Reading Time: 2 minutes

बिग बुल नावाने ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांची संपत्ती ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असूनही ते साधेपणाने रहात असत.  एका इन्कम टॅक्स ऑफिसरचा मुलगा ते शेअर बाजारात अफाट यश प्राप्त करणारा अवलिया असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर १९८५ साली शेअर बाजारात त्यांनी कामाला सुरूवात केली होती.  देशभरातील गुंतवणूकदार झुनझुनवाला यांनी कोठे गुंतवणूक केली यावर बारकाईने लक्ष ठेवून असत. 

राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवला होता. २०२५ साली सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा राकेश झुनझुनवाला यांना पैसे गुंतवायचे असत तेव्हा कंपन्या त्यांच्याकडे धाव घेत. 

 

राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती किती?

 • शेअर बाजारातून रेअर एन्टरप्राइजेस उद्योगाचे जाळे उभे केलेल्या झुनझुनवाला यांनी सुमारे ४५ हजार कोटींची संपत्ती कमावली आहे.
 • हजारो कोटींची संपत्ती असलेल्या झुनझुनवाला यांचा प्रवास फक्त ५,००० रुपयांपासून सुरू झाला होता. १९८५ साली बॉंबे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स १५० अंकांच्या जवळ होता. त्या वेळी लोकांना शेअर बाजार हा जुगार वाटत असायचा. पण नेहेमी अभ्यास करणाऱ्या धाडसी निर्णय घेणाऱ्या झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराची नस अचूक पकडली होती.b
 • गुंतवणुकीचे पर्याय त्या काळात मर्यादित होते. बाजार नियंत्रित नसल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना भीती वाटायची. त्या वेळी  लोक बँक एफडीमध्येच पैसे गुंतवत असत. त्या काळामध्ये झुनझुनवाला यांनी हिंमत दाखवून मोठी गुंतवणूक केली होती. 

 

टायटनच्या एकाच शेअरने बदलले झुनझुनवालांचे आयुष्य 

 • राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचा शेअर विकत घेतला तेव्हा त्याची किंमत ३ रुपये होती. झुनझुनवाला यांच्या आवडीचा हा शेअर होता. त्याची किंमत सध्याच्या घडीला जवळपास २ हजार ४७२ रुपये आहे. 
 • त्यांच्याकडे टायटन कंपनीचे जवळपास ११,०८६ कोटी रुपयांचे शेअर्स होते. या कंपनीमध्ये झुनझुनवाला यांचा जवळपास ५.१० टक्के हिस्सा असून 4,48,50,970 शेअर्स त्यांच्या नावावर आहेत. 

 

नक्की वाचा : Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

 

बेअर ते बिगबूल पर्यंतचा प्रवास  

 • १९९२ साली झालेल्या घोटाळ्यामध्ये अनेक जण रस्त्यावर आले होते. झुनझुनवाला यांचा या काळात कोणताही तोटा झाला नाही. उलट या वेळी त्यांनी शॉर्ट सेलिंगमधून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला. त्यांचे राधाकृष्ण दमाणी हे या व्यवसायात सहकारी होते.
 • दमाणी यांनी हर्षद मेहता घोटाळ्यानंतर शेअर बाजारातून माघार घेतली आणि रिटेल व्यवसायाला सुरुवात केली. याच काळात झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातच जास्तीत जास्त गुंतवणूक करून स्वतःचा जम बसवला. 

 

झुनझुनवाला यांची या कंपन्यांमध्ये होती गुंतवणूक 

 • राकेश झुनझुनवाला यांनी सर्वाधिक गुंतवणूक टायटन या कंपनीत केली होती. त्यांनी या कंपनीमध्ये ९ हजार १७४ कोटी रुपये गुंतवले होते. २०१७ साली शेअर बाजार जोमात असताना एकाच दिवसात त्यांनी या शेअर्समधून  ९०० कोटी रुपये कमावले होते. 
 • त्यांनी  स्टार हेल्थ कंपनीत  ५ हजार ३७२, मेट्रो ब्रॅण्ड कंपनीत  २ हजार १९४ गुंतवले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा मोटर्समध्ये १ हजार ६०६ तर क्रिसिल कंपनीत १ हजार २७४ कोटी रुपये गुंतवले होते. 
 • राकेश झुनझुनवाला यांचे  मुंबईतील महागड्या मलबार हिल भागामध्ये घराचे बांधकाम सुरु होते. रुपयांची जमीन विकत घेतली होती. 

 

शेअर बाजार झुनझुनवालांच्या हालचालींवर ठेवायचे लक्ष 

 • शेअर मार्केट मध्ये राकेश झुनझुनवाला हे नाव कायम चर्चेत असायचे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जायचे. बाजारामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण व्हायची तेव्हा गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडत असत पण झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीवर होणारा प्रिणा. कितीही असला तरी ते निवांत असायचे. 
 • भारतीय शेअर बाजाराचा सुवर्ण काळ अजून सुरू व्हायचा आहे असे त्यांचे नेहेमी वाक्य असायचे. याला ते Mother of all Bull Runs असे म्हणायचे. 
 • भारताच्या प्रगतीवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. नेहमीच बाजारामध्ये आक्रमकता न दाखवता संयम ठेवायला हवा हे त्यांनी उदाहरणातून पटवून दिले. त्यांनी संयम आणि अभ्यास करून गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजारात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. 
 • लाखो भारतीयांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रेरणा देणाऱ्या ‘बिग बुल’ राकेशजी यांना अर्थसाक्षर टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…