअर्स सोबत तुलना करणे : 

शेअर्स मध्ये गुंतवणूक करून जर तुम्हाला वार्षिक ३०% इतका परतावा मिळत असेल आणि म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ मध्ये जर एकूण वार्षिक परतावा हा १४% इतका येत असेल तर फार विलंब न लावता आपले पैसे हे शेअर्स मध्ये गुंतवावेत. 

 

हेही वाचा – Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅममधून घ्या ‘हा’ धडा…

 

म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ हे तुम्हाला कमीत कमी धोका बाळगून जास्तीत जास्त परतावा देण्यास सक्षम आहे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची गुंतवणूक ही योग्य एसआयपी मध्ये होत आहे. ‘एसआयपी’ हे त्वरित परतावा देण्यासाठी जरी तयार करण्यात आलेले नसले तरी त्यामध्ये पैसे गुंतवून ते विसरून जाणं हे सुद्धा चुकीचं आहे. सतर्क रहावं आणि तुमच्या पैशांचा योग्य परतावा मिळवावा, तो तुमचा अधिकार आहे. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम राहा लांब !

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी…