भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तर एशियन पेंट नावाची कंपनी आपला ८० वा निर्मिती दिन साजरा करत आहे. भारतीय कंपन्यांच्या इतिहासात अशा खूप मोजक्या कंपन्या असून ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वी सुरु झाल्या आणि आजही यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. त्यापैकी एक कंपनी म्हणजे एशियन पेंट्स होय.
भारतातील प्रत्येक तिसरे घर हे एशियन पेंट्सच्या रंगानी रंगवले जाते. गेली ८० वर्ष एशियन पेंट्स आपल्या घराची शोभा वाढवत आहे. या एशियन पेंट्सची यशोगाथा खूप रंगीबेरंगी आहे. कंपनीच्या वाटचालीबद्दल आपण लेखात पाहणार आहोत.
नक्की वाचा : कोलगेट ब्रॅण्डची यशोगाथा
स्वदेशी एशियन पेन्ट्स कंपनी–
- एशियन पेंट कंपनीचा जन्मच आंदोलनातून झाला. महात्मा गांधीनी असहकार आंदोलन पुकारले होते. इंग्रजांनी आयात होणाऱ्या अनेक वस्तूवर बंदी घातली होती. या वस्तूपैकी एक वस्तू ‘रंग’ देखील होती. लोकांना रंग मिळणे कठीण होऊन बसले.
- भारतात स्वदेशीचा प्रचारही जोरदार चालू होता. अशा पार्श्वभूमीवर मुंबईच्या एका गॅरेजमध्ये चार मित्र जमले आणि त्यांनी ठरवलं की भारतातच पेंट कंपनी तयार करायचा. भारताला रंगाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवान्याचं काम या चौघांनी सुरु केलं पण पुढचा प्रवास काही सोपा नव्हता.
- या मित्रांनी पेंट बनवून कसलीही लाज न बाळगता मुंबईच्या रस्त्यावर रंग विकायला सुरुवात केली. हे चार मित्र चंपकलाल चोकसी, चिमनलाल चोकसी, सुर्यकांत दाणी आणि अरविंद वकील होते. या मित्रांना त्यावेळेला माहिती नसेल की आपण फक्त रंग विकणारी एक लहानशी कंपनी चालू करत नाही आहोत तर इतिहास घडवत आहोत.
मार्केटिंगचा गुरु एशियन पेंट्स कंपनी –
- आजचे जग हे मार्केटिंगचे जग आहे. या मार्केटिंगच्या जगात आज आपल्याला अनेक मार्केटिंगचे गुरु, पुस्तके दिसतात. कंपनी मध्ये सर्वात महत्वाचा विभाग हा मार्केटिंगचा असतो. एवढे महत्व मार्केटिंगला आहे.
- या मार्केटिंगच्या आधुनिक गुरूंना दहावेळा मातीत घालणारी मार्केटिंग ५० – ६० वर्षापूवी एशियन पेंटने केलेली आहे. भारतीय लोकांना मोठे डबे, पाकिटे परवडणार नाहीत म्हणून प्रथमतः रंगाची छोटी पाकिटे बनवण्यात आली आणि जवळच्या लोकांना संपर्क करून त्यांना सेल्समन बनवण्यात आले.
- या पद्धतीने एका वर्षात ३.५ लाखाचा व्यवसाय केला. १९४५ च्या काळात व एका वर्षात एवढा व्यवसाय करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या सात वर्षात ही कंपनी २३ कोटीच्या घरात गेली.
एशियन पेंटचे कार्टून झाले प्रसिद्ध
- एशियन पेंट्स कंपनीने १९५४ साली मार्केटिंगच्या क्षेत्रात आणखी एक भन्नाट कल्पना वापरली. लोकप्रिय कार्टूनिस्ट असलेले आर के लक्ष्मण यांच्याकडून एक कार्टून तयार करून घेतलं. ते कार्टून ब्रश हातात घेऊन उभ्या असलेल्या लहान मुलाचे होते. हे कार्टून प्रचंड गाजले.
- या कार्टूनला नाव देण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ज्यात तब्बल ४७,००० लोकांनी पत्रे पाठवली. त्यातून दोघांना विजेता घोषित करण्यात आलं आणि पाचशे रुपये बक्षीस देण्यात आलं. त्यात गट्टू हे नावं ठरवलं गेलं.
- तेही खूप प्रसिद्ध झालं. यामुळे कंपनी प्रकाशझोतात आली. या कारणामुळे कंपनीची विक्री प्रचंड वाढली. Don’t lose your temper use Tractor Distemper कंपनीची ही टॅगलाईन तर प्रचंड गाजली.
- कंपनीच्या रंगांना एवढी मागणी वाढली की, कंपनीला आपला दुसरा प्लांट सुरु करावा लागला. भांडूप येथे कंपनीने आपला एक प्लांट चालू केला. अतिशय कमी काळात म्हणजे १९६७ मध्ये कंपनीने फिजी या देशात आपला पहिला विदेशी प्लांट चालू केला.
जगभरात एशियन पेंट्स कंपनीचा बोलबाला
- पाच – सहा रंगाने सुरु होणारी ही कंपनी आज हजारो प्रकारचे रंग बनवत आहे. या कंपनीचे आज १६ देशात प्लांट आहेत. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखली जाते.
- भारतातील एकूण रंगाच्या मार्केट पैकी ५३ % मार्केट एकट्या एशियन पेंट्स कंपनीने व्यापलेले आहे. ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलने या कंपनीला Sword Of Honour हा अतिशय मानाचा असलेला किताब दिलेला आहे. फोर्ब्स यादीत सामील झालेली कंपनी आहे.
आधुनिक तंत्रज्ञानात कंपनी आघाडीवर
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केटिंग करण्यातही ही कंपनी आघाडीवर आहे. १९८४ लाच या कंपनीने टीव्हीवर आपली जाहिरात द्यायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकात या कंपनीने स्वतःचे कॉल सेंटर सुरु केले.
- तर १९९८ सालीच आपली वेबसाईट बनवली. कोरोना काळात दीपिका पादुकोनला घेऊन केलेली जाहिरातही प्रचंड गाजली. कोरोनाच्या संकटात बाकी कंपन्याची विक्री कमी झाली,
- अनेक कंपन्यांनी आपल्या कामगरांना काढून टाकले तर एशियन पेंट्स कंपनीची विक्री तर वाढलीच उलट या कंपनीने कामगारांना पगार वाढवून दिली.
एशियन पेंट्सची खरी ओळख या मान- सन्मान पुरस्काराने होत नाही तर घराला लावण्यात आलेल्या रंगाने होते. आजही ग्राहक डोळे झाकून या कंपनीचे उत्पादने विकत घेत असतात. अशा प्रकारे एशियन पेंट्सने घरासोबत आपले आयुष्यही रंगीबेरंगी करून टाकले आहे.
नक्की वाचा : जाणून घ्या लोकप्रिय शो शार्क टॅंक इंडिया बद्दल