गृहकर्ज घेणं झाले महाग, कर्जदरांमध्ये झपाट्याने वाढ - तुम्ही काय कराल ?
गृहकर्ज घेणं झाले महाग, कर्जदरांमध्ये झपाट्याने वाढ – तुम्ही काय कराल ?
Reading Time: 2 minutes

(MCLR) Rates

स्वतःचे घर घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु वाढते कर्जदर पाहता, हेच स्वप्न आता आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता वाढत चालली आहे ! रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे परिणामी सर्व बँकांनी आपल्या कर्जदरांमध्ये वाढ केली आहे. याचा कर्जदारांना मोठा फटका बसणार आहे.

या लेखातून आपण काही प्रमुख बँकांचे कर्जदर किंवा एमसीएलआर (MCLR)  जाणून घेणार आहोत. 

  • वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आर्थिक तिमाही पतधोरणाची घोषणा केली आहे.
  • रेपो दरात ५० बेसिस अंकांनी वाढ केल्यानंतर सुधारित रेपो दर ४.४ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. 
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने सामाजिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांनी देखील त्यांच्या कर्जदरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • एमसीएलआर (MCLR) मध्ये वाढ केल्यानंतर वैयक्तिक,व्यावसायिक, वाहन, गृह अश्या सर्वच प्रकारच्या कर्जदरांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 
  • तसेच, एमसीएलआर मध्ये वाढ केल्यानंतर याचा थेट परिणाम इएमआय वर होतो. म्हणजेच, कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या इएमआय मध्ये वाढ होते.

हेही वाचा – Loan Frauds : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स

एमसीएलआर (MCLR) म्हणजे काय ?

  • एमसीएलआर (MCLR) म्हणजे, निधी-आधारित कर्ज दराची सीमांत किंमत (Marginal Costs of Fund-Based Lending Rate). बँक ग्राहकाला एमसीएलआर कर्ज देते. 
  • नोटाबंदीनंतर १ एप्रिल २०१६ रोजी आरबीआयने त्याची अंमलबजावणी केली होती. पूर्वी बेस रेट हा कोणत्याही बँकेकडून कर्ज देण्यासाठी किमान आधारभूत व्याज दर होता. एमसीएलआर हा आर्थिक गरजेनुसार बदलू शकतो. 

काही प्रमुख बँकांचे एमसीएलआर (MCLR) खालीलप्रमाणे दिले आहेत. 

आयसीआयसीआय बँक

  • १ महिना – ७.३० टक्के 
  • ३महिने – ७.३५ टक्के 
  • ६महिने – ७.५० टक्के 
  • १ वर्ष – ७.55 टक्के 

हेही वाचा – Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?

एचडीएफसी बँक 

एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर ७ जून २०२२ पासून लागू केले जातील.

  • १ महिना – ७.55 टक्के 
  • ३ महिने – ७.६० टक्के 
  • ६ महिने – ७.७० टक्के 
  • १ वर्ष – ७.८५ टक्के 
  • २ वर्षे – ७.९५ टक्के 
  • ३ वर्षे – ८.०५ टक्के 

बँक ऑफ बडौदा 

  • १ महिना – ७.२० टक्के 
  • ३महिने – ७.२५ टक्के 
  • ६महिने – ७.३५ टक्के 
  • १ वर्ष – ७.५० टक्के 

 

बँक ऑफ महाराष्ट्र 

  • १ महिना – ७.२५ टक्के 
  • ३महिने – ७.५५ टक्के 
  • ६महिने – ७.६० टक्के 
  • १ वर्ष – ७.७० टक्के 

हेही वाचा – Education Loan : परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या

तुम्ही काय कराल ?

  • गृहकर्जाचा हप्त्यांमध्ये जरी वाढ झाली तरी तुम्ही इतर खर्च कमी करून वेळेवरच हा वाढलेला हप्ता भरण्यासाठी प्रयत्नशील रहा. 
  • काही बँका तुम्हाला एकूण कर्ज कालावधीत वाढ करून देऊन कर्जाचा हप्ता पूर्वी होता तितकाच ठेवण्याचा पर्याय देऊ शकतात. या पर्यायामध्ये तुमचे व्याज जास्त खर्च होते.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…