ICICI Lombard Survey
भविष्यातील कामाच्या ठिकाणाचे स्वरुप काय असणार, या विषयावर आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्वेक्षणात (ICICI Lombard Survey) आढळलेले महत्वाचे मुद्दे कोणते, याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
कोवीड -19 मुळे जीवनाच्या अनेक बाबी बदलल्या असून त्यात आपल्या कामाच्या ठिकाणाचाही समावेश आहे. अतिशय अल्प अशा कालावधीत आपण सारेजण प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याच्या पारंपारिक पध्दतीतून वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड कार्यपध्दतीला स्वीकारले आहे. कोवीडच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप झाल्यानंतर आपण पुन्हा वर्क फ्रॉम होम पध्दतीने कामकाज करत आहोत. बदलत्या वातावरणाशी कर्मचारी जुळवून घेतात, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतु नव्या वातावरणाबाबत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? त्यांची मनस्थिती काय आहे? या संस्कृतीला कर्मचाऱ्यांनी स्वीकारले आहे का? प्रवासाचा वेळ वाचल्याने आणखी चांगले काम करण्यास त्यांना मदत झाली काय? प्रदीर्घ काळासाठी या पध्दतीने ते काम करण्यास तयार आहेत का? असे कितीतरी प्रश्न आहेत.
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सर्वसाधारण विमा क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने सुमारे एक हजारपेक्षा अधिक व्यक्तींना प्रश्न विचारून याबाबत सर्वेक्षण केले आहे. मेट्रो शहर आणि छोटे गाव अशा प्रकारचे मिश्रण असलेल्या सॅम्पल गटात समावेश करण्यात आलेले कर्मचारी हे माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, दुरसंचार, ई-कॉमस, ग्राहकपयोगी वस्तू आदींसारख्या वैविध्यपूर्ण उद्योगात कार्यरत आहेत. सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे की महामारीच्या संकटापासून कामाच्या ठिकाणचे वातावरण आणि कामाची पध्दती यात अडथळे आले आहेत. नवीन पध्दतीशी कंपन्या अद्यापही जुळवून घेत असल्या तरी त्यातून वैयक्तिक आणि टिमच्या पातळीवर कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांचा स्वतंत्र्यपणे विचार केला पाहिजे.
ICICI Lombard Survey: ठळक वैशिष्टे
कर्मचाऱ्यांचे समाधान
- वर्क फ्रॉम होम अथवा हायब्रीड पध्दत ही मेट्रो शहरांमध्ये खुपच प्रचलित आहे. तर छोट्या गावांत कार्यालयातून प्रामुख्याने काम चालते.
- महानगरांमध्ये मार्च 2020 पासून 70 टक्के कर्मचारी हे एक तर घरुन अथवा अंशतः घरुन तर लहान शहरात अवघे 52 टक्के कर्मचारी हे घरुन काम करत आहेत.
- कार्यालयातून कामाचे प्रमुख कारण कंपनीचा आदेश हे असुन कार्यालयात व्यक्तिशः हजर राहण्याच्या गरजेमुळे ही पध्दत सुरु आहे.
- लहान शहरातील 47 टक्के कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महानगरातील 71 टक्के कमचारी हे घरुन काम करण्याच्या कार्यपध्दतीवर समाधानी (अतिशय अथवा बऱ्यापैकी) आहेत.
- घरुन काम करण्याच्या पध्दतीवर महानगरातील फक्त चार टक्के तर लहान शहरातील सहा टक्के कर्मचारी असमाधानी
- घरुन काम करताना जवळपास 70 टक्के कर्मचाऱ्यांच्या मते त्यांची उत्पादकता तितकीच राहिली आहे अथवा वाढली आहे. हा उत्साह वाढविणारा निष्कर्ष समोर आला आहे.
- घरुन काम करताना 35 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या उत्पादकतेत वाढ झाल्याचा विश्वास वाटतो.
वर्क फ्रॉम होम: भारतीय कंपन्यांनी कशावर भर दिला पाहिजे?
१. कामाचे लवचिक तास :
- सर्वेक्षणातील 34 टक्के कर्मचाऱ्यांना घरातील कामकाजात वेळ घालवावा लागतो तर तितक्याच कर्मचाऱ्यांना आपल्या कुटूंहबातील सदस्यांना विशेषतः ज्येष्ठांच्या देखभालीक़डे लक्ष द्यावे लागते. घरुन काम करण्यात असमाधानी असण्यामागे ही प्रमुख कारणे आहेत.
- महिला कर्मचाऱ्यांसाठी हे मुद्दे तर खुपच मोठे आहेत. (29 टक्के पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलेनेत 43 टक्के महिलांसाठी हा महत्वाचा मुद्दा) त्यामुळे पुरष आणि स्त्री कर्मचारी लक्षात घेतल्यास कंपन्यांना त्यांच्यासाठी कामाच्या वेळा अधिक लवचिक ठेवणे गरजेचे आहे.
२. कामकाजात ताळमेळ नसण्याची शैली :
- सततच्या व्हिडीओ कॉल्समुळे 26 टक्के कर्मचारी कामावर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. त्यामुळे कंपन्यांनी सोय़ीप्रमाणे काम करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्यात कर्मचारी हा आपल्या सहकाऱ्याच्या कॉलला त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार प्रतिसाद देऊ शकेल,
३. अयोग्य पध्दतीचे फनिचर आणि लॅपटॉप :
- 36 टक्के कर्मचाऱ्यांना घरुन काम करताना पुरेशी जागा नसल्याच्यी समस्या जाणवलेली आहे. त्यांना सध्याच्या या कार्यपध्दतीत सुटसुटीतपणा जाणवेल, असे फर्निचर मिळाल्यास ही समस्या बऱ्यापैकी दुर होऊ शकेल.
- लहान शहरात ही समस्या तर खुपच गंभीर आहे, त्यांच्यासाठी योग्य फर्निचर मागविणे अथवा विकत घेणे हे मोठे आव्हान आहे. लहान गावात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कंपन्यांनी एक पाऊल पुढे टाकणे खुपच गरजेचे आहे.
ICICI Lombard Survey: वर्क फ्रॉम होम की ऑफिस?
- हायब्रीड मॉडेल ज्यात घरुन किंवा कार्यालयातून अंशतः काम करण्याच्या शैलीला पसंतीची मोहोर लाभली आहे. 52 टक्के कर्मचाऱ्यांनी हायब्रीड मॉडेलला पसंती दिली आहे.
- तीनापैकी एकाने कार्यालयात येऊन काम करण्यास 100 टक्के पसंती दर्शविली आहे, तर 16 टक्के जणांनी कायमस्वरुपी घरुन काम करण्यास पंसती दाखविली आहे.
- कामाचे हायब्रीड मॉडेल मान्य असलेल्यांपैकी 41 टक्के जणांनी आठवड्यात तीन दिवस कार्यालयातून तर 25 टक्के जणांनी दोन दिवस कार्यालयातून काम करण्यास पंसती दिली आहे.
- ठराविक दिवशी कार्यालयातून काम करण्यामागे अधिकाऱ्यांबरोबर बैठकांना उपस्थित राहणे अथवा कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत
नवीन हायब्रीड कार्यपध्दतीत कर्मचाऱ्यांना खालील घटकांची गरज आहे :
- कामाचे कमी तास हवेत: 60 टक्के कर्मचारी
- कामाचे लवचिक तास हवेत: 40 टक्क्यांपेक्षा अधिक कमचारी
- घरुन काम करताना वैद्यकीय लाभ हवेत: 40 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी
- आपल्या सहकाऱ्यांशी नियमित कनेक्ट राहण्यासाठी ऑनलाईन मंचाची आवश्यकता: 25 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी
- कामाच्या ठिकाणी मनोरंजन हवे (आभासी पध्दतीने): 20 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी
- वर्क फ्रॉम होम करतानाही पुरस्कार आणि वाढीचे लाभ हवेतः 20 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी
भविष्यातील कामकाजाच्या पध्दतीत कंपन्यांसाठी अतिशय महत्वाचे ठरणारे मुद्दे
- घरुन काम हे कमी उत्पादक नसते, ही धारणा असली तरी 60 टक्के कर्मचाऱ्यांना यामुळे नोकरी जाण्याची भिती वाटते.
- लहान गावांच्या (52 टक्के) तुलनेत महानगरातील (66 टक्के) कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भिती अधिक वाटते. त्यामुळे हुशार व्यक्ती आपल्याकडे येण्यासाठी कंपन्यांनी सकारात्मक वातावरण तयार करण्याची गरज यातून स्पष्ट होते.
- आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना तयार करणे कंपन्यासाठी मोठे आव्हान आहे.
- सध्याची डिजीटल पध्दत ही एकाच वेळी अनेक कामांच्या शैलीकडे झुकलेली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षा व विश्वास यांची खात्री देणे गरजेचे असून त्यामुळे ते बिगर देखरेखीच्या अशा वर्क फ्रॉम होम पद्धतीतही अधिक कार्यक्षम होऊ शकतील.
- पायाभुत सुविधांचे पाठबळ
- घरुन काम करताना इंटरनेटची कनेक्टिव्हीटी हा कळीचा मुद्दा ठरला आहे. विशेषतः लहान गावांमध्ये तो खूपच त्रासदायक आहे.
- लहान शहरातील 48 टक्के जणांना तर महानगरातील 39 टक्के जणांना ही समस्या जाणवली आहे.
ICICI Lombard Survey: सर्वेक्षणातील निष्कर्षांचा गोषवारा
कामाच्या हायब्री़ड मॉडेलकडे वाटचाल करताना या सर्वेक्षणाने अनेक महत्वाचे मुद्दे नजरेत आणून दिले आहेत. दीर्घकाळासाठी 50 टक्के कर्मचारी हे बाह्य ठिकाणांहून काम करताना दिसणार आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांसह करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाने भविष्यातील कामाच्या ठिकाणांचे स्वरुप कसे पाहिजे, याबाबतही आमच्या विचारांना आकार दिला आहे. त्यात प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना त्रयस्थ ठिकाणांहून काम करण्याचा पर्याय देणे, आमच्या सध्याच्या प्रत्यक्ष पायाभुत सुविधा आणि तंत्रज्ञान आणखी बळकट आणि एकसंध करणे, बैठकांच्या माध्यमातून कामकाजाच्या नवीन पध्दती विकसित करणे, टीमच्या सदस्यांमध्ये संपर्क आणि सहकार्य वाढविणे आणि हायब्रीड मॉडेलमध्ये कामगिरी टिकवून ठेवणे यांचा समावेश आहे.
– जेरी जोस
ICICI Lombard GIC Ltd
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: ICICI Lombard Survey Marathi Mahiti, ICICI Lombard Survey in Marathi, ICICI Lombard Survey Marathi, Work from home Marathi Mahiti, Work culture survey in Marathi, Work culture Survey Marathi Mahiti