Skip to content
  • Sunday, July 3, 2022
Arthasakshar

Arthasakshar

| सुखस्य मूलं अर्थ: |

Banner Add
  • Home
  • गुंतवणूक
  • सावधान
  • कर्ज
  • इन्कमटॅक्स
  • योजना
  • अर्थसाक्षरता
  • सर्व लेख
  • जीवनगाणे
  • पॉडकास्ट
  • व्हिडिओ
  • अर्थविचार
  • Home
  • अर्थसाक्षरता
  • Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये
अर्थसाक्षरता इतर

Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये

October 28, 2021
Team Arthasakshar
Reading Time: 2 minutes

Kids Saving Account

आजच्या लेखामध्ये आपण मुलांच्या बचत खाते (Kids Saving Account), त्याचे नियम व अटी, आवश्यकता याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

“मी माझ्या मुलांना आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतो ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मुलं त्यांचे लहान मोठे खर्च किती काळजीपूर्वक करतात हे मी बघतो आणि त्यांच्याकडून कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही याच्यावर मी लक्ष ठेवतो. या दोन्ही ही गोष्टी मला एकच वेळी करता येतात.” 

– टॉमी वाई, जर्सी सिटी, एनजे

अल्पवयीन मुलांच्या खात्याबद्दल काही पालक अशी प्रतिक्रिया देतात. मुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. 

हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच असली तरी या खात्याला मिळणाऱ्या सोयी आणि सुविधा सामान्य खात्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अर्थात हे खाते लहान मुलांकडून हाताळले जाणार असल्याने काही चुका होण्याची शक्यता असते म्हणूनच बँकांनी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. हे खाते उघडण्यापूर्वी पालकांनी त्या वैशिष्ट्यांकडे लक्ष दिले पाहिजे.  

 हे नक्की वाचा: लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये

१. किमान शिल्लक–

  • सर्वसामान्य खात्यांप्रमाणे लहान मुलांच्या खात्यालाही किमान सरासरी शिल्लक (Minimum Balance) ठेवणे आवश्यक आहे, म्हणून कोणताही दंड बसण्याचे टाळा अन्यथा आपल्या खात्यातील रक्कम दंडाच्या स्वरुपात कापली जाते. 
  • बहुतेक बँकांकरिता मर्यादा साधारण २५०० ते ५००० रुपयांपर्यंत असू शकते.

२. पैसे काढण्याची मर्यादा–

  • हे खाते मुलांच्या हातात वापरायला देण्यापूर्वी पालकांनी लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की या खात्याला देखील पैसे काढण्याच्या मर्यादा आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आणि अर्थातच त्याची संपूर्ण जबाबदारी पालकांना घ्यावी लागते. अशा चुका होऊ नयेत म्हणूनच आधीच काळजी घेतलेली बरी.
  • प्रत्येक दिवशी, महिन्याला आणि एका आर्थिक वर्षात खात्यातून किती रक्कम खर्च करता येते किंवा काढता येते हे ठरवणारे प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण ज्या बँकेत हे खाते काढत आहोत त्या बँकेत चौकशी करून ही माहिती मिळवावी. 
  • सर्वसाधारणपणे दिवसाला १००० ते २५०० च्या मर्यादेत रक्कम काढता येते. काही बँकांमध्ये ही मर्यादा ५००० पर्यंतही असू शकते.  

३. एटीएम / डेबिट कार्ड–

  • इतर बचत खात्याप्रमाणेच बहुतेक बँका मुलांच्या बचत खात्याबरोबर एटीएम /डेबिट कार्ड देतात. 
  • सुरक्षेच्या कारणांसाठी, काही बँका डेबिट कार्डवर मुलाचे फोटो देतात किंवा कार्डवर पालक किंवा मुल अशा दोघांचेही नाव असते.
  • जागरूक पालक म्हणून तुम्ही एक गोष्ट करणे आवश्यक आहे, मुलाच्या खात्याचे ‘एसएमएस अलर्ट’ ची सेवा सुरु करून घ्या म्हणजे मुलाने केलेल्या कोणत्याही व्यवहारानंतर तुमच्या मोबाईलवर तसा मेसेज येईल. त्यामुळे तुमच्या मुलाकडून होणाऱ्या चुकांवर व एकूणच बँके खात्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येईल.

४. निधी हस्तांतरण–

  • बहुतेक बँका फक्त आंतर–बँक निधी हस्तांतरणची (NEFT) परवानगी देतात. ‘ऑटो डेबिट’ पर्यायही बँकांमार्फत देण्यात येतो. 

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

५. सुरक्षा वैशिष्ट्ये–

  • लहान मुलांचे डेबिट कार्ड चोरापासून, इतर कोणत्याही फसवणुकीपासून किंवा अनधिकृत खरेदीपासून सुरक्षित राहावे यासाठी बँका या खात्याला सुरक्षेची एक खास सुविधा देतात. बहुतेक बचत खात्यात ‘शून्य जबाबदारीची’ अर्थात ‘झिरो लायेबिलीटी’ची सुरक्षा उपलब्ध करून देतात. मात्र या वैशिष्ट्याचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट कालावधीत बँकेकडे तशी मागणी करणे आवश्यक आहे.

६. केवायसी आवश्यकता–

  • १० वर्षाखालील अल्पवयीन खात्यासाठी जन्मतारखेची तारीखेचा पुरावा आणि आधारकार्ड याची केवायसीची कागदपत्रे म्हणून सादर करणे आवश्यक आहे. मुलाचे आधारकार्ड नसेल तर लहान मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा आणि पालकांचे आधारकार्ड आणि पॅन असणे आवश्यक आहे.  

हे खाते मुलांना वापरण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. तुमच्यावर किंवा मुलांवर कोणते आर्थिक संकट ओढवणार नाही याची खबरदारी बँक स्वतःच घेते. त्यामुळे कोणतीही चिंता न करता परंतु जबाबदारीने तुम्हीही तुमच्या मुलांचे बँकेत खाते उघडा.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Kids Saving Account in Marathi, Kids Saving Account Marathi Mahiti, Kids Saving Account Marathi 

Tags: bank account, Kids Saving Account, Rules, Saving Account, नियम, बँक खाते, बचत खाते, लहान मुलांचे खाते, वैशिष्ट्ये

Post navigation

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेताय? या गोष्टींचाही विचार करा
Mock Trading & Stock Simulator: मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर
तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी फायदेशीर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर लगेच संपर्क करा

    अर्थसाक्षर व्हा !

    Ticker Tape by TradingView
    EMI:

    0 INR

    Total Interest Payable:

    0 INR

    Total of Payments (Principal + Interest):

    0 INR

    You may Missed

    सावधान..!

    Digital Transactions : ऑनलाईन पेमेंट करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    May 7, 2022
    Team Arthasakshar
    गुंतवणूक सावधान..!

    Investing in Cryptocurrencies : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना टाळा ‘या’ चार प्रमुख चुका

    May 5, 2022
    Team Arthasakshar
    कर्ज सावधान..!

    Loan Frauds : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स

    March 28, 2022
    Abhijeet Kolapkar
    अर्थविचार सावधान..!

    Aadhaar PAN linkage : 31 मार्चच्या आधी करा पॅन आधारशी लिंक

    March 14, 2022
    Team Arthasakshar

    Quick Links

    • सर्व लेखांची यादी
    • आमच्याशी संपर्क साधा
    • आमच्याबद्दल
    • Newsletter
    • अर्थसाक्षरसाठी लिहा

    अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर

    Download Arthasakshar App

    Listen Podcast on

    Listen on Google Play Music

    Copyright © 2022 Arthasakshar
    आमच्याशी संपर्क साधा

    Get updates on WhatsApp