Reading Time: 3 minutes

आजकाल क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स पाहून सर्वजण हे नवे कर्ज घेत आहेत! 

  • क्रेडिट कार्ड हे आर्थिक अडचणीच्या वेळी गरजेच्या गोष्टी तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी असते आणि त्याचा वापर खिशात पैसे नसताना वस्तू खरेदसाठी करता येतो. 
  • लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड बेजबाबदारपणे वापरल्यास तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.  
  • क्रेडिट कार्ड वापरताना अनेक प्रश्न लोकांना पडतात म्हणजे क्रेडिट मर्यादेपलीकडे क्रेडिट कार्ड वापरू शकता का? तुमच्याकडे १ लाख रुपयांचे क्रेडिट मर्यादेचे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही १.२ लाख रुपयांची खरेदी केल्यास काय होईल? कार्ड व्यवहार पार पडेल की नाकारला जाईल? इ. 
  • आपण या लेखातून अशा प्रश्नांची उत्तरे तसेच क्रेडिट कार्डांवर उपलब्ध असलेल्या विविध वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. 

 

तुमच्या क्रेडिट मर्यादेपलीकडे क्रेडिट कार्ड वापरणे शक्य आहे का?

  • क्रेडिट मर्यादा म्हणजे काय? – क्रेडिट मर्यादा ही कमाल रक्कम आहे जी तुम्ही त्या रकमे पर्यंतच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता! 
  • जेव्हा तुम्ही बँकेने ठरवून दिलेल्या क्रेडिट मर्यादेच्या पलीकडे क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा ते ‘ओव्हर लिमिट’ होते आणि बँकेने तुम्हाला दिलेल्या अधिकच्या ठराविक रकमेइतकेच पैसे तुम्ही कर्ज म्हणून वापरू शकता. 
  • नवीन क्रेडिट कार्ड प्राप्त झाल्यावर कार्डवरील क्रेडिट मर्यादेबद्दल सूचित केले जाते. 
  • तुमचा क्रेडिट रेकॉर्ड, कर्जपरतफेडीचा रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअर, इतर कर्जे अशा विविध घटकांच्या आधारे ही क्रेडिट मर्यादा बँकेद्वारे निर्धारित केली जाते. 
  • क्रेडिट लिमिट तुमच्या उत्पन्नावर आणि परतफेडीच्या क्षमतेवर आधारित असते. तुम्हाला क्रेडिट कार्ड बिले भरण्यास कोणत्याही अडचणी यायला नकोत एवढीच क्रेडिट मर्यादा बँक देते.
  • तुमच्‍या क्रेडिट कार्डचा वापर, वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरायचा इतिहास, उत्पन्न अशा गोष्टींचा विचार करून तुमचे क्रेडिट कार्ड अपग्रेड केले जाते. 

 

नक्की वाचा – Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 

 

कार्ड ‘ओव्हर लिमिट’ होणे म्हणजे नेमके  काय ? (Credit Card Over Limit)

  • तुम्हाला घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम तुम्ही वापरली की कार्ड ‘ओव्हर लिमिट’ होते.  उदाहरणार्थ, समजा तुमची क्रेडिट मर्यादा रु.५२,००० असेल आणि खरेदी केल्यावर  व्यापाऱ्याकडे रु.६०,००० साठी  कार्ड स्वाइप केले, तर तुम्हाला बँकेकडून ओव्हर लिमिट वापराबद्दल सूचित केले जाते आणि ओव्हर लिमिट हा पर्याय दिला जातो. 
  • आता ओव्हर लिमिट हा पर्याय वापरण्यासाठी तुम्हाला जास्त मर्यादेच्या रकमेवर अतिरिक्त व्याज आकारले जाते. हे व्याज साधारणतः तुम्ही घेतलेल्या अतिरिक्त रकमेच्या २.५% ते ५% च्या दरम्यान असते. 
  • तुम्ही हा पर्याय न निवडल्यास, तुमचा व्यवहार नाकारला जाऊ शकतो. ओव्हर लिमिट रक्कम ही व्याजमुक्त नसते हे कृपया नेहमी लक्षात ठेवा. 
  • ओव्हर लिमिट रक्कम ही तुमच्या सामान्य क्रेडिट मर्यादेचा भाग मानली जाते. जर तुमची सामान्य क्रेडिट मर्यादा रु.५०,००० असेल आणि तुम्ही रु.५२,००० चा व्यवहार केला, तर त्या रु.२,०००वर व्याज आकारले जाते. या अतिरिक्त व्याजाला ‘ओव्हर लिमिट इंटरेस्ट’ असेही म्हणतात. (ओवरलिमित Interest) 
  • काही बँका तुम्हाला क्रेडिट मर्यादेपेक्षा २० टक्क्यांपर्यंत खरेदी करण्याची परवानगी देतात, तर काही बँका त्यापेक्षा जास्त रकमेची खरेदी करण्याची परवानगी देतात. त्यामुळे, ओव्हर लिमिट सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या बँकेकडे त्याची तपासणी करणे कधीही चांगले.

 

ओव्हर लिमिटचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे?

  • जोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तोपर्यंत तुम्ही जास्त मर्यादेचा लाभ घेऊ शकतात. 
  • तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास किंवा तुमची बिले वेळेवर भरण्याचा रेकॉर्ड नसल्यास, बँक तुम्हाला ओव्हर लिमिट सुविधा देत नाही. 

 

ओव्हर लिमिट सुविधेचा लाभ घेणे योग्य आहे का?

  • तुमचा क्रेडिट कार्ड वापर कमीत कमी ठेवणे आणि ओव्हर लिमिट टाळणे केव्हाही चांगलेच असते. 
  • तुम्हाला पैशांची निकड असल्यास, तुम्ही कुटुंब किंवा मित्रांकडून कर्ज घेणे, अल्प-मुदतीचे वैयक्तिक कर्ज, गोल्ड लोन इत्यादींसारख्या  पर्यायांचा विचार करू शकता. 
  • तुम्ही वारंवार ओव्हर लिमिट सुविधेचा लाभ घेत असल्यास, तुमच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करण्याची आणि आवश्यक तेथे मोठे बदल करणे महत्वाचे आहे. 

 

क्रेडिट कार्ड अतिवापराचे धोके –

  • ओव्हरड्राफ्ट मर्यादा शुल्क – 

ओव्हरड्राफ्ट मर्यादा सुविधेसाठी पात्र नसल्यास, बँका ओव्हरड्राफ्ट मर्यादा शुल्क आकारतात. कार्ड वापरकर्त्यांनी अनावश्यक त्रास टाळण्यासाठी आपल्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करूच नयेत.

  • व्याजदरात वाढ – 

कार्डधारकांनी क्रेडिट मर्यादा  ओलांडल्यास त्यांच्या व्याजदारांमध्ये वाढ होऊ शकते. याशिवाय व्याजाचे अधिक पैसे द्यावे लागल्याने भविष्यात मुद्दल रक्कम परतफेडीमध्ये अडचणी निर्माण होय शकतात.  

  • कमी क्रेडिट स्कोअर – 

वापरकर्त्यांच्या क्रेडिट स्कोअरमध्येही घट होऊ शकते. क्रेडिट स्कोअरमधील घट भविष्यातील कर्ज प्रकरणावर नकारात्मक परिणाम करते.

  • व्यवहार नाकारणे-

जर कार्डधारकाने मर्यादा ओलांडली तर त्याचे क्रेडिट व्यवहार नाकारले जाऊ शकतात. त्यांची खरेदी पूर्ण होऊ शकत नाही किंवा ते बिले भरू शकत नाहीत. 

 

 

अचानक आलेली आर्थिक अडचण दूर करणारे क्रेडिट कार्ड हे एक फायदेशीर आर्थिक साधन आहे त्यामुळे आपल्याला कोणाकडे हात पसरायची गरज पडत नाही. क्रेडिट कार्ड वापराच्या आहारी न जाता सूज्ञपणे त्याचा वापर करा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…