गृहकर्ज हस्तांतरणाचे फायदे
https://bit.ly/3rPjd9F
Reading Time: 2 minutes

गृहकर्ज हस्तांतरणाचे फायदे

गृहकर्ज हस्तांतरण या लेखमालेमधील आजच्या शेवटच्या भागात आपण ‘गृहकर्ज हस्तांतरणाचे फायदे’ कोणते आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तुमचे गृहकर्ज किती रकमेचे आहे आणि किती कालावधीचे आहे, यावर ते हस्तांतरीत करायचे की नाही यासंदर्भात निर्णय घ्यायचा असतो. जेव्हा कर्जाचे दर कमी होतात त्यावेळी ते हस्तांतरीत करण्याचा निर्णय बहुतांश कर्जदार घेतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या व्याजाच्या रकमेत घट होते आणि कालावधी कमी होवून बऱ्यापैकी पैशाची बचत होते.

हे नक्की वाचा: गृहकर्ज हस्तांतरण करण्यापूर्वी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

गृहकर्ज हस्तांतरीत करण्याचे 5 महत्त्वाचे फायदे 

1 – कमी व्याजदरामुळे होणारी बचत 

  • व्याजदर कमी झाल्यानंतर पहिल्या बँकेने किंवा वित्त संस्थेने जर तुम्हाला सुधारित कमी दर देण्यास नकार दिला, तर तुम्ही बिनधास्त कर्ज हस्तांतरणाचा पर्याय निवडू शकता. 
  • जी अन्य बँक किंवा वित्त संस्था तुम्हाला कमी दराने कर्ज देत असेल त्यांच्याकडे आधीचे कर्ज हस्तांतरीत करुन घ्यावे आणि आपल्या पैशाची बचत करावी. 
  • किमान 1 टक्का इतका जरी व्याज दर कमी मिळाला तरी पुढची 12 ते 15 वर्षे तुम्ही जे व्याज भरता त्यात तुमच्या पैशाची भरपूर बचत होते. 
  • 3 ते 5 वर्षासाठी पाहिल्यास फार फरक पडत नाही मात्र 5 पेक्षा जास्त वर्षे कालावधी शिल्लक असल्यास नक्कीच 3 ते 4 लाख रुपये तुम्ही वाचवू शकता. 

2 – स्थिर व्याजदरावरुन फ्लोटिंग व्याजदर 

  • जर आपण स्थिर व्याजदराच्या गृहकर्जाचा लाभ घेत असेल, तर सुधारीत व्याजदराचा नियम तुम्हाला लागू होणार नाही.  
  • तुम्ही कर्ज हस्तांतरण करुन नव्या वित्त संस्थेकडून फ्लोटिंग  व्याजराचा लाभ नक्की घेऊ शकता. 

महत्वाचा लेख: गृहकर्ज हस्तांतरणाची योग्य वेळ कोणती?

3 – गृह कर्जाचा कालावधी कमी-जास्त करणे 

  • एकदा तुम्ही तुमच्या गृहकर्जाचा करार स्वीकारल्यानंतर कर्जाचा कालावधी वाढवून घेऊ शकत नाही. मात्र हस्तांतरणाच्या प्रक्रियेत हे शक्य आहे. 
  • नव्या वित्त संस्थेकडून कर्ज घेताना आपण आपल्या गृहकर्जाची मुदत वाढवून किंवा कमी करून घेऊ शकता. 
  • नोकरी किंवा बिजनेसमध्ये काही वर्षांनी आपली आर्थिक स्थिती सुधारते.किंवा खालावते अशावेळी हस्तांतरण करून तुमच्या कर्जाची मुदत कमी- जास्त  करू शकता. 

4 – कमी व्याजदरासोबत चांगल्या ग्राहक सेवेचा लाभ 

  • हस्तांतरामध्ये केवळ कमी व्याज दर हा एकच मुद्दा नसतो तर, चांगली ग्राहक सेवा मिळणे आणि सोबतच अन्य लाभ मिळणे हे देखील ग्राहकांसाठी महत्त्वाचे असते. 
  • उदाहरणार्थ ग्राहकाच्या वेळेनुसार काम करणे, कमी दंड, विविध सेवांवर विनाकारण जादा शुल्क न आकारणे, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड सारखे लाभ मिळवून देणे, पोस्ट, कुरिअर किंवा घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीतून ग्राहकाला प्रीमियम सेवा देणे अशा काही सुविधा मिळत असल्यास ग्राहक कर्ज हस्तांतरणाचा नक्की विचार करतात.  

विशेष लेख: या आहेत गृहकर्ज हस्तांतरणाच्या ४ महत्वाच्या स्टेप्स

5 – अतिरिक्त कर्ज मिळवता येते 

  • हस्तांतरणानंतर तुमची नवी वित्त संस्था तुम्हाला अधिक रकमेचे कर्ज देखील उपलब्ध करुन देऊ शकते. 
  • जसे की घरातील सजावट, रंगरंगोटी, नवे फर्निचर आदींसाठी तुम्हाला जादा रकमेचे कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करुन दिले जाते. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: benefits of home loan balance transfer Marathi Mahiti, benefits of home loan balance transfer in Marathi, home loan balance transfer benefits Marathi, गृहकर्ज हस्तांतरण फायदे, गृहकर्ज हस्तांतरण माहिती 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…