Glenmark Life Sciences IPO
“ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…
२७ जुलै म्हणजेच आजपासून हा आयपीओ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून २९ जुलैला बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हा आयपीओ विकत घ्यायचा विचार करत असाल तर तयासाठी त्वरित अर्ज करा.
हे नक्की वाचा: IPO: आयपीओ म्हणजे काय?
Glenmark Life Sciences IPO – ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ
- ग्लेन्मार्क लाईफ सायन्स या कंपनीने या आयपीओ मधून १०६० करोड रुपये उभारायचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. आयपीओची किंमत (Price band) रु. ६९५ ते रु. ७२० निश्चित करण्यात आली आहे.
- ग्लेन्मार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या मुख्यालयाकडे यापैकी ८०० करोड रुपये ‘स्पिन ऑफ चार्जेस’ म्हणून वर्ग करण्यात येतील अशी माहिती कंपनीने जाहीर केली आहे.
- एपीआय (API) तयार करणाऱ्या ग्लेन्मार्क लाईफ सायन्स ने आयपीओ बाजारात आणण्याचं प्रमुख कारण म्हणजे ‘जेनेरिक’ औषधांची वाढती मागणी. ही मागणी लक्षात घेता कंपनीला उत्पादन क्षमता वाढवायची. यासाठी ग्लेन्मार्क फार्मा त्यांच्या गुजरात मधील ‘दहेज’ इथल्या प्लॅन्ट मध्ये मोठी गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा आयपीओ बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
- तुम्ही जर हा आयपीओ घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचे कमीत कमी २० लॉट विकत घ्यावे लागतील. ३ ऑगस्टला हे स्लॉट तुमच्या नावाने बुक होतील आणि ५ ऑगस्ट पर्यंत हे शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटला तुम्हाला दिसतील. ६ ऑगस्टला या आयपीओचं लिस्टिंग करण्यात येईल.
ग्लेन्मार्क लाईफ सायन्स कंपनी –
- कोणत्याही कंपनीच्या आयपीओ विकत घेण्याआधी त्या कंपनीचा मार्केट मधील ट्रॅक रेकॉर्ड, त्यांच्यावरील आर्थिक कर्ज, त्यांची आर्थिक व्यवहार करण्याची पद्धत बघितली जाते. ग्लेन्मार्क ग्रुप हा सुरुवातीपासूनच या सर्व बाबतीत उजवा आहे.
- ग्लेन्मार्क फार्मा हा ग्रुप ऍक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडीएन्ट्स (API) तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठा ग्रुप तर आहेच, शिवाय जागतिक पातळीवरील जेनेरिक औषध निर्माण करणाऱ्या २० कंपन्यांपैकी १६ उत्पादकांसोबत काम करण्याचा अनुभव कंपनीला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, अनुभवी व नामांकित कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असते.
- संशोधनावर सतत भर देणाऱ्या ग्लेन्मार्क ग्रुप ने इथून पुढे आपल्या आर्थिक उलाढालीसाठी निवडक १० उत्पादनांवर अवलंबून न राहता आपल्या जेनेरिक औषधांमध्ये वाढ करून उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आणि जगात सध्या सुरू असलेल्या ‘चीन विरोधी’ वातावरणाचा फायदा ग्लेन्मार्क कंपनीला विक्री वाढवण्यास अनुकूल ठरत आहे.
- आर्थिक वर्ष २०२१ ते २०२४ पर्यंत ग्लेन्मार्क ने १८.७% इतकी वाढ होण्याचा विश्वास आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. मागच्या २ वर्षात कंपनीने आपल्या खर्चावर नियंत्रण करून निव्वळ नफ्यात सुद्धा घसघशीत वाढ केली आहे.
- मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार, ग्लेन्मार्क लाईफ कंपनीकडे १२० मूलद्रव्यांचं पेटंट आहे. ३१ मे २०२१ पर्यंत कंपनीकडे ४० ड्रग मास्टर फाईल्स (DMF) आणि युरोपियन स्टँडर्ड सर्टिफिकेशन आहे. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय अमेरिका, युरोप, जपान, रशिया, ब्राझील, दक्षिण कोरिया, तैवान अशा विविध देशांमध्ये पसरला आहे.
- ग्लेन्मार्क फार्माचे सध्या अंकलेश्वर, दहेज, मोहोळ आणि कुरकूम येथे औषधी उत्पादन करण्याचा कारखाना आहे.
- कंपनीच्या नफ्याचा आलेख सतत चढताच राहिला आहे. आर्थिक वर्ष २०१८- २०१९ मध्ये १९५.५९ कोटी नफा कमावला होता. सन २०१९-२०२० मध्ये तो वाढून ३१३.०९ कोटी, तर सन २०२०-२०२१ मध्ये कंपनीच्या नफ्याचा आकडा होता – ३५१.५८ कोटी!
वरील आकड्यांवरून ग्लेन्मार्क फार्माच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं असेल, असं चित्र दिसत आहे.
(लेखात माहिती दिलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. सदर कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: Glenmark Life Sciences IPO in Marathi, Glenmark Life Sciences IPO Marathi Mahiti, Glenmark Life Sciences IPO Marathi, Glenmark Life Sciences IPO