Reading Time: 2 minutes

अगदी कमी दिवसांमध्ये भारतीय उद्योग जगतातील दोन ताऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायरस मिस्त्री आणि राकेश झुनझुनवाला या दोन उद्योगपतींचा यामध्ये समावेश होतो. कारमध्ये बसून सीट बेल्ट न लावल्यामुळे सेक्युरिटी सिस्टीम चालू झाली नाही आणि सायरस यांचा मृत्यू झाला. भारतीय व्यवस्थेमध्ये रस्ते व्यवस्थित नसणे आणि त्या रस्त्यांवर वेळीच उपचार उपलब्ध न होणे हे खूप मोठे दुर्दैव आहे. त्याचाच परिणाम म्हणून उद्योग जगतातील नामांकित उद्योजक सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. 

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि  शापूरजी पालोनजी कंपनीचे प्रमुख  सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबरला निधन झाले. सायरस यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सायरस मिस्त्री यांच्या कारकिर्दीवरचा आढावा या लेखातून पाहणार आहोत. 

सायरस मिस्त्री यांचे शिक्षण 

१९ व्या शतकात बांधकाम कंपनी म्हणून चालू झालेल्या  शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे सायरस हे धाकटे पुत्र होते. त्यांनी मुंबईमधील बिशप कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून पदवी पूर्ण केली होती. त्यांचे उच्च शिक्षण इंपिरियल कॉलेज लंडन आणि लंडन स्कुल ऑफ बिझनेसमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. 

व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात 

  • १९९१ साली सायरस मिस्त्री यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या बांधकाम कंपनीचे ते संचालक बनले. 
  • त्यानंतर पुढे जाऊन १९९४ मध्ये शापूरजी पालोनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बांधकाम, सागरी तेल आणि वायू, रेल्वे क्षेत्रातील प्रकल्प आणि कंपनीच्या विविध कामावर लक्ष दिले. 

टाटा समूहामध्ये कामाला सुरुवात 

  • सायरस मिस्त्री यांनी २००६ मध्ये  पालोनजी मिस्त्री यांच्या निवृत्तीनंतर टाटा समूहाच्या संचालक मंडळात कामाला सुरुवात केली. त्यांनी टाटा कंपनीच्या संचालकपदाचा कारभारास सुरुवात केली. (Tata Sons Cyrus Mistry) 
  • काही दिवसांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. 
  • सायरस मिस्त्री यांची उपाध्यक्ष पदी निवडल्यानंतर टाटा समूहाने १०० पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये आघाडी घेतली होती. जग्वार आणि लँड ओव्हर गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली.
  • सायरस यांच्यावर टाटा समूहामध्ये रचना सुव्यवस्थित करणे, संबंधित व्यवसाय एकत्र करणे आणि कुटुंब नसलेल्या सदस्यांसाठी व्यवस्थापन पदे खुली करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. 
  • १ सप्टेंबर २००६ रोजी त्यांच्याकडे टाटा सन्समध्ये १८.४ टक्के भागीदारीसह ते यामध्ये सामील झाले. टाटा समूहामध्ये शेअरचा सर्वात मोठा वाटा पालोनजी समूहाकडे होता. 
  • २४ सप्टेंबर १९९० ते 26 ऑक्टोबर 2009 पर्यंत टाटा एलेक्सी लिमिटेडचे संचालक आणि १८ सप्टेंबर २००६ पर्यंत टाटा पॉवरचे संचालक म्हणून काम पहिले. 

नक्की वाचा : पालनजी मिस्त्री – लो प्रोफाइल अब्जाधीश 

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून बेदखल 

  • २०१२ च्या मध्यात निवड समितीने टाटा समूहाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. 
  • टाटा कुटुंबातील सदस्यांशी कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या मतभेदावरून त्यांना अचानक बडतर्फ करण्यात आले. बोर्डावर गैरव्यवस्थापनाचा आणि अल्पसंख्याक भागधारकांवर अन्याय केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 
  • मिस्त्री यांनी दावा केला होता की, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते आणि  अचानक अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले. 
  • सायरस  मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे न्याय मागितला पण तिथे त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील अपिलात टाटांचा विजय झाला. 
  • दोन वर्षानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांची बडतर्फी कायम ठेवली. 

2013 च्या लेखात, द इकॉनॉमिस्टने त्यांना “भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांतील सर्वात महत्त्वाचे उद्योगपती” म्हणून गौरवले होते. 

नक्की वाचा : TCS कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना १७ वर्षांमध्ये ३०००% परतावा

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…