term insurance
term insurance
Reading Time: 2 minutes

Term insurance

कुटुंबाची सुरक्षितता जपणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वच बाबतीत आपल्या परिवाराची सुरक्षितता कशी राखता येईल हा प्रयत्न असतो. व यासाठीच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी विमा संरक्षण घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. कुटुंबातील कमावत्या सदस्याच्या मृत्यू नंतर कुटुंबास त्यांची जीवन उद्दिष्टे व्यवस्थित पार पाडण्यासाठी आर्थिक बॅकअप असणे अत्यंत आवश्यक आहे यामुळेच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मुदत विमा असणे फायदेशीर ठरते.

 

हेही वाचा –  Term Insurance Rejection : ‘ही’ आहेत टर्म इन्शुरन्स क्लेम नाकारला जाण्याची कारणे

 

टर्म इन्शुरन्स ही जीवन विमा योजना आहे. जी पॉलिसीधारकाला विशिष्ट कालावधीसाठी लाईफ कव्हर प्रदान करते. पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा अनपेक्षित दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्यानंतर नॉमिनीला पूर्वनिर्धारित विम्याची रक्कम मिळते. जेणेकरून पॉलिसीधारका नंतर भविष्यात त्याच्या कुटुंबाला आर्थिक गरजा पूर्ण करण्यास  अडथळा येत नाही.  मुदत विमा योजनेमध्ये विमा संरक्षणाच्या बदल्यात पॉलिसीधारकाला विमा कंपनीस नियमित प्रीमियम भरणे आवश्यक असते.

मुदत विमा योजनेचे अनेक फायदे पाहायला मिळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुदत विमा योजनेमध्ये कमी प्रीमियम भरून विमा संरक्षण मिळते व यामुळेच मुदत विमा योजनेस ग्राहक पसंती देत आहे. परंतु मुदत विमा योजना खरेदी करण्यापूर्वी ग्राहकास व्यवस्थित माहिती घेणे गरजेचे असते. परवडणारा, स्वस्त  टर्म इन्शुरन्स प्लॅन कितपत फायदेशीर आहे. आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे का नाही याचा विचार करणे देखील गरजेचे असते.

स्वस्त टर्म प्लॅन खरेदी करण्यापूर्वी काही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे:

  • पॉलिसीधारकाने खरेदी केलेला टर्म प्लॅन कव्हर भविष्यात पॉलिसी  धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या आर्थिक गरजा वआर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेसे असणे आवश्यक आहे. खरेदी केलेली मुदत विमा योजना पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे जीवनमान राखण्यासाठी पुरेसे असणे आवश्यक आहे.

 

हेही वाचा – Term Insurance Coverage : जीवनातील ‘या’ ५ बदलानंतर मुदत विमा संरक्षणाचे करा पुनरावलोकन

 

  • स्वस्त टर्म प्लॅन खरेदी करण्यापूर्वी पॉलिसी धारकाने घेतलेल्या कर्जाचा तसेच आर्थिक दयित्वाचा विचार करणे आवश्यक आहे. कारण पॉलिसी धारकाच्या अनपेक्षित मृत्यूनंतर कुटुंबास कर्जाची परतफेड करावी लागते. यामुळे पॉलिसी धारकाने घेतलेला टर्म प्लॅन कव्हर कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसे असणे आवश्यक आहे.

  • याचबरोबर मुदत विमा योजना खरेदी करताना विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो विचारात घेणे गरजेचे असते. उच्च क्लेम सेटलमेंट रेशो असणे फायदेशीर ठरते.

मुदत विमा योजना खरेदी करताना मुदत विमा योजनेचा कालावधी निवडणे आवश्यक असते. मुदत विमा योजनेचा कालावधी जास्त असणे फायदेशीर असते. मुदत विमा योजनेचा कार्यकाळ कमी असेल तर उर्वरित आयुष्यामध्ये गरज लागल्यास विमा संरक्षणाचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे मुदत विमा योजनेचा योग्य कालावधी निवडणे आवश्यक असते.

 

हेही वाचा – Low Term Insurance : इन्शुरन्सचे प्रीमियम स्वस्त का असतात?

 

यामुळे टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना स्वस्त  टर्म इन्शुरन्स प्रीमियमची निवड करण्यापूर्वी वरील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यामध्ये अनपेक्षित घटना घडल्यास कुटुंबास मिळणारे विमा संरक्षण  आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास पुरेसे उपयुक्त ठरेल. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…