ltc
ltc
Reading Time: 3 minutes

LTC Cash Voucher Scheme : लीव ट्रॅव्हल कन्सेशन

एलटीसी (लीव ट्रॅव्हल कन्सेशन) या केंद्र सरकारच्या योजनेमुळे  कित्येक सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भारतभ्रमण करण्याची संधी दरवर्षी उपलब्ध होत असते. पर्यटनाची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘एलटीसी’ द्वारे मिळणारी रोख रक्कम ही उपयोगी असतेच. पण, काही कारणास्तव, जे या योजनेचा फायदा फिरायला जाण्यासाठी करू शकले नाही त्यांच्यासाठी ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ योजना सुरू करून सरकारने या पैशांचा योग्य विनियोग करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांचा फायदा लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ घेतांना आयकरात सवलत देखील दिली जाणार आहे ही बाब या योजनेला यशस्वी करेल असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. 

‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ या योजने अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या घेतल्या नसतील तर त्याचे पैसे देखील देण्यात येतील आणि त्यासोबतच ‘एलटीसी’चे पैसे हे ३ भागात विभागून देण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ या योजनेच लाभ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. खासगी क्षेत्रासाठी ही योजना कशी राबवावी याचं स्वातंत्र्य कंपन्यांना देण्यात आलं आहे. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ काय आहे ? हे या ८ प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

हेही वाचा – Drone Industry trends  : जाणून घ्या ड्रोन इंडस्ट्रीचे लेटेस्ट ट्रेंड्स…

१. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ ही योजना काय आहे ? 

– केंद्र सरकारची आजवरची सर्वात मोठी ‘इंसेंटिव्ह’ योजना अशी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ‘एलटीसी’चे पैसे हे प्रवासासाठी वापरले तरच त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना व्हायचा. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ या सुधारीत योजनेत मात्र कर्मचारी फिरायला जाण्या ऐवजी त्या पैशातून एखादी वस्तू किंवा सेवा सुद्धा विकत घेऊ शकतात. ही वस्तू विकत घेतांना त्यावर १२% किंवा त्यापेक्षा अधिक जीएसटी आकारलेला असावा अशी अट सरकारने ठेवली आहे. 

२. कर्मचाऱ्यांचा काय फायदा होईल ? 

– केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४ वर्षातून एकदा एलटीसीची रक्कम मिळत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पदानुसार रेल्वे किंवा विमान प्रवासाने भारतातील पर्यटन स्थळांना सहपरिवार भेट देण्यासाठी पुरेल इतकी असते. त्याशिवाय, दहा दिवसांची पगारी रजा दिली जाते. कोरोनामुळे मागील ३ वर्षात कित्येक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले. त्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध सुट्ट्यांचे पैसे हे पगाराच्या बेसिक प्रमाणे न देता १० दिवसांचा पूर्ण पगार देण्याचं ठरवण्यात आलं आहे. तुम्ही जाऊ इच्छिलेल्या, पण न जाऊ शकलेल्या जागेला लागणारं भाडं हे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी ही  रक्कम तुमच्या उत्पन्नात धरली जाणार नाही. 

३. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’चा फायदा कोण घेऊ शकतो ?

– सार्वजनीक क्षेत्रातील बँक कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत. राज्य सरकारचे कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी सुद्धा ही योजना राबवू शकतात. केंद्र सरकारने आखून दिलेल्या योजनेचा आराखडा बघून ही योजना खासगी क्षेत्रात सुद्धा लागू केली जाऊ शकते. 

४. योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?

– २०१८ ते २०२१ या तीन वर्षात न मिळालेल्या एलटीसीच्या ऐवजी ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’चा फायदा घेण्यासाठी खालील अटी लावण्यात आल्या आहेत : 

अ. कर्मचाऱ्यांनी एलटीसी पेक्षा अधिक रकमेच्या वस्तू किंवा सेवा वापरून या योजनेचा लाभ घ्यावा.

ब. कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या सुट्ट्यांचे मिळालेले पूर्ण पैसे खर्च करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक असणार आहे. 

हेही वाचा – Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये…

५. टीडीएस लागू असेल का ? 

– ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ योजनेचा लाभ घेतांना जर सुट्ट्यांचे पैसे घेतले तरीही त्यावर टीडीएस लागू नसेल. ‘एलटीसी फेअर’ वर सध्या लागू असलेला कर सवलतीचा फायदा  ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ला सुद्धा देण्यात येणार आहे. आयकर ऍक्ट १९६१ मध्ये ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ साठी आवश्यक ती सुधारणा ही लवकरच आमलात आणण्यात येणार आहे. 

६. आगाऊ रक्कम घेता येईल का ?

– ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ची १००% रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बँकेला देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम आगाऊ हवी आहे त्यांना या संपूर्ण रकमेपैकी ५०% रक्कम ही आगाऊ रक्कम म्हणून मिळू शकते. ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ५०% रक्कम इतका खर्च केल्याची पावती दाखवणे हे बंधनकारक आहे. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ योजने अंतर्गत झालेल्या सर्व खर्चाच्या कागदपत्रांची पूर्तता ही चालू आर्थिक वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे. 

 

७. रकमेचा कमी किंवा न वापर झाल्यास काय होईल ?

– जर एखाद्या कर्मचाऱ्याने  ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’च्या अंतर्गत आगाऊ रक्कम घेतली आणि खर्चाचा तपशील दिला नाही तर संबंधित उच्च अधिकाऱ्यांना ती रक्कम ही व्याजासकट वसूल करण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे. 

 

८. ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ची रक्कम कर्मचाऱ्यांना कधी मिळेल ? 

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आधी तितकी रक्कम खर्च करावी लागेल. त्याचा पुरावा (पावती) त्यांच्या वरिष्ठांकडे जमा करावा लागेल. कागदपत्रांची शहानिशा करून मग त्यांचे वरिष्ठ त्या आशयाचा आदेश काढतील आणि मग ते पैसे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळते केले जातील. 

हेही वाचा – Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र…

खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीम’ या योजनेचा फायदा कधी घेता येईल हे तर अजूनही नक्की नाहीये. पण, सरकारी कर्मचारी या योजनेचा कर सवलत असलेली रक्कम मिळवून, खर्च करून या योजनेचा नक्कीच फायदा घेऊ शकतात.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…