ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Reading Time: 2 minutes

लहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण  गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. 

कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोचला? त्याच्या यशामागचे काय रहस्य आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा. 

ससा असो वा कासव, चिकाटी, सातत्य, परिश्रम करण्याची तयारी असे गुण अंगी असतील, तर तुम्ही ध्येय पर्यंत पोहचू शकता. पण या प्रवासावर निघण्याआधी या कान्मात्रांची शिदोरी बरोबर न्यायला विसरू नका.

१.   तीन ‘स’- 

 • हा असेल तुमच्या प्रवासाचा पहिला कानमंत्र! तीन ‘स’ अर्थात संयम, समतोल आणि सकारात्मकता! या तिघांच्या एकरूपतेतून तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता.

२. कामाच्या प्रवासाचा आनंद लुटा- 

 • तुम्ही ध्येय गाठणार की नाही हे तुमची मेहनत ठरवेल पण प्रयत्न करत राहणे आणि या प्रक्रियेची मजा घेणे गरजेचे. 
 • खेळाडू किंवा कलाकार फक्त यंत्राप्रमाणे त्यांचे काम करत नाहीत, तर जे काम ते करत आहेत त्या कामाची मजा ही लुटत असतात.  म्हणूनच त्यांचे काम उत्कृष्ट ठरते. 
 • तुम्ही जे काही काम करत असाल त्याचा पुरेपूर आनंद घ्या.

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

३. ध्येय तुमच्या डोळ्यासमोर लिहून ठेवा:- 

 • तुम्ही जिथे काम, अभ्यास किंवा सराव करता अशा जागी तुमचे ध्येय मोठ्या अक्षरात लिहून ठेवा म्हणजे तुमची नजर त्यावर पडत राहील. ही अक्षरे तुम्हला सतत जाणीव करून देतील की ‘तुला हे करायचेच आहे’. 
 • तुमच्या ध्येयाकडे आकर्षित करणाऱ्या गोष्टींची चित्र तुम्ही लावू शकता. समजा तुम्हाला क्रिकेटपटू व्यायचे आहे तर आवडता सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू किंवा त्याच्या विजयाची छायाचित्र तुम्ही भिंतीवर चिकटवा. ह्या गोष्टी तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित करतील.

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

४.  लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा- 

 • तुमची एकाग्रता फार महत्वाची आहे.जोपर्यंत तुम्ही तुमचे १००% लक्ष ध्येयावर देत नाही तोपर्यंत तुमचे सर्वोत्तम सादरीकरण दिसून येणार नाही. त्यासाठी सर्व गतीरोधाकांना स्वतःपासून दूर ठेवा. 
 • तुमचे लक्ष विचलित झाले की कामाच्या दर्जावर परिणाम होणार आणि तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार हे नक्की. 
 • तुम्हाला कोणत्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या आहेत हे ठरवा. मोबाईल, टीव्ही, एखादी व्यक्ती, आवडता पदार्थ अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला विचलित करते त्याल काही काळासाठी तुमच्यापासुन दूर ठेवा.

५. एक पाऊल पुढे:- 

 • आपल्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे राहणे म्हणजे तुम्ही ध्येयाच्या सर्वात जवळ आहात हे समजा. इतर कोणापेक्षा आपला विचार/काम वेगळं कसे असेल हे लक्षात घ्या.
 •  इतरांच्या गतीने ना जाता सात्यात ठेऊन चालत राहणारा कासव शर्यत जिंकतो. काम मागे पडणे, तर दूरच पण तुमचे काम इतरांच्या तुलनेत अधिक गतिमान असायला हवे.

नरेंद्र मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

६. शिस्त- 

 • शिस्तबद्ध प्रयत्न नेहमीच उपयोगी असतात. लहानपणी आपले पालक, शिक्षक, मार्गदर्शक शिस्त लावत होते, पण मोठेपणी स्वतःची शिस्त गरजेचे आहे. 
 • एखाद्या कडक शिक्षका प्रमाणे वागवा. चूक झाल्यास शिक्षा द्या आणि उत्तम कामगिरी साठी बक्षीस ही द्या. 
 • तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही स्वताचे मार्गदर्शक आहात आणि स्वतःला शिस्त लावणे ही तुमची जबबदारी आहे. प्रसंगी कठोर व्हावे लागले तरी चालेल पण शिस्त मोडू नका.

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

७.  परावलंबन नकोच:- 

 • कोणतीही प्रक्रिया तुम्हला स्वावलंबी आणि परिपूर्ण बनवण्यासाठी उपयुक्त असते. तुम्ही इतरांची जितकी कमी मदत घ्याल तितके तुम्ही स्वावलंबी व्हाल. 
 • इतरांवर अवलंबून राहिलेल्या गोष्टी तुम्हाला कमकुवत बनवतात, तो विषय तुमचा कच्चा राहतो. त्यामुळे परावलंबन नकोच!

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]