Reading Time: 2 minutes

वयाच्या ३० मध्ये अनेक जण आयुष्यात स्थिरस्थावर झालेले असतात. या वयात कमावलेल्या संपत्तीचा विनियोग योग्य पद्धतीने करून गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. अशावेळेस बचतीतून गुंतवणूक करताना त्याची वाढ कशी करता येते ते पाहायला हवे. गुंतवणूक निर्णय घेताना सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्वाची असते. 

मुदत विमा खरेदी करणे गरजेचे असते. मुदत विमा हा निश्चित कालावधीसाठी जीवन संरक्षण प्रदान करतो. आयुष्यात अनपेक्षित दुःखद घटना घडली तर त्यामुळे जोडीदार, पालक आणि मुलांना आर्थिक मदत मिळते. 

मुदत विमा हप्ता दरवर्षी भरावा लागतो. तुम्ही रु. ५० लाखांचा मुदत विमा खरेदी केला आहे आणि दुर्दैवाने तुमचे अपघाती निधन झाल्यास कुटुंबियांसाठी तुमच्या पश्चात विमा कंपनी विविध बाबींची शहनिशा करून रु. ५० लाख देते. 

 

 

वयाच्या ३० च्या आत मुदत विमा खरेदी करावा, जाणून घ्या ५ कारणे 

१. कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते  – 

  • मुदत विमा वयाच्या ३० च्या आत खरेदी केला आणि तुमच्याबाबत एखादी अनपेक्षित घटना घडली तर कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. 
  • कुटुंबियांना भविष्यातील खर्च मुदत विम्यातील बचतीतून भागवणे सोपे जाते. कुटुंबाला कॉलेजचा खर्च, लग्नाचा खर्च, मेडिकल खर्च आणि इतर दैनंदिन खर्चासाठी या पैशांचा उपयोग होऊ शकतो. 
  • यावेळी काही कर्जांची थकबाकी असली तरी ती सोडवून कुटुंबावरील आर्थिक ताण कमी करता येऊ शकतो. 

२. मुदत विम्याचे प्रीमियम स्वस्त असतात – 

  • ३० च्या वयात मुदत विम्याचे प्रीमियम स्वस्त असतात. कमी जबाबदाऱ्या आणि दायित्वांमुळे या प्रीमियमच्या किमती कमी असतात. 
  • एकदा टर्म प्लॅन खरेदी केला की प्रीमियमची रक्कम संपूर्ण काळात स्थिर राहते. वय वाढत गेल्यानंतर टर्म प्लॅन खरेदी केल्यास विम्याचे हप्ते वाढतात कारण त्यावेळी जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. 
  • त्यामुळे ३० च्या वयात मुदत विमा करणे चांगले असते. 

नक्की वाचा : मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या 

३. मुदत विम्यातून मोठा लाईफ कव्हर मिळतो – 

  • तरुण वयात मुदत विमा खरेदी करण्याचा एक फायदा असतो. यामुळे तुम्हाला एक मोठ्या रकमेचा मुदत विमा मिळतो. 
  • मुदत विमा खरेदी करण्यासाठी ४० किंवा ५० च्या वयापर्यंत वाट पाहू नका कारण त्यावेळी जीवन संरक्षण कमी मिळू शकते. 
  • वयाच्या ३० व्या वर्षी तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० टक्के लाईफ कव्हरची अपेक्षा करू शकता, पण त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्नाच्या केवळ ५ ते १० पट मुदत विमा मिळू शकतो. 

४. विमा रायडरचा फायदा – 

  • आपण टर्म प्लॅनपेक्षा अतिरिक्त अनेक फायद्यांचा लाभ घेऊ शकता. 
  • आपण रायडर घेतले तर विमा कव्हर मध्ये समाविष्ट नसलेल्या जोखीम कव्हर केली जाते. 
  • जेव्हा आपण ३० च्या वयात असता तेव्हा या रायडर्सची किंमत तुलनेने कमी असते आणि ते मिळवणेही सोपे असते. 

नक्की वाचा : बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता 

५. मुदतीचा विमा कर वाचवतो – 

  • टर्म प्लॅन प्रीमियम कलम ८० सी अंतर्गत कर वजावट पत्र आहेत. तर कलम १० डी अंतर्गत मृत्यू लाभ करमुक्त असतात. 
  • तरुण वयात विमा खरेदी करताना तुम्ही सुरुवातीपासूनच आयकर वाचवू शकता. दरवर्षी यामुळे करांवर लक्षणीय रक्कम वाचवली जाऊ शकता. 
  • यामधून बचत केलेली रक्कम तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि जास्तीच्या खर्चासाठी उपयुक्त ठरू शकते. 

 

निष्कर्ष – 

इतर कुठलेही खर्च टाळा. गरज पडल्यास कमी रकमेची गुंतवणूक करा. परंतु कुठल्याही परिस्थिती मुदतीचा विमा विकत घ्या. तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा ! 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…