वॉरन बफेट
Warren Buffet in marathi
Reading Time: 4 minutes

 Warren Buffet Success Story : वॉरेन बफेट यांची यशोगाथा 

 

 • बालपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांचा वेळ खेळण्या-बागडण्यात आणि मस्ती करण्यात गेला असेल. कोणीतरी मागे लागलं म्हणून अभ्यास करणं, कोणीतरी सांगितलं म्हणून अमुक-तमुक करणं हे बालसुलभ वयाला साजेसं असतं.  
 • पण वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी एका पुस्तकाने प्रभावित होऊन आयुष्याचं ध्येय कोणी ठरवत असेल तर ती व्यक्ती जेव्हा आयुष्यात पुढे मोठी होईल तेव्हा नक्कीच कुणी साधी-सुधी असामी नसेल. 
 • गुंतवणुकीच्या जगात ज्यांच्या विचारांचे लाखो-करोडो फॉलोअर्स आहेत, जे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात आणि तरीही अत्यंत परोपकारी म्हणून प्रसिद्ध आहेत ते म्हणजे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ अर्थात वॉरेन बफेट ! आज आपण या लेखातून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. 

जन्म, बालपण, शिक्षण

 • वॉरेन यांचे पूर्ण नाव वॉरेन एडवर्ड बफेट असे आहे. त्यांचा जन्म 1930 साली ओमाहा, नेब्रास्का येथे झाला. हॉवर्ड बफेट आणि लीला स्टॅहल बफेट यांचे ते चिरंजीव आहेत. 
 • हॉवर्ड बफेट हे देखील एक गुंतवणूकदार होते. कदाचित वॉरेनना गुंतवणूक आणि व्यवसायाचे बाळकडू त्याच्या वडिलांकडून मिळाले असावे. त्यांना डोरिस बफेट ब्रायंट आणि रॉबर्टा बफेट बियालेक या दोन बहिणीही आहेत.
 • त्यांचं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण रोझ हिल एलिमेंटरी स्कूल, एलिस डील ज्युनियर हायस्कूल आणि वुड्रो विल्सन येथे झालं. पुढे अर्थशास्त्र या विषयात त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून Master of Science ही पदवी संपादन केली.

  

हेही वाचा – Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO……

लहान वयात व्यवसाय करण्याची हिम्मत 

 • ‘एक हजार डॉलर्स कमविण्याचे एक हजार मार्ग’ या पुस्तकाने अत्यंत प्रभावित होऊन, आपल्याला खूप पैसे कमवायचे आहेत असं त्यांचं ध्येय निश्चित झालं होतं. पण त्या लहान वयात वॉरेननी व्यवसाय करण्यापेक्षा आधी शिक्षण पूर्ण करावं अशी वडिलांची इच्छा होती. 
 • तरी सुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी च्युइंगम्स, कोका-कोलाच्या बाटल्या, साप्ताहिकं आणि मासिकं देखील विकली. जेव्हा ते हायस्कूलमध्ये होते तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या किराणा दुकानात काम करत असत. या नोकरीसोबतच त्यांनी वर्तमानपत्रे, गोल्फ बॉल आणि स्टॅम्पही विकले. वृत्तपत्रे वितरीत करून त्यांनी दर महिन्याला जवळपास 175 डॉलर कमावले.
 • शेअर बाजार आणि गुंतवणुकीत असलेल्या आवडीमुळे त्यांनी त्यांचे बरेच शाळकरी दिवस वडिलांच्या ब्रोकरेज कार्यालयाजवळील प्रादेशिक स्टॉक ब्रोकरेजच्या ग्राहकांच्या लाउंजमध्ये घालवले. 
 • वयाच्या दहाव्या वर्षी न्यूयॉर्क शहराच्या सहलीला गेले असताना त्यांनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला भेट देण्याचे ठरवले. 11 व्या वर्षी, त्यांनी स्वत:साठी सिटी सर्व्हिस प्रीफर्डचे तीन शेअर्स आणि तीन आपल्या बहीण साठी विकत घेतले. 
 • 15 व्या वर्षी, वॉरेननी वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रे वितरीत करून महिनाकाठी  $175 पेक्षा जास्त पैसे कमावले होते. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या व्यवसायात गुंतवणूक केली आणि 40 एकर शेत विकत घेतले. 14 वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या बचतीपैकी $1,200 ची जमीन खरेदी केली. कॉलेज संपेपर्यंत, त्यांनी $9,800 ची बचत केली होती जिची किंमत आज सुमारे $107,000 इतकी आहे. यावरून आपल्याला कळेल की वॉरेन बफेटना लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती. 

वॉरेन बफेट यांचे कुटुंब

 • 1952 मध्ये वॉरेन यांनी सुसान थॉम्पसन यांच्याशी लग्न केले. त्यांना सुझी, हावर्ड आणि पीटर अशी मुले आहेत. पुढे लग्नानंतर काही कारणांनी त्यांच्यात मतभेद झाल्याने ते दोघे वेगळे राहू लागले. 2004 साली आजारपणामुळे सुसान थॉम्पसन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2 वर्षांनी 2006 मध्ये वॉरेन यांनी त्यांच्या 76 व्या वाढदिवशी त्यांची सहकारी ऐस्ट्रिड मेंक्स यांच्याशी विवाह केला. 

 

व्यवसायवृद्धी

 • वॉरेन आपल्या यशाचे श्रेय प्रसिद्ध गुंतवणूकदार बेंजामिन ग्रॅहम यांना देतात कारण त्यांच्या विचारांचा चांगला प्रभाव वॉरेन यांच्यावर पडला होता. वॉरेन तर त्यांच्याकडे अगदी मोफत नोकरी करण्यासाठी तयार होते. पण ग्रॅहम सुरुवातीला या गोष्टीसाठी तयार नव्हते. 
 • 1954 मध्ये, वॉरेनना अखेर खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा बेंजामिन ग्रॅहमने स्वतः त्यांना 12 हजार डॉलर्सच्या पगारावर त्यांच्या फर्ममध्ये भागीदारीत नोकरीवर ठेवले. या नोकरीच्या काळातच त्यांना शेअर बाजाराच्या नफ्यासाठी चढउतार कसे वापरले जातात याची एक समज विकसित करण्याची संधी मिळाली. 
 • पुढे 1956 मध्ये बेंजामिन ग्राहम सेवानिवृत्त झाले. पुन्हा एकदा वॉरेननी आपले काम सुरू करण्याची योजना आखली आणि बफेट पार्टनरशिप लिमिटेडच्या नावाखाली गुंतवणूक फर्म स्थापन केली, यात त्यांनी तीन भागीदारी चालवल्या. 
 • या फर्ममधील कमाईतून वॉरेननी ओमाहा येथे आपले 5 बेडरूम्स असलेले पहिले घर 31 हजार 500 डॉलर्समध्ये खरेदी केले जिथे ते आजही वास्तव्यास आहेत आणि यानंतर वॉरेननी कधीही मागे वळून पाहिले नाही. 
 • 1962 पर्यंत वयाच्या 32 व्या वर्षी अमेरिकेला वॉरेन बफेट नावाच्या एका नवीन करोडपतीची ओळख झाली होती.

 

हेही वाचा Personal financial Budget : व्यक्तिगत आर्थिक बजेट बाबत टाळा ‘या’ मोठ्या चुका…

 

बर्कशायर हॅथवेकडे वाटचाल 

 • ग्रॅहम यांच्याकडून शिकलेल्या तंत्रांचा वापर करून, कमी मूल्य असलेल्या कंपन्या ओळखण्यात वॉरेन यशस्वी होऊन ते कोट्याधीश झाले. 
 • एव्हाना त्यांच्या भागीदारीच्या निव्वळ संपत्तीने 7 करोड 17 लाख डॉलर्सचा आकडा ओलांडला होता आणि एकट्या वॉरेन यांची 10 लाख 25 हजार डॉलर्सहून अधिक रक्कम जमा झाली होती. 
 • यानंतर 1960-62 च्या दरम्यान त्यांनी बर्कशायर हॅथवेचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली, जी एक जास्त नफ्यात नसलेली कापड कंपनी होती. 1965 पर्यंत त्यांनी या कंपनीचा ताबा आपल्या हातात घेतला. हा पराक्रम करत असताना, ते अवघ्या 35 वर्षांचे होते.
 • बफेट पार्टनरशिप यशस्वी वाटचाल करत असतानाही, त्यांनी बर्कशायर हॅथवेच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 1969 मध्ये ती फर्म विसर्जित केली.
 • यानंतर काही कारणांमुळे बर्कशायर हॅथवेने बाजारात आपली प्रसिद्धी गमावली. कारण त्यांचा व्यवसाय हळूहळू आणि सातत्याने खराब होत होता. स्टॉकहोल्डरची इक्विटी निम्म्याने घसरली होती आणि ऑपरेशनमधील तोटा देखील $10 कोटींपेक्षा जास्त झाला होता. यामुळे, कंपनीने त्यांच्या कापड गिरण्या विकण्यास सुरुवात केली आणि स्टॉकधारकांकडून कंपनीचे शेअर्स पुन्हा खरेदी करण्यास सुरुवात केली.
 • असे असतानाही वॉरेननी बर्कशायर हॅथवे स्टॉकच्या किमतीच्या मोठ्या भागामध्ये गुंतवणूक केली. कापड व्यवसायातून काही नफा मिळू शकतो असा कुठेतरी त्यांचा विश्वास होता.
 • व्यवस्थापन कंपनी बंद करण्याचा विचार करत होती. वॉरेनना वाटले की जेव्हा कंपनी त्यांच्या उरलेल्या कापड गिरण्या विकेल, तेव्हा कंपनी निश्चितपणे शेअर्स परत विकत घेईल आणि मग त्यांना चांगली किंमत मिळू शकेल.
 • वॉरेननी $11.50 ला त्यांचे शेअर्स विकण्यासाठीचा करार केला आणि कंपनीनेही किंमतीशी सहमती दर्शवली.
 • पण नंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना  $11.50  ऐवजी $11.375 चा करार देऊन फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वॉरेनना आपली फसवणूक झाल्याचा राग आला आणि त्यांनी आपले शेअर्स विकण्यास नकार देत आणखी स्टॉक खरेदी करण्यास सुरुवात केली.
 • हा निर्णय त्यांनी भावनेच्या भरात घेतला होता, पण आपल्या चुकीचे रूपांतर त्यांनी मोठ्या धंद्यात केले.

बर्कशायर हॅथवे कंपनीचे अधिक स्टॉक विकत घेऊन त्यांनी कंपनीवर आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आणि बर्कशायर हॅथवेला होल्डिंग कंपनी बनवले. आज 60 पेक्षा जास्त कंपन्या बर्कशायर हॅथवे मध्ये समाविष्ट आहेत. तसेच क्राफ्ट-हेन्झ, अमेरिकन एक्सप्रेस, बँक ऑफ अमेरिका, Apple, कोका कोला या कंपन्यांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. 

नम्र आणि परोपकारी व्यक्तिमत्व 

 • वॉरेन यांनी जागतिक आरोग्य आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या संपत्तीतून खूप मोठा भाग देणगी म्हणून दिला आहे. 
 • 2006 मध्ये जाहीर केलेली बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनसाठी $37 अब्ज डॉलर्सची देणगी हा त्यांनी केलेला सर्वज्ञात दानधर्म आहे. 
 • इतकं उत्तुंग यश, पैसा, प्रसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत असतानाही वॉरेन अत्यंत साधे आणि नम्र आयुष्य जगतात. आजही ते स्वतः कार चालवून त्यांच्या कामांच्या ठिकाणी जातात आणि आपल्या त्याच पूर्वीच्या घरात राहतात. 
 • साधेपणा, काम करण्याची आवड आणि बुद्धिमत्ता या गुणांमुळे जगात त्यांचे करोडो चाहते आहेत. 

 

हेही वाचा – Shark Tank India : जाणून घ्या लोकप्रिय शो ‘शार्क टँक इंडिया’बद्दल ……

 

आपण काय शिकलो 

 • पैसा आहे म्हणून तो कसाही न वापरता त्याची बचत आणि त्यात वाढ केली पाहिजे. नुसती ध्येयं उत्तुंग न ठेवता प्रत्येक क्षण ते ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपडलं पाहिजे.  
 • हातात पैसे आल्यावर आपण स्वतःवर खर्च करूच पण आपण समाजाचेही काही देणं लागतो या भावनेतून जमेल तशी गरजुंना मदत करण्याची इच्छाही ठेवली पाहिजे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…