Reading Time: 3 minutes
  • आपल्या देशातल्या बहुतांश लोकांचे आवडते हिरो म्हणजे अमिताभ बच्चन, रजनीकांत, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आहेत. या हिरोचे डॉयलॉग भारतातल्या कोट्यावधी लोकांना पाठ आहेत. हे डॉयलॉग एकमेकांना ऐकवून लोकं फुशारक्या मारत असतात. गेली ७५ वर्ष कोट्यावधी जनतेचे आदर्श हे चित्रपटातील हिरो राहिलेले आहेत. या चित्रपटातल्या हिरोने आणि त्यांच्या  डॉयलॉगबाजीने लोकांना काय दिले ? तर त्याचे स्पष्ट उत्तर शून्य हेच आहे. 

  • शेअर बाजारात असा एक सुपरस्टार आहे. ज्याने गेली पन्नास वर्ष शेअर मार्केट गाजवले आहे. त्या व्यक्तीचा जीवन प्रवास व विचार पाहीले आणि त्यावर मार्गक्रमण केले तर आपल्याला या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. त्या व्यक्तीचे नाव आहे वॉरेन बफे ! (Warren Buffet) 
  • वॉरेन बफे हे २००८ मध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकावर होते. (Richest person in the world) आजही ते जगातील श्रीमंताच्या यादीत पहिल्या दहा मध्ये असतात. हे सर्वोच्च स्थान त्यांनी काही एका रात्रीत गाठलेले नाही किंवा त्यांना आपल्या पूर्वजापासून संपत्तीचे घबाड मिळाले म्हणून ते अब्जाधीश झालेले नाहीत. वॉरेन बफे यांनी लहान वयात च्युइंगम विकणे, मासिके विकणे, कोका कोलाच्या बाटल्या विकणे. अशा प्रकारची कामे केलेली आहेत.
  • वॉरेन बफेचा ९२ वा वाढदिवस ३० ऑगस्टला होता. या शेअर बाजारातील कुबेराच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवन आणि विचार थोडक्यात जाणून घेऊया. जे तुम्हाला चित्रपटातील हिरोच्या डॉयलॉग पेक्षा कित्येक पटीने फायद्याचे ठरतील. 

 

वॉरेन बफे यांच्या यशाचे रहस्य काय? हे त्यांच्याच महत्वाच्या पाच वाक्यातून जाणून घेऊया. 

(Warren Buffet Quotes Marathi)

१) वाचन करा, वाचन करा आणि वाचन करत रहा..

                      

बऱ्याच लोकांना वाटेल की, हा कसला सल्ला आहे. वॉरेन बफे एक स्वतः उत्साही वाचक आहेत. आपल्या दिवसाचा महत्वाचा वेळ ते वाचण्यात घालवतात. वाचन केल्याशिवाय तुम्हाला जगात, शेअर बाजारात काय चालले आहे, हे कळत नाही. नवीन विचार किंवा कल्पना सुचत नाहीत. शेअर बाजाराच्या मैदानात उतरायचे असेल तर वाचन हेच आपलं ब्रह्मास्त्र आहे. कुठूनतरी टीप मिळाली, कुण्यातरी व्यक्तीने सांगितलं म्हणून गुंतवणूक केली. असे करणारे व्यक्ती कधीही पुढे जात नाहीत. एखाद- दोन वेळेला त्यांना फायदा होईल पण दीर्घकाळात त्यांचे नुकसान ठरलेले आहे. 

 

२ ) तुम्हाला जे समजते त्यात गुंतवणूक करा – 

वॉरेन बफे यांनी अनेक दशकाच्या मेहनती मधून आपले साम्राज्य उभे केले आहे. त्यामुळे ते कधीही एका महिन्यात अब्जाधीश व्हा किंवा कोट्याधीश व्हा… सारखे सल्ले कधीही देत नाहीत. ते स्वतः त्यांना ज्या क्षेत्रातील कंपन्या समजत नाहीत, त्यात गुंतवणूक करत नाहीत. अमेरिकेत नव्वदच्या दशकात आयटी व टेलिकॉम कंपन्यात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा प्रचंड ओढा होता. या कंपन्यांचा शेअर्सवर लोकं तुटून पडायचे पण वॉरेन बफे यांनी या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये त्यावेळी कसलीही गुंतवणूक केली नाही. त्यावर त्यांनी म्हटलं होत की हे तंत्रज्ञान समजण्यास क्लिष्ट आहे. काही वर्षांनी या क्षेत्रात मोठी मंदी आली आणि लाखो लोकं कंगाल झाली. 

 

नक्की वाचा – Warren Buffett Quote : वॉरेन बफेट यांची जीवनाबद्दलची 20 उत्तम विधाने

३ ) कळपाचे अनुसरण करू नका- 

कळपाची मानसिकता आपल्या डोक्यात घर करून बसलेली असते. आपण मेंढर नाही तर माणूस आहोत. आपल्या धडावर डोकं आहे, हेच आपण विसरून जातो आणि बहुतांश जनता जिकडे पळेल तिकडे खाली मान घालून पळत असतो. खड्ड्यात पडल्यावर लक्ष्यात येत की, आपल्याकडे तर काहीच राहिलं नाही. शेअर बाजारात बहुतांश लोकं जे शेअर विकत घेत असतात तेच आपण घेत असतो आणि त्या शेअर्स बाबतीत जरा काही वाईट बातमी आली की, लगेच पटापट विकून टाकतो. याच्या उलट वॉरेन बफे यांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे. 

(Image credit – Click here)

 

४) आपण आवश्यक नसलेल्या गोष्टी विकत घेतल्यास आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील- 

सध्या चंगळवादाचे वारे जोरजोराने वाहत आहे. जो- तो आपल्या ऐपतीपेक्षा अधिक खर्च करू लागलेला आहे. ऋण काढून सण साजरा करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वॉरेन बफे हे काटकसरी व्यक्तिमत्व आहे. ते अगदी साधे जीवन जगतात. साठ वर्षापूर्वी खरेदी केलेल्या घरात अजूनही राहतात. आता वॉरेन बफे यांना नवीन घर खरेदी करता येणार नाही का? त्यांनी नुसतं मनात आणलं तर हजारो अलिशान बंगले ते काही मिनिटात खरेदी करू शकतात. एवढी प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे. लहानपणी च्युइंगम विकणारे वॉरेन बफे हे आज अब्जाधीश आहेत. कारण ते खर्च करण्यापेक्षा गुंतवणूक करण्यावर अधिक भर देतात. 

 

 

५)  सर्वात महत्वाची गुंतवणूक ही तुम्ही स्वतः मध्ये करा – 

स्वतः मध्ये गुंतवणूक करा. याचा अर्थ कर्ज काढून स्वतः वर प्रचंड खर्च करा असा होत नाही. स्वतःच्या क्षमता आणि कौशल्ये वाढवा, असा त्याचा अर्थ होतो. क्षमता आणि कौशल्ये वाढवण्यासाठी जो काही खर्च करावा लागेल तो करा. स्वतः वर केलेली अशी गुंतवणूक तुम्हाला सर्वाधिक परतावा देते आणि त्यावर कोणता करही लागत नाही. क्षमता असणाऱ्या व्यक्तींना नेहमीच मागणी असते, अशाच व्यक्तीकडे सतत पैसा येत असतो. हेच वॉरेन बफे यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे.  

वॉरेन बफे यांनी आपली ९९ % संपत्ती दान केलेली आहे पण हे वॉरेन बफे यांचे समाजाला दिलेलं मोठं योगदान नाही. वॉरेन बफे यांनी गुंतवणूकीची जी सूत्रे सांगितलेली आहेत, त्याचे जे ज्ञान दिलेलं आहे. ते सर्वात मोठं दान आहे. हे असं ज्ञान आहे, ज्यावर मार्गक्रमण केलं तर कोट्यावधी लोकं आपले आयुष्य सुखाने जगू शकतात. यामुळेच ज्ञानदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. 

 

 

warren buffet marathi information

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…