HRA & Home Loan
करदात्यांच्या मनात नेहमी येणार प्रश्न म्हणजे घरभाडे भत्ता व गृहकर्ज (HRA & Home Loan) या दोन्हींवर एकाचवेळी करसवलत घेता येतील का? आयकर कायद्यामध्ये ठराविक प्रकारच्या गुंतवणुकींवर अथवा खर्चांवर कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये काही कर सवलतींबाबत करदात्यांच्या मनात नेहमीच गोंधळ असतो. यापैकीच एक म्हणजे घरभाडे भत्ता व गृहकर्जावर मिळणारी करसवलत.
आयकर कायद्यामध्ये या दोन्ही गोष्टीं स्वतंत्र कलमांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. कलम १० (१३ ए) अन्वये घरभाडे भत्त्यासाठी, तर गृहकर्जावर मिळणारी करसवलत कलम २४ बी मध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु, प्रश्न हा येतो की करदाता या दोन्ही कलमांचा एकत्रित लाभ घेऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण या दोन्ही संकल्पना व्यवस्थित समजून घेऊ.
घरभाडे भत्ता (HRA)
घरभाडे भत्ता हा तुमच्या पगाराच्या रचनेचा एक भाग आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी जर कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असेल आणि स्वतःच्या पैशातून घरभाडे देत असेल, तर तो एचआरए साठी दावा करू शकतो.
घरभाडे भत्त्यासाठी (HRA) मिळणारी करसवलत
१. पगारामध्ये मिळणारी एचआरए ची रक्कम किंवा
२. मूळ पगाराच्या ४०% (महानगरांसाठी ५०%) + महागाई भत्ता (DA) किंवा
३. भरलेले घरभाडे – [(मूळ पगार + महागाई भत्ता) x १०%]
वरीलपैकी जी रक्कम कमी असेल त्यावर करसवलत मिळते.हे आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया.
उदा. रमेश हा महानगरामध्ये काम करणारा कर्मचारी आहे. व त्याला पगारामधून मिळणारा घरभाडे भत्ता आहे १०,००० रुपये. आता आपण रमेशच्या पगाराच्या तक्त्यावरून घरभाडे भत्त्यासाठी किती करसवलत हे पाहूया
दरमहा मिळणार घरभाडे भत्ता = रु. १०,०००
मूलभूत मासिक वेतन = रु. ३८,०००
महागाई भत्ता = रु. २,०००
मासिक भाडे = ७,००० रुपये
कर सवलतीचे कॅल्क्युलेशन
- पगारामधून मिळणारा घरभाडे भत्ता – रु. १०,०००
- पगाराच्या ५०% = ५०% x (रु. ३८,०००+ २०००) = रु. २०,०००
- घरभाड्याची किंमत – १०% = ७००० – (४०००० x १०%) = ७००० – ४००० = रु. ३०००
यामध्ये रमेशला केवळ रु. ३००० साठी करसवलत घेता येईल. उर्वरित रकमेवर म्हणजेच रु. ७००० वर त्याला कर भरावा लागेल.
गृहकर्जावरील करसवलत
- गृहकर्जावर २ प्रकारे करसवलत मिळते –
- मुद्दलाची परतफेड (कलम ८० सी): जर कर्मचारी अथवा त्याचे कुटुंबीय घरामध्ये राहत असतील किंवा घर रिक्त असेल तर मुद्दलाच्या परतफेडीवर १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.
- व्याजदेयकावर मिळणारी करसवलत (कलम २४): गृहकर्जाच्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते.
- अर्थसंकल्प २०१९ मध्ये परवडणार्या घराच्या व्याज देयकावर करसवलतीची तरतूद करण्यात आली. यानुसार कलम ८० इइए अंतर्गत गृहकर्जावरील व्याजसाठी अतिरिक्त १.५ लाख रुपयांपर्यत कर सवलत मिळू शकते
- गृहकर्जावरील व्याजासाठी एकूण ३.५ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते – कलम ८० सी नुसार रु. १.५ लाख, कलम २४ नुसार रु. २ लाखांपर्यंत व कलम ८० इइए नुसार रु. १.५ लाख.
- कोणत्याही गृहकर्जाच्या लाभासाठी दावा करण्यासाठी महत्वाची अट म्हणजे घर बांधून तयार असावे. . जर घर निर्माणाधीन असेल तर त्यासाठी बांधकाम कालावधीत अदा केलेल्या गृहकर्जावरील व्याज ५ समान भागामध्ये विभागून दरवर्षी शकता आणि घर बांधून टायर झाल्येल्या वर्षांपासून दर वर्षी भरलेल्या व्याजावर करसवलतीसाठी दावा करू शकता.
HRA & Home Loan: घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का?
भाड्याचे घर आणि स्वतःचे घर वेवेगळ्या शहरात असल्यास दोन्हींसाठी करसवलत घेता येते का?
– रोजगाराच्या ठिकाणी भाड्याचे घर आणि इतर शहरात स्वतःचे घर असल्यास दोन्हींसाठी करसवलत घेता येते.
भाड्याचे घर आणि स्वतःचे घर एकाच शहरात असल्यास दोन्हींसाठी करसवलत घेता येते का?
- यामध्ये तार्किक प्रश्न असा येतो की त्याच शहरातील घर असलेली कोणतीही व्यक्ती भाड्याने घर घेऊन का राहील?
- यामुळे बहुतेक कंपन्यांना ही गोष्ट मान्य करत नाहीत. त्यामुळे कर्मचारी एकाचवेळी घरभाडे भत्ता आणि गृहकर्ज या दोन्हीवर कर सवलत घेऊ शकत नाही.
- परंतु, यासाठी कर्मचाऱ्यांकडे समाधानकारक कारण असल्यास कायद्यानुसार दोन्हींसाठी करसवलतीचा दावा करता येईल.
अशाप्रकारे, करदात्याकडे समाधानकारक कारण असल्यास करदाता दोन्ही करसवलतींचा लाभ एकाच वेळी घेऊ शकतो. परंतु, “करदात्या जपून टाक पाऊल जरा…” कर बुडविण्यासाठी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करू नका. कायदेशीर मार्गाने करबचत करणं हा आपला अधिकार आहे. परंतु, बेकायदेशीरमार्ग वापरून कर बुडवणे हा गुन्हा आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: HRA & Home Loan tax benefit in Marathi, HRA & Home Loan Tax benefit Marathi Mahiti, HRA & Home Loan Tax benefit marathi