गुंतवणूक हा अतिरिक्त उत्पन्नाचा दूसरा स्त्रोत आहे असे म्हणतात. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी नुसतेच बचतीवर अवलंबून राहणे हे वाढत्या महागाईच्या काळात उपयोगाचे नाही यामुळेच गुंतवणूक आपल्या आर्थिक वाटचालीमध्ये किती महत्वाची आहे हे जवळ-जवळ सगळेच जाणून आहेत म्हणूनच प्रत्येक जण फायदेशीर आणि योग्य गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असतात.
आजच्या लेखात आपण सुरक्षित व नियमित मासिक उत्पन्न देणारे काही गुंतवणूक पर्याय पाहणार आहोत.
Top 5 Investment Options
१) मुदत ठेवी (FD)- गुंतवणूक करायची ठरवल्यावर विचारात येणारा पहिला पर्याय म्हणजे मुदत ठेवी.एफडी हा गुंतवणुकीसाठी सर्वात लोकप्रिय प्रकार आहे कारण यामध्ये कमी जोखीम असून समजण्यास देखील सोप्पा आहे. बचत खात्यापेक्षा एफडी वर मिळणारे व्याजदर जास्त असल्याकारणामुळे परतावा देखील चांगला मिळतो. गुंतवणूकदार कमीत कमी १,००० रुपयांची सुद्धा गुंतवणूक करून एफडी काढू शकतात. एफडी काढताना जेवढा जास्त कालावधी निवडण्यात येतो तेवढा जास्त व्याजदर मिळतो. आयकर कायदा ८०सी अंतर्गत ५ वर्षांवरील एफडी वर करबचत सुविधेचा लाभ घेता येतो. तसेच ५ वर्षांवरील एफडी वर कर्ज घेण्याची देखील सुविधा आहे.
बँक आणि NBFC द्वारे ऑफर केलेला हा गुंतवणुकीचा पर्याय असल्यामुळे यामध्ये मॅच्युरिटी कालावधी शेवटी खात्रीशीर रक्कम मिळते. स्टॉक, म्युचल फंड या गुंतवणूक पर्यायांपेक्षा एफडी सुरक्षित असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे नक्कीच फायदेशीर ठरते.
हेही वाचा – Silver investment: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी…
२)पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये ठराविक रक्कम गुंतवून प्रत्येक महिन्याला निश्चित व्याज मिळते. या योजनेअंतर्गत ६.६% व्याजदर दिला आहे.यामध्ये गुंतवणूकदाराला वैयक्तिक रित्या ४-५ लाख रुपयांपर्यंत व संयुक्त खाते असेल तर ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ५ वर्षांच्या लॉक- इन कालावधी नंतर गुंतवणूकदाराला परतावा मिळतो.
सरकारी पाठिंबा असल्यामुळे हा गुंतवणूक पर्याय सुरक्षित व कमी जोखमीचा मानला जातो.
३) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)- कोणताही भारतीय व्यक्ती जो ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचे वय वर्षे ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तसेच लवकर निवृत्त झालेले नागरिक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास पात्र आहे. गुंतवणूकदार रिटायरमेंट नंतर एका महिन्याच्या आत यामध्ये गुंतवणूक करू शकतो. कोणत्याही अधिसूचित बँकेत किंवा पोस्टात जाऊन या योजनेत गुंतवणूक करता येते. सध्या ही योजना तीन महिन्याला ७.४% इतके व्याजदर देते गुंतवणूकदार यामध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. भारत सरकार द्वारे लॉन्च केलेली ही गुंतवणूक योजना असल्यामुळे हा गुंतवणूक पर्याय नक्कीच खात्रीशीर ठरतो.
४)मासिक उत्पन्न योजना (MIP)- मासीक उत्पन्न योजना ही म्युचल फंड या श्रेणीमध्ये येते यामध्ये मुख्यत्वे ठराविक उत्पन्नामध्ये तसेच इक्विटी व इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते. या योजनेमध्ये गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नसून गुंतवणूकदारांना नियमित व स्थिर उत्पन्न मिळते. यासाठी कोणताही लॉक- इन कालावधी दिलेला नाही. मासीक उत्पन्न योजनेमधून मिळणारे व्याजदर चांगले असल्याने इतर गुंतवणूक पर्याय जसे की FD,POMIS या पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. परंतु लक्षात ठेवा कि या योजने मधून मिळणारी रक्कम निश्चित नसते. म्हणून मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी जोखमीचा विचार करणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Personal financial Budget : व्यक्तिगत आर्थिक बजेट बाबत टाळा ‘या’ मोठ्या चुका...
५)सरकारी रोखे (Government Bond) – सरकारी खर्चांसाठी भांडवल उभारण्यासाठी सरकारी रोखे जारी करण्यात येतात. यामध्ये साधारण ५ वर्ष ते ४० वर्षांपर्यंतचा कालावधी दिलेला असतो. सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये नियमित व्याज, खात्रीशीर परतावा व सुरक्षिततेची हमी देखील मिळते.
लक्षात ठेवा गुंतवणूक करताना आपल्या समोर भरपूर पर्याय असतात जे चांगल्या उत्पन्नाची हमी देतात परंतु कोणत्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करताना त्यामधून मिळणारे उत्पन्न व जोखीम तपासूनच योग्य ती गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
वर दिलेले गुंतवणूक पर्याय तुम्हाला तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यास नक्कीच उपयोगी ठरतील.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies