चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले? आता काय करायचे?

Reading Time: 2 minutes

“अतिघाई संकटात नेई”, अशी एक म्हण आहे.  बँकेचे व्यवहार करताना विशेषतः कोणाच्या खात्यात पैसे भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. घाईत चुकीचा खाते क्रमांक लिहिला जाऊ शकतो.

ऑनलाईन व्यवहार करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकीचा क्रमांक टाईप केला जाऊ शकतो. यामुळे बँकेचे व्यवहार, मनी ट्रान्सजॅक्शन  घाईत करू नयेत.  परंतु चुकून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड ताण येतो. त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. व्यक्तीला वाटतं की आपले  पैसे कायमस्वरूपी गेले.

तीच व्यक्ती कोणत्या कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असेल आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीचे, त्याच्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.

१. बँकेला संपर्क करणे –

 • समजा कोणाकडून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले गेले असतील तर प्रथम ताबडतोब संबंधित बँकेला फोन करून आणि ई-मेल करून कळवावे. ई-मेल यासाठी की यामुळे पुरावा जवळ राहील.

२. बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधणे –

 • अश्या प्रकरणांत  व्यक्तीने बँकेच्या व्यवस्थापकास ताबडतोब भेटून त्याला झालेला प्रकार सांगावा , तो पैसे परत मिळवायला मदत करू शकेल.
 • चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असल्यास व्यवहाराच्या तपशीलाची माहिती (Transaction details) तारीख आणि वेळेसकट बँकेला द्यावी.

३. पुरावा सादर करणे –

 • ऑनलाईन व्यवहार करत असताना  त्याचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवावा.
 • याशिवाय ज्याच्या खात्यात चुकीने पैसे भरले आहेत, त्या खात्याच्या बँकेमध्येही लिखित स्वरूपात तक्रार नोंदवावी. तक्रार करताना बँकेला विनंती करावी की चुकून पाठवलेले पैसे स्वतःच्या खात्यात परत मिळावेत.
 • बँक आपल्या स्तरावर पुढील चौकशी आणि प्रक्रिया करेल. चुकून ज्या खात्यात पैसे गेले त्याच्या मालकाला बँक पैसे परत पाठवण्यासाठी सूचना करेल.

४. कोर्टाची पायरी –

 • चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास प्रथम वरील कृती करावी. ज्याच्या खात्यात  पैसे गेले आहेत त्या खाताधारकाला बँकेने सूचना करून देखील ती व्यक्ती पैसे परत करण्यास मनाई करत असेल तर पोलिसात तक्रार करावी.
 • ही तक्रार बँकसुद्धा तक्रारकर्त्याच्या तक्रारी आधारावर कोर्टात करू शकते. पोलिसात तक्रार करू शकते.
 • रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पीडिताला त्याचे पैसे परत मिळवून देणे ही पीडिताच्या बँकेची जबाबदारी आहे

५. काळजी घेणे आवश्यक –

 • कधीही ऑनलाईन व्यवहार करताना, पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. ‘ट्रान्स्फर’च्या पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यावी.
 • खाते क्रमांक, नाव, आयएफएसी क्रमांक , बँकेचं नाव, शाखा, इत्यादी माहिती  नीट भरावी.
 • याशिवाय मोठी रक्कम दुसऱ्याच्या खात्यात भरण्याआधी प्रथम थोडे रुपये संबंधित खात्यात भरावेत व त्या व्यक्तीचा खाते क्रमांक व संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
 • उदाहरणार्थ प्रथम शंभर रुपये भरावे. ते पैसे संबंधित व्यक्तीच्या खात्यात पोहचले असल्याची खात्री करावी. ती खात्री झाल्यावरच बाकी मोठी रक्कम खात्यात भरावी.
 • कुठल्याही बँकेचे ऑनलाईन व्यवहार करताना मग ते नेटबँकिंग (Net banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking), आयएमपीएस (IMPS) किंवा इतर कुठलाही पर्याय असो  “प्रिवेंशन इज बेटर दँन क्युअर” हे नेहमी लक्षात ठेवावे.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Qr8F1w )

१ जानेवारी २०१९ पासून ATM कार्ड्स अवैध ठरणार का?,   इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १,   इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २,   इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३,  चेक आणि चेकबुक नामशेष होणार का?,   ऑनलाईन बँकींग गैरव्यवहार आणि ग्राहक

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *