IPO आयपीओ
https://bit.ly/3oqNhqj
Reading Time: 2 minutes

IPO: आयपीओ गुंतवणूक

आयपीओ (IPO) म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ही शेअर बाजारातली एक महत्वाची संकल्पना आहे. सन 2020 मध्ये शेअर बाजाराने टोकाचे  यश आणि अपयश अनुभवले. सन 2020 हे वर्ष अकल्पित होतं. या वर्षात अनुभवलेल्या कोरोना नावाच्या संकटाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकविल्या. अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पण या संकटाने ‘आरोग्य आणि ‘अर्थ’ या दोन्ही गोष्टींचे महत्व आपल्याला पटवून दिलं आहे.  याच  वर्षात शेअर बाजार गुंतवणुकीचे महत्वही पटवून दिले आणि अनेकांनी खास करून युवा वर्गाने शेअर बाजाराला गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून स्वीकारले. आयपीओ (IPO) म्हणजे शेअर बाजारातला एक मुख्य घटक. आजच्या लेखात आपण आयपीओ (IPO) म्हणजे  काय, तो  निवडताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती घेणार आहोत. 

IPO: आयपीओ म्हणजे काय?

  • जेव्हा एखाद्या कंपनीला निधी उभारण्याची गरज असते किंवा खाजगी कंपनी सार्वजनिक होण्याचा निर्णय घेते तेव्हा कंपनी आपले समभाग पहिल्यांदा गुंतवणूकदारांना विकते. यालाच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ (IPO) असे म्हणतात. यासाठी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असणे गरजेचे आहे.
  • आयपीओ विक्रीस काढताना कंपन्या सेबीकडे विहित नमुन्यात अर्ज करतात व कंपनीची आर्थिक स्थिती, संचालक मंडळ आदी गोष्टींची सविस्तर माहिती, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची आवश्यकता, याबद्दल सेबीला सविस्तर माहिती देतात. 
  • सेबीची  परवानगी  मिळाल्यावर  कंपन्या आयपीओची मुदत जाहीर करतात. या दिलेल्या मुदतीतच आयपीओसाठी अर्ज करता येतो. हा कालावधी किमान 1 दिवस ते 5 दिवसांपर्यंत असू शकतो. 
  • आयपीओची किंमत कंपन्यांमार्फत निश्‍चित केली जाते. किंमत निश्चित करताना कधी एक निश्चित दर (Fixed price method), तर काही वेळा किमान व कमाल दर म्हणजेच प्राईस बँड ठरविण्यात येतो. 
  • आयपीओ गुंतवणुकीचा निर्णय घेताना ‘ड्रॉफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP)’ तपासणे आवश्यक आहे. ‘ड्रॉफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ मध्ये कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व  जबाबदाऱ्या (Assets & liabilities), भागीदार, याबद्दल संपूर्ण माहिती असते. हा रिपोर्ट सेबीचा संकेस्थळावर उपलब्ध असतो. 

IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करताना 

१. अल्पकालीन व दीर्घकालीन गुंतवणूक 

  • आयपीओ गुंतवणूक अल्पकालीन किंवा दीर्घकालीन दोन्ही प्रकारची असू शकते.  
  • शेअर बाजारात तुम्ही नवीन असाल तर मात्र दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडणं हितावह आहे. अल्पकालीन गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो, पण तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल तरच आयपीओचा अल्पकालीन गुंतवणूक म्हणून विचार करा.

२. DRHP -ड्रॉफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा अभ्यास  

  • आयपीओमध्ये गुंतवणूक करताना डीआरएचपीचा व्यवस्थित अभ्यास करावा. ज्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल त्या कंपनीचे व्यावसायिक धोरण समजून घेणे आवश्यक आहे. 
  • कंपनीचे भवितव्य उज्वल आहे की नाही याचा अंदाज कंपनीच्या पॉलिसीज व इतिहासावरून येतो. ही सर्व माहिती डीआरएचपी मध्ये नमूद केलेली असते. त्यामुळे हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. 

३. आयपीओचा सबक्रिप्शन रेट

  • आयपीओच्या दुसऱ्या दिवशी आयपीओला मिळणार प्रतिसाद म्हणजेच सबक्रिप्शन रेट तपासा. जर प्रतिसाद उत्तम असेल, तर चांगला परतावा मिळू शकतो. 
  • अर्ज केला म्हणजे आयपीओ मिळतोच असं नाही. तसंच आपण अर्ज केलेल्या शेअर्सपेक्षा कमी शेअर्स आपल्याला अलॉट केले जाऊ शकतात. 
  • योग्य विश्लेषण न करता आपले पैसे गुंतवू नका. कारण काही आयपीओनी  गुंतवणूकदारांना शून्य परतावाही दिला आहे.

सन 2020 मधील टॉप 5 आयपीओ: 

गेल्या वर्षात १८ आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. यातील  टॉप 5 आयपीओ होते – 

  1. Route Mobile 
  2. Burger King 
  3. Happiest Minds Technologies 
  4. Rossari Biotech 
  5. Gland Pharma

एक लक्षात ठेवा मार्चमध्ये केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील शेअर बाजार संपूर्णपणे कोसळला होता. परंतु, त्यांनतर तो पूर्णपणे  सावरून उच्च पातळीवर पोचला. त्यामुळे बाजारातील चढ- उतार समजून घेऊन, त्याचा नीट अभ्यास करूनच त्यात पाऊल ठेवा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: IPO Marathi Mahiti, IPO in Marathi, IPO mhanje kay?, IPO marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…